Home Blog Page 92

गुजरातमध्ये लखनौचा सुपर विजय

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव करून हंगामातील त्यांचा सहावा विजय नोंदवला. गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत दोन गडी गमावून २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून फक्त २०२ धावा करता आल्या. घरच्या मैदानावर सलग चार विजयांनंतर गुजरातचा हा पहिलाच पराभव आहे. लखनौकडून विल्यम ओ’रोर्कने तीन तर अवेश खान आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, आकाश सिंग आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्यात ४६ धावांची भागीदारी झाली, जी विल्यम ओ’रोर्कने मोडली. त्याने सुदर्शनाला आपला बळी बनवले. १६ चेंडूत २१ धावा करून तो बाद झाला. यानंतर, आवेश खानने कर्णधार गिलला तंबूचा रस्ता दाखवला. तो फक्त ३५ धावा करू शकला. तर, जोस बटलरला १८ चेंडूत फक्त ३३ धावा करता आल्या.
यानंतर, चौथ्या क्रमांकावर आलेल्या शेरफेन रदरफोर्डने शाहरुख खानसोबत डाव सांभाळला. दोघांनीही ४० चेंडूत ८६ धावा जोडल्या. रुदरफोर्ड ३८ धावा काढून बाद झाला आणि शाहरुख ५७ धावा काढून बाद झाला. तथापि, दोघेही त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. त्यांच्याशिवाय राहुल तेवतियाने दोन, अर्शद खानने एक, कागिसो रबाडाने दोन आणि साई किशोरने एक धाव केली. दरम्यान, रशीद खान चार धावा काढून नाबाद राहिला.
याआधी लखनौची सुरुवातही चांगली झाली होती. एडन मार्कराम आणि मिशेल मार्श यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली. साई किशोरने मार्करामला शाहरुख खानकडे झेलबाद केले. तो ३६ धावा करून बाद झाला. यानंतर मार्शसोबत निकोलस पूरन सामील झाला. दोघांनीही ५२ चेंडूत १२१ धावा जोडल्या. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्शने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. तो ६४ चेंडूत १० चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने ११७ धावा काढून परतला. त्याच वेळी, निकोलस पूरन ५६ धावांवर आणि ऋषभ पंत १६ धावांवर नाबाद राहिले. गुजरातकडून अर्शद खान आणि साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

निष्पक्ष पत्रकारितेच्या दिशेने निर्णायक वाटचाल – व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांचे मनोगत

Loading

नवी दिल्ली ( गणेश ज. शिंदे ) देशहितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी निष्पक्ष पत्रकारिता अत्यंत आवश्यक असून, तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार जगत करत आहे. अशा परिस्थितीत सत्याचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांची एकजूट ही काळाची गरज बनली आहे, असे ठाम मत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांनी व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.
पाच दशकांहून अधिक काळात देशाच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या आणि ५२ देशांतील सुमारे ४ लाख ७० हजार पत्रकारांचा सहभाग असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या या दोन दिवसीय अधिवेशनात संपूर्ण भारतभरातून राज्य अध्यक्ष, महासचिव, संपादक व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्हीओएम इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे स्वतः होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून संघटना केवळ पत्रकारांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य, निवास, शिक्षण आणि सेवानिवृत्तीच्या हितासाठी कार्यरत आहे.
केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘‘प्रामाणिक पत्रकारांचे संरक्षण आणि सन्मान यासाठी संघटित प्रयत्न आवश्यक आहेत. पत्रकारांच्या मागण्या आणि समस्या यावर केवळ चर्चाच नव्हे, तर कृतीशील निर्णय घेणारी संघटना म्हणजे व्हॉईस ऑफ मीडिया आहे. आज जेव्हा माध्यमांवर व्यावसायिक दबाव आणि राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे, तेव्हा अशा संघटना लोकशाहीचा किल्ला मजबूत करण्याचे कार्य करत आहेत.’’
या अधिवेशनात केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते देशभरातील राज्याध्यक्ष, महासचिव आणि मान्यवर पत्रकारांना पदग्रहण प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उपस्थित पत्रकारांना देशहितासाठी आणि पत्रकारिता मूल्यांसाठी समर्पित राहण्याची शपथदेखील देण्यात आली.
या महत्त्वाच्या अधिवेशनात एकूण दहा ठराव एकमताने संमत करण्यात आले. या ठरावांचे वाचन राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी केले. यात पत्रकारांसाठी विमा सुरक्षा, निवृत्तीनंतरचा आधार, पत्रकारांसाठी सरकारी आरक्षण योजना, वकील संरक्षण यंत्रणा, प्रशिक्षण उपक्रम, डिजिटल ओळखपत्रांचे वैधता प्रमाणपत्र, जिल्हास्तरावरील पत्रकार सुरक्षा समिती, महिला पत्रकारांसाठी सुरक्षितता यंत्रणा, पत्रकार अपघात मदत निधी आणि फेक पत्रकारांवर कारवाई अशा विविध बाबींचा समावेश होता.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पत्रकार प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात ऊर्जा पाटील यांनी कोच, सायकोलॉजिस्ट व काउन्सिलर म्हणून देशभरातून आलेल्या पत्रकारांना संघटनात्मक बांधणी, टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिके आणि खेळांच्या माध्यमातून व्यावसायिक वातावरणात कार्यक्षम संघ कसा तयार करावा हे समजावून सांगितले.
अधिवेशनाचा दुसरा भाग विशेषतः पुरस्कार सोहळ्याने अधिक गौरवशाली ठरला. यामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ‘संसद भूषण’ पुरस्कार, आमदार समीर कुणावार यांना ‘विकास पुरुष’ पुरस्कार, आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनघा समीर सराफ यांना ‘उद्योग रत्न’ पुरस्कार, व्यंकटेश जोशी यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार, डॉ. पंजाब खानसोले यांना ‘विकास रत्न’ पुरस्कार तर पारधी सर यांना देखील त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात संघटनेच्या राष्ट्रीय कोअर टीमची नव्याने निवड करण्यात आली. या कोअर टीममध्ये विविध राज्यांचे प्रतिनिधी सहभागी करण्यात आले असून, महाराष्ट्राचे अनिल म्हस्के, मध्यप्रदेशचे दीपक शर्मा, उत्तर प्रदेशाचे प्रेम पाठक, हिमाचल प्रदेशचे विकास शर्मा, हरियाणाचे बन्सीलाल पांचाल, जम्मू काश्मीरचे अक्षित महाजन, आसामच्या स्वप्ना दत्ता, नागालँडचे मॅक्स खिया आणि मेघालयचे कर्मलांग करिया यांचा समावेश आहे.
या निवडीमुळे देशभरातील पत्रकार संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रत्येक राज्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे. पत्रकारांच्या हितासाठी यापुढेही अशीच धोरणात्मक बैठक, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील, असे संदीप काळे यांनी सांगितले.
अधिवेशनात ‘पत्रकार सुरक्षा कायदा’ लवकरात लवकर लागू करावा, फेक पत्रकार संघटनांवर बंदी आणावी, पत्रकारांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यात यावे, आणि पत्रकारांची नोंदणी अधिकृतरीत्या करण्यासाठी केंद्रीकृत पोर्टल तयार करावे, या बाबींबाबत ठोस मागण्या उपस्थित करण्यात आल्या.
हे अधिवेशन केवळ एक औपचारिक बैठक नव्हती, तर एक प्रेरणादायी चळवळ होती. ज्यामध्ये देशभरातून आलेल्या पत्रकारांनी अनुभवांची देवाणघेवाण केली, संघटनात्मक उद्दिष्टांची दिशा ठरवली आणि भविष्यातील पत्रकारितेच्या ध्येय-धोरणावर चर्चा केली.
व्हॉईस ऑफ मीडियाचे हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकार बांधवांमध्ये एकजूट निर्माण करणारे, सत्यस्वरूप पत्रकारितेची ग्वाही देणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नव्या पर्वाची नांदी करणारे ठरले आहे. पत्रकारांच्या हक्कासाठी सशक्त लढा देण्याच्या निर्धाराने हे अधिवेशन संपन्न झाले.
संपूर्ण अधिवेशनात संयोजन व शिस्तबद्धता यांचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला. माध्यम जगतातील सर्व स्तरांतील प्रतिनिधींनी एकत्र येऊन आपापल्या जबाबदाऱ्यांची जाणीव घेत आगामी काळात पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दिशेने सकारात्मक पुढाकार घेतल्याचे या दोन दिवसीय अधिवेशनातून स्पष्टपणे दिसून आले.
अशा प्रकारे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या या राष्ट्रीय अधिवेशनाने देशातील पत्रकार समाजात नवसंजीवनी निर्माण केली असून, ही वाटचाल निष्पक्ष, निर्भय आणि जनहितैषी पत्रकारितेकडे नेणारी ठरली आहे.

घरफोडी गुन्ह्याचा पर्दाफाश : जळगाव LCB पोलिसांची कुशल कारवाई; i20 चारचाकीसह आरोपी अटकेत

Loading

चाळीसगाव – शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा शोध अखेर लागला असून, या गुन्ह्याचा समांतर तपास करताना जळगाव LCB पोलीसांनी मोठे यश मिळवले आहे. घरफोडीप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांनी उत्तरप्रदेश आणि धुळे जिल्ह्यातील चार आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी एकास ताब्यात

घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून महत्त्वाचे खुलासे झाले असून, त्याच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई दिनांक 22 मे 2025 रोजी जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड साहेब यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 144/2025 नुसार भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) कलम 305 आणि 331(3) अन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात दिवसाढवळ्या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन तपास, गोपनीय माहिती आणि विशिष्ट पद्धतीने केलेल्या पोलीस सूत्रांच्या तपासावरून चार संशयित आरोपी निष्पन्न करण्यात आले. निष्पन्न आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत – ✨कैलास चिंतामण मोरे (रा. मोहाडी, जिल्हा धुळे), ✨राहुल प्रभाकर अहिरे (रा. सोनगीर, जिल्हा धुळे), ✨जयप्रकाश यादव (रा. उत्तरप्रदेश), आणि ✨वीरेन ठाकूर (रा. उत्तरप्रदेश). या आरोपींपैकी आरोपी क्रमांक 2 – राहुल प्रभाकर अहिरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्हा आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच, गुन्हा करताना वापरण्यात आलेली i20 चारचाकी कार व त्यामध्ये ठेवलेला चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईसाठी एक समर्पित व अनुभवी पोलिसांची टीम कार्यरत होती. या पथकात PSI शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस नाईक दीपक माळी, पोलीस शिपाई महेश पाटील, पोलीस शिपाई भूषण शेलार, पोलीस शिपाई सागर पाटील तसेच चालक हेडकॉन्स्टेबल दीपक चौधरी आणि चालक भरत पाटील यांचा समावेश होता. या सर्वांनी सातत्याने गुप्त माहिती संकलन, संशयित आरोपींचा मागोवा, तांत्रिक यंत्रणांचा वापर, आणि गस्त वाढवून तपासाला गती दिली. त्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हा गुन्हा अत्यंत वेगाने उघडकीस आला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी राहुल अहिरे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कबूल केले की, त्याने व त्याच्या इतर साथीदारांनी धुळे, जळगाव, संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने घरफोडीचे अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्या खुलाशांवरून ही टोळी एक संगठित गुन्हेगारी गट असून ते घरफोडीपूर्वी टार्गेट निवडून संबंधित परिसरात रात्र व दिवस निरीक्षण करत, घरात कोणी नसल्याची खात्री करूनच चोरी करत होते. चोरीनंतर ते गाडीने दूर पळ काढत असत आणि त्यांच्या गुन्ह्याचा पद्धतीने शोध लावणे कठीण व्हावे यासाठी वारंवार त्यांचे लोकेशन व वाहनं बदलत असत. या टोळीच्या उर्वरित तीन सदस्यांचा शोध सध्या सुरू असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पथके रवाना केली आहेत. त्यांचे मोबाईल लोकेशन, नातेवाईकांचे संपर्क, सीसीटीव्ही फुटेज आणि रहदारी तपासणीच्या आधारे लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा पोलिसांचा विश्वास आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पोलिसांची जनतेस विनंती केली आहे की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती द्यावी. तसेच, घर बंद ठेवताना सुरक्षित कुलुप, सीसीटीव्ही यंत्रणा, शेजाऱ्यांची कल्पना देणे यासारख्या प्राथमिक उपाययोजना कराव्यात. या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावल्यामुळे जळगाव स्थानिक गुन्हा शाखेची पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी घेतलेली तत्परता आणि धोरणात्मक तपासपद्धती नागरिकांसाठी दिलासादायक ठरली LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूक्ष्म निरीक्षणाखाली व अनुभवाच्या जोरावर ही कारवाई योग्य दिशेने व प्रभावीपणे पार पडली. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील इतर आरोपी देखील पोलिसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे. अशा संगठित गुन्हेगारी टोळ्यांना कायद्याचा चाप बसवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात असून चाळीसगाव व परिसरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईने दिल्लीच्या आशा धुळीस मिळवल्या, मुंबई प्लेऑफमध्ये; सूर्यकुमारनंतर सँटनेर-बुमराह चमकले

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव केला. यासह, मुंबई आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला. यापूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या✨ सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाच विकेट गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीला १८.२ षटकांत फक्त १२१ धावा करता आल्या आणि त्यांचा डाव संपला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी तीन तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिल्लीला हरवून मुंबईने थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तथापि, दोन्ही संघांचा गट टप्प्यात अजूनही एक सामना शिल्लक आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सामना २४ मे (शनिवार) रोजी पंजाब किंग्जशी होईल तर मुंबई इंडियन्सचा सामना २६ मे (सोमवार) रोजी पंजाब किंग्जशी होईल. हे दोन्ही सामने जयपूरमध्ये खेळवले जातील.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीला त्यांच्या फलंदाजांनी निराश केले. त्यांच्याकडून समीर रिझवीने सर्वाधिक ३९ धावांची खेळी खेळली. याशिवाय, फक्त तीन फलंदाजांना दुहेरी अंक गाठता आला. त्यात केएल राहुल (११), विप्रज निगम (२०) आणि आशुतोष शर्मा (१८) यांचा समावेश आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात संघाचा नियमित कर्णधार अक्षर पटेल प्रकृती अस्वास्थ्यामुळे खेळला नाही. त्याच्या जागी, फाफ डु प्लेसिसने दिल्लीचे नेतृत्व केले. त्याला फक्त सहा धावा करता आल्या. याशिवाय अभिषेक

पोरेलने सहा, ट्रिस्टन स्टब्सने दोन, माधव तिवारीने तीन आणि कुलदीप यादवने सात धावा केल्या. त्याच वेळी, मुस्तफिजूर रहमानला खातेही उघडता आले नाही तर दुष्मंथा चामीरा आठ धावा करून नाबाद राहिला.
त्याआधी, मुंबईची सुरुवात खराब झाली. माजी कर्णधार रोहित शर्मा फक्त पाच धावा करून बाद झाला. यानंतर, विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन यांनी जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु जॅक्स १३ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला तर रिकेल्टनला फक्त २५ धावा करता आल्या. तिलक वर्माने २७ आणि हार्दिक पंड्याने तीन धावा केल्या. त्याच वेळी, सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत सात चौकार आणि सहा गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ७३ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय, नमन धीरने आठ चेंडूत दोन चौकार आणि तितक्याच षटकारांसह २४ धावा केल्या आणि नाबाद राहिला. सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी शेवटच्या 12 चेंडूत 48 धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन तर दुष्मंथ चामीरा, मुस्तफिजूर रहमान आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हजारो वर्षांच्या श्रद्धेचा नवा अध्याय : आर्यादी श्री जनार्दन मंदिराचा भव्य जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

Loading

पांगाला, उडुपी (कर्नाटक) (गुरुदत्त वाकदेकर) : उडुपी जिल्ह्यातील पांगाला, कापू येथे दहाव्या शतकापासून श्रद्धेचे केंद्र असलेल्या आर्यादी श्री जनार्दन मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनःप्रतिष्ठा सोहळा अतीव भक्तिभाव आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात पार पडला. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात शास्त्रोक्त विधी, वैदिक पूजा-अर्चा, कलशारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले श्री माधवाचार्य मूळ महासंस्थान, आडामरू नरहरी तीर्थ मठाचे वेदमूर्ती श्री श्री श्री विश्वप्रिय तीर्थ श्रीपादेरु आणि सोदे वदिराजा मठाचे जगद्गुरू श्री श्री श्री विश्ववल्लभ तीर्थ श्रीपादेरु, ज्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशोत्सव विधी पार

पडले.

कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश सौ. हेमावती, खासदार श्रीनिवास पुजारी, बंगळुरू येथील एम.आर.जी. समूहाचे प्रमुख डॉ. के. प्रकाश शेट्टी, आमदार सुरेश गुरमे-शेट्टी, योगेश व्ही. शेट्टी, डॉ. पी. मोहनदास भट, पी. गोविंद शेट्टी, बाळकृष्ण टी. शेट्टी, शैलेश शेट्टी आणि सुधीर शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्र, विशेषतः मुंबईहून आलेल्या हजारो भाविकांनीही सहभाग घेतला.

दंडतीर्थातील गुरुकुल परंपरा आणि माधव विजय पर्वात या मंदिराचा उल्लेख आढळतो. शतके उलटून गेली, तरीही येथील श्री जनार्दन मूर्तीच्या दर्शनाने मनःशांती आणि समाधान मिळते, अशी दृढ श्रद्धा आजही अबाधित आहे.

या भक्तिसंपन्न सोहळ्यामुळे पांगाला, कापू, पडबद्री, खटपडी आणि उडुपी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसरात्र चाललेल्या मंत्रोच्चारांनी परिसर पवित्रतेने भारून गेला होता. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही पर्वणी संस्मरणीय ठरली.

तसेच ही नव्या रूपात पुनरुत्थित झालेली परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीची वास्तू भाविकांच्या मनात नवचैतन्याचा दीप उजळून गेली आहे.

आयपीएल २०२५ : बीसीसीआयने प्लेऑफचे नवे वेळापत्रक केले जाहीर

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२५ च्या प्लेऑफचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, आता या हंगामातील विजेतेपदाचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सऐवजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर

खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे, आयपीएलचा चालू हंगाम एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला होता, जो १७ मे पासून पुन्हा सुरू झाला. 
बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते परंतु अंतिम फेरी आणि प्लेऑफची ठिकाणे जाहीर केली नव्हती. कोलकाता अंतिम सामन्याचे यजमानपद हिसकावून घेऊ शकेल असे मानले जात होते आणि मंगळवारी ते अधिकृतपणे निश्चित झाले. बीसीसीआयच्या सुधारित वेळापत्रकानुसार, न्यू चंदीगडमधील पीसीए स्टेडियममध्ये २९ मे रोजी क्वालिफायर-१ आणि ३० मे रोजी एलिमिनेटर सामना होईल. 
त्याच वेळी, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम, १ जून रोजी क्वालिफायर-२ आणि ३ जून रोजी अंतिम सामना आयोजित करेल. जुन्या वेळापत्रकानुसार, हैदराबाद आणि कोलकाता प्लेऑफ सामने आयोजित करणार होते. आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हवामान आणि इतर कारणांमुळे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांचे ठिकाण बदलले आहे.
आयपीएल २०२५ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि आतापर्यंत पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे आणि मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चौथ्या स्थानासाठीची लढाई अजूनही सुरू आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर), लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके), सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांचा प्रवास गट टप्प्यातच संपला आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने बेंगळुरूमध्ये होणाऱ्या आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे ठिकाणही बदलले आहे. आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२५ चा ६५ वा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार होता, परंतु आता तो लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलने म्हटले आहे की बेंगळुरूमधील खराब हवामान लक्षात घेता हा सामना लखनऊला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी, १७ मे रोजी होणारा आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता आणि त्यात नाणेफेक होऊ शकली नाही. भारतीय हवामान खात्याने गुरुवारपर्यंत बेंगळुरूमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळेच बोर्डाला शेवटच्या क्षणी या सामन्याचे ठिकाण बदलावे लागले आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने २० मे पासून प्लेऑफसह ग्रुप स्टेजच्या उर्वरित सामन्यांमध्ये एक अतिरिक्त तास जोडला आहे. याचा अर्थ असा की जर कोणत्याही कारणास्तव सामना उशिरा सुरू झाला तर खेळासाठी एक अतिरिक्त तास उपलब्ध असेल. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत पावसामुळे तीन सामने रद्द करावे लागले आहेत.

चेन्नईविरुद्धच्या राजस्थानचा विजय पण प्रवास संपला,; युधवीर-आकाशनंतर वैभव सूर्यवंशी चमकला

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांच्यातील ९०+ धावांच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला. यासह, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाचा स्पर्धेतला प्रवास संपला. हा त्यांचा गट टप्प्यातील शेवटचा सामना होता. त्याच वेळी, चेन्नईला २५ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. राजस्थान आणि चेन्नई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानने १७.१ षटकांत चार गडी गमावून १८८ धावा केल्या आणि स्पर्धेतील त्यांचा

चौथा विजय नोंदवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली जी अंशुल कंबोजने तोडली. जयस्वाल १९ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. यानंतर, सूर्यवंशीला कर्णधार संजू सॅमसनची साथ मिळाली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. सॅमसन ४१ धावा करून बाद झाला आणि सूर्यवंशी ५७ धावा करून बाद झाला. या सामन्यात रियान परागला चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो तीन धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेल ३१ आणि शिमरॉन हेटमायर १२ धावांवर नाबाद राहिले. चेन्नईकडून अश्विनने दोन तर अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी, चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. डेव्हॉन कॉनवेला युधवीर सिंगने पायचीत केले. तो फक्त १० धावा करू शकला. यानंतर, त्याने उर्विललाही तंबूचा रस्ता दाखवला, जो खातेही उघडू शकला नाही. चेन्नईकडून आयुष म्हात्रेने ४३, देवाल्ड ब्रेव्हिसने ४२ आणि शिवम दुहेने ३९ धावांची मोठी खेळी केली. त्याच वेळी, कर्णधार धोनी १७ चेंडूत १ षटकारासह १६ धावा काढून बाद झाला. राजस्थानकडून युधवीर सिंग आणि आकाश माधवाल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर तुषार देशपांडे आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पुलिस निरीक्षक संदीप पाटिल का “एकता संगठन” की ओर से सौ दिन की उत्कृष्ट कार्यप्रणाली पर सम्मान

Loading

जलगांव – महाराष्ट्र सरकार द्वारा लागू की गई ‘सौ दिन उत्कृष्ट कार्य योजना’ का उद्देश्य पुलिस प्रशासन में पारदर्शिता, समयबद्ध न्याय, और सुशासन को मजबूती देना है। इस योजना के अंतर्गत राज्य भर के पुलिस थानों का मूल्यांकन कर उत्कृष्ट कार्य करने वाले थानों को सम्मानित किया जाता है। इसी क्रम में जलगांव जिले का एमआईडीसी पुलिस थाना राज्य भर में सर्वोत्तम सिद्ध होकर प्रथम स्थान पर रहा। इस उल्लेखनीय

सफलता के प्रमुख सूत्रधार वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप पाटिल साहब को “एकता संगठन” की ओर से विशेष रूप से सम्मानित किया गया। यह सम्मान समारोह केवल औपचारिकता नहीं था, बल्कि एक प्रेरक पहल थी। “एकता संगठन” के पदाधिकारियों ने स्वयं एमआईडीसी पुलिस स्टेशन पहुंचकर संदीप पाटिल साहब का शॉल, फूलों का गुलदस्ता और शुभकामनाओं के साथ भव्य अभिनंदन किया। इस दौरान पूरे वातावरण में कृतज्ञता, सराहना और गर्व की भावनाएँ स्पष्ट महसूस हो रही थीं।इस समारोह में “एकता संगठन” के समन्वयक फारुक शेख ने संदीप पाटिल साहब को शॉल और बुके देकर सम्मानित किया, जबकि मुफ्ती खालिद साहब ने आकर्षक पुष्पगुच्छ भेंट कर उनका सत्कार किया। यह सम्मान केवल एक परंपरा नहीं, बल्कि समाज और पुलिस प्रशासन के बीच भरोसे को मजबूत करने वाला ऐतिहासिक क्षण था।वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप पाटिल साहब ने अपने नेतृत्व में पिछले कुछ महीनों में एमआईडीसी पुलिस स्टेशन को अपराध नियंत्रण, तेज और पारदर्शी जांच प्रक्रिया, पीड़ितों को त्वरित राहत, नागरिकों के साथ संवाद और विश्वास निर्माण, महिला और बाल सुरक्षा हेतु ठोस उपाय, तथा संगठित अपराध गिरोहों पर प्रभावी कार्रवाई के क्षेत्रों में उल्लेखनीय सफलता दिलाई। उनके सख्त अनुशासन, निष्पक्ष कार्यशैली और संवैधानिक निष्ठा ने एमआईडीसी थाना को राज्य में एक मिसाल बना दिया।खासकर एफआयआर की प्रक्रिया, समय पर चार्जशीट दाखिल करना, डिजिटल माध्यम से सबूत इकट्ठा करना, और दिव्यांग या कमजोर वर्गों के लिए विशेष प्रावधान — इन सभी क्षेत्रों पर संदीप पाटिल साहब ने विशेष ध्यान दिया। परिणामस्वरूप, एमआईडीसी थाने का कार्य संपूर्ण राज्य में मूल्यांकन मानकों पर सर्वोत्तम सिद्ध हुआ।”एकता संगठन” एक ऐसी संस्था है जो सामाजिक सौहार्द, धर्मनिरपेक्षता और कानून-व्यवस्था को सर्वोच्च प्राथमिकता देती है। यह संगठन सिर्फ मुस्लिम समाज तक सीमित नहीं, बल्कि पूरे समाज के संवैधानिक अधिकारों की रक्षा हेतु सक्रिय है। इसलिए इस संगठन द्वारा संदीप पाटिल साहब का सम्मान होना, समता, न्याय और संविधान के मूल्यों की जीत माना गया।इस समारोह में अनिस शहा, हाफिज रहीम पटेल, मौलाना उमरेन नदवी, मौलाना इमरान काकर, सईद फैयाज, दानिश बागवान, मौलाना कासिम नदवी, अनवर शिकलगर, मझहर पठान जैसे संगठन के वरिष्ठ पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इनकी उपस्थिति ने कार्यक्रम की गरिमा और महत्व को और भी बढ़ा दिया।सम्मान स्वीकारते हुए अपने भाषण में पुलिस निरीक्षक संदीप पाटिल साहब ने कहा —
“पुलिस और आम नागरिकों के बीच आपसी भरोसा और सहयोग हो, तो समाज में कानून का सम्मान बना रहता है। यह सम्मान सिर्फ मेरा नहीं है, बल्कि मेरे सभी सहयोगी अधिकारियों, कर्मचारियों और जनता का है। यह सराहना हमें आने वाले समय में और अधिक निस्वार्थ और समर्पित होकर काम करने की प्रेरणा देगी।””एकता संगठन” के समन्वयक फारुक शेख ने “ध्येय न्यूज” से बात करते हुए कहा —
“सम्मान एक प्रेरणा है, संतोष नहीं। पुलिस का कर्तव्य समाज में विश्वास पैदा करना होता है, और पुलिस निरीक्षक संदीप पाटिल साहब उसकी जीती-जागती मिसाल हैं।”यह “सौ दिन की योजना” केवल एक आंकड़ा नहीं, बल्कि कार्यक्षमता का दर्पण है। इस तरह की पहल से न केवल अन्य जिलों के पुलिस थानों को मार्गदर्शन मिलेगा, बल्कि यह भी स्पष्ट होगा कि एक जिम्मेदार अधिकारी कानून के पालन की सीमाओं को किस ऊँचाई तक पहुँचा सकते हैं।संघठन के सदस्यों ने इस आयोजन की योजना बिना किसी राजनीतिक प्रचार, बिना शोर-शराबे के, केवल सच्चे और कृतज्ञ भाव से बनाई। यह पहल समाज के युवाओं, छात्रों और अन्य संगठनों के लिए भी एक संदेश है कि वे भी इसी तरह ईमानदार और कर्तव्यनिष्ठ अधिकारियों को आगे बढ़ने की प्रेरणा दें।आज जब कई बार पुलिस व्यवस्था पर आरोप लगते हैं, प्रश्न उठाए जाते हैं, ऐसे समय में एमआईडीसी पुलिस स्टेशन और संदीप पाटिल साहब ने अपने कर्म के माध्यम से जवाब दिया है। उनकी कार्यशैली में पारदर्शिता, अनुशासन और जनसामान्य से जुड़ाव का समन्वय दिखाई देता है।”एकता संगठन” द्वारा दिया गया यह सम्मान केवल एक व्यक्ति का नहीं, बल्कि समर्पित कर्तव्यों और आदर्शों का गौरव है — जो आने वाली पीढ़ी के पुलिस अधिकारियों के लिए एक प्रेरणास्तंभ बनेगा।

शिक्षक वेतन रखडल्याने ठिय्या आंदोलनाला अखेर यश

Loading

जळगाव – जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे नियमित वेतन रखडल्यामुळे अखेर संतप्त शिक्षकांनी जिल्हा कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. कोषागार कार्यालयातील दुर्लक्ष, दिरंगाई आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या अडमुठ्या धोरणामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे अनेक शिक्षकांच्या आर्थिक नियोजनावर प्रतिकूल परिणाम झाला होता. अखेर

एस.डी. भिरुड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या जोरदार आंदोलनामुळे वेतनाचे अडथळे दूर झाले आणि शिक्षण खात्यावर रक्कम जमा झाल्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतन बिल संदर्भात प्रशासनाकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती. एप्रिल महिन्याचे पगार बिल सादर करण्यास वेतन पथक टाळाटाळ करत होते. यामागे शालार्थ आयडी घोटाळा असल्याचे सांगून काही काळ तपासाच्या नावाखाली बिल थांबविण्यात आले होते. शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांचे वेतन रोखून ठेवण्याची ही एक प्रकारे अन्यायकारक बाब होती. याबाबत शैक्षणिक व्यासपीठाने वेळोवेळी निवेदनांद्वारे तसेच चर्चा करून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाचा अडेलतट्टूपणा सुरूच राहिला.
मार्च महिन्याचे वेतन बिल जेव्हा शेवटी सादर करण्यात आले, त्यावेळीही अकाउंट नंबर मिसमॅच मुळे बिल मंजुरीसाठी थांबविण्यात आले. ही बाब इतकी गंभीर नव्हती की, शिक्षकांचे संपूर्ण वेतन रोखावे लागेल. यावरून स्पष्ट होते की, संबंधित विभाग आणि अधिकारी यांचे एकंदर धोरण शिक्षक विरोधी होते. हे बिल मंजूर न झाल्यामुळे एप्रिल महिन्याचे बिलही सिस्टीममध्ये सादर होऊ शकत नव्हते. शिक्षकांना दोन महिने वेतन न मिळाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांची मोठी कुचंबणा झाली होती.
ही समस्या जिल्हा स्तरावर न सुटणारी असल्यामुळे राज्य पातळीवरून हस्तक्षेपाची गरज होती. कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी स्वतः पुढाकार घेऊन समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. मात्र काही अडथळ्यांमुळे आणि उच्चस्तरीय निर्णयांच्या प्रतीक्षेमुळे परिस्थिती बदलत नव्हती. त्यामुळे जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने आमदार सत्यजित तांबे यांच्याशी थेट संपर्क साधून शिक्षकी वेतनासंदर्भातील तांत्रिक अडथळा दूर करण्याची विनंती केली. आमदार तांबे यांनीही सकारात्मक भूमिका घेत वरिष्ठ प्रशासन स्तरावरून या प्रश्नाचे निराकरण घडवून आणले.
वरिष्ठ स्तरावरून मंजुरी मिळूनही कोषागार कार्यालयाने वेतन बिल मंजूर करण्यास चालढकल सुरू ठेवली होती. यामुळे जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. एस.डी. भिरुड यांच्या नेतृत्वाखाली कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिक्षकांची भूमिका स्पष्ट होती – वेतन खात्यावर रक्कम जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही! त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला जाग आली.
आंदोलन सुरू असतानाच कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी तातडीने संबंधित विभागाशी समन्वय साधून सर्व बिले मंजूर केली. यानंतर वेतन खात्यावर संबंधित रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. शिक्षकांमध्ये यावेळी समाधानाची भावना होती, मात्र आंदोलनकर्त्यांनी कोषागार कार्यालयातील दिरंगाई व कर्मचाऱ्यांच्या अडमुठ्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला.
या आंदोलनात जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. प्रा. सुनील गरुड, बाळासाहेब पाटील, राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, प्रविण पाटील, अरुण सपकाळे, एस.के. पाटील, अतुल इंगळे, एन.ओ. चौधरी, प्रदीप वाणी, गोपाळ पाटील, गोपाळ महाजन, सारंग जोशी, साहेबराव बागुल, चंद्रकांत कोळी, किरण पाटील, दिनेश पाटील, मनोज वाघ, गजानन किरंगे, एन.बी. पाटील, सचिन माळी, विलास पाटील आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अनेक शिक्षकांनी आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की, सणासुदीच्या काळात किंवा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद ठरलेल्या वेतनावर अवलंबून असते. शासनाच्या नियमानुसार दर महिन्याला वेतन देणे ही मूलभूत जबाबदारी असून ती वेळेवर न मिळाल्यास शिक्षकांचा आत्मसन्मान दुखावतो. शासन शिक्षणाच्या गुणवत्तेच्या गप्पा मारते, पण शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करते, ही मोठी शोकांतिका असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
या संपूर्ण घडामोडीमुळे प्रशासनाला एक गोष्ट निश्चितपणे समजली – शिक्षकांचे संयमाचाही अंत असतो. अन्याय सहन करणार नाही, आणि गरज भासल्यास संघटित होऊन रस्त्यावर उतरायला शिक्षक मागेपुढे पाहत नाहीत. कोषागार कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ज्या कर्मचाऱ्यांनी मुद्दाम अडथळे निर्माण केले, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने एक बाब स्पष्ट झाली आहे – प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आणि समस्या दुर्लक्षित केल्यास शिक्षक आंदोलनाच्या पद्धतीने आपला आवाज बुलंद करतील. शिक्षणव्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या आंदोलनाने प्रशासनाला जबाबदारीची आठवण करून दिली आहे आणि भविष्यात अशा प्रकारे वेतन रखडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

गटारीतून साचलेली समस्या – पाचोऱ्यात बांधकामामुळे नाले तुंबले; नागरिक त्रस्त, पालिकेकडे तातडीच्या उपायांची मागणी

Loading

पाचोरा – शहरातील गटारी आणि नाले व्यवस्थापन ही नेहमीच महत्त्वाची बाब राहिली आहे. पावसाळा जवळ येत असतानाच्या या काळात पाचोरा नगरपालिकेने विविध भागांतून नाले सफाईची मोहीम हाती घेतली असून, काही ठिकाणी ती समाधानकारक रित्या पारही पडली आहे. मात्र, शहरातील काही प्रभागांमध्ये नागरिकांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा गटारीत गाळ साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या भागातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
अलीकडेच पाचोरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने, विभाग प्रमुख तुषार नकवाल यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली, मार्केट परिसर व काही रहिवासी भागातील गटारींमधील साचलेला गाळ व मलबा जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आला होता. त्या कामाची सर्व स्तरांतून स्तुतीही झाली. मात्र, या उपक्रमानंतर काही दिवसांतच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा गटारीतील गाळ वाहून येण्यास सुरुवात केली. परिणामी, ज्या ठिकाणी सफाई झाली होती, तेथेच पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
या स्थितीमागे केवळ निसर्ग कारणीभूत नाही, तर मानवी निष्काळजीपणाही तितकाच जबाबदार आहे. तो म्हणजे घराच्या दुरुस्ती व नवीन बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी घरकामात वापरलेली वाळू, माती, सिमेंटचे तुकडे, प्लास्टरचा मलबा तसेच गटारीच्या तोंडाशी पडलेली झाडांची फांदी यांचा योग्य प्रकारे निपटारा केलेला नाही. परिणामी, हे सर्व साहित्य पावसामुळे गटारीत वाहून जाऊन पुढच्या बाजुला साचले आहे. ही बाब इतकी गंभीर आहे की, या गाळामुळे मार्केटपासून गो.से.हायस्कूल परिसरापर्यंतच्या दोन्ही बाजुच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला आहे. साई प्रोव्हिजन स्टोअरपासून ते गो.से.हायस्कूलच्या नाल्यापर्यंत साचलेला मलबा आणि झाडांच्या अडथळ्यांमुळे सांडपाणी व पावसाचे पाणी योग्य मार्गाने वाहून जाण्याऐवजी परिसरात साचू लागले आहे.
या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. अनेक वेळा यामुळे दुर्गंधी निर्माण होते, डासांची उत्पत्ती वाढते आणि पावसात पाणी घरात शिरण्याचा धोका अधिकच गंभीर होतो. मागील वर्षाचा पावसाळ्यातील अनुभव लक्षात घेता सदरचे पाणी थेट DYSP साहेब यांचा बंगला व ऑफिस तसेच मेहरबान न्यायालय आवारात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते याशिवाय श्री गो से हायस्कूलमध्ये जाणे येण्यासाठी तर रस्ता राहिला नव्हता परिणामतः लहान मुले, वृद्ध व आजारी लोकांसाठी ही समस्या अधिक त्रासदायक ठरते.
विशेष बाब म्हणजे, ज्या भागात ही समस्या आहे त्या भागात नियमित सफाई कर्मचारी दिसत नाहीत. गटार कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याची तक्रार आहे. गटारीची सतत निगा राखणे आवश्यक असताना पालिकेचे गटार सफाई कर्मचाऱ्यांकडे लक्ष कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अशा वेळी अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण मेहनत वाया गेल्याचे चित्र नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे.नागरिकांच्या तक्रारीनुसार बांधकाम करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. सार्वजनिक रस्त्यावर किंवा गटारीजवळ बांधकाम साहित्य टाकणे हे केवळ अन्यायकारकच नाही तर कायद्यानेही दंडनीय आहे. पाचोरा नगरपालिकेने अशा बांधकामकर्त्यांना तातडीने नोटीस बजावून त्यांच्या मलब्याची त्वरित विल्हेवाट लावावी, व त्याचा खर्च दंडासह संबंधितांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एक लेखी निवेदन तयार करून पाचोरा नगरपालिकेचे मा. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे सादर केले असून, त्यामध्ये त्यांनी खालील गोष्टींची मागणी केली आहे:

  1. मार्केटपासून साई प्रोव्हिजन स्टोअर ते गो.से.हायस्कूलच्या नाल्यापर्यंत साचलेल्या गाळाची व बांधकाम मलब्याची तातडीने सफाई करण्यात यावी.
  2. झाडांच्या तुटलेल्या फांद्या व अडथळा निर्माण करणारा साठा हटवण्यात यावा.
  3. संबंधित बांधकामकर्त्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उर्वरित मलबा उचलून घेण्याची कार्यवाही करावी.
  4. या परिसरात दररोज नियमितपणे गटारी सफाई कर्मचारी नेमण्यात यावा.
  5. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागाला विशेष प्राधान्याने तपासले जावे.
    या निवेदनामध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, न पा प्रशासक एकदा का गटारी स्वच्छ करतात किंवा त्यासाठी प्रयत्न करतात, तरीही जर इतरांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा गाळ साचत असेल, तर त्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. नगरपालिकेने बांधकाम परवानगी देताना नियमांचे काटेकोर पालन होत आहे का याचे निरीक्षण करावे, अशी सूचनाही यात आहे.तरी देखील संबंधित लोक त्याचे पालन करत नाहीत
    पाचोरा नगरपालिकेचे मा. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सकारात्मक उपक्रम राबवले असून, नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आशा आहे की, सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभाग तातडीने हालचाल करेल आणि परिसरातील गटारी पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात येतील.
    या प्रकरणातून एक बाब स्पष्ट होते की, नागरिक, प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक या तिघांनीही आपापली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. कारण गटारी स्वच्छ असतील तरच आरोग्यदायी परिसराची हमी दिली जाऊ शकते. अन्यथा वर्षानुवर्षे असाच त्रास होत राहील आणि त्यातुन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढू शकते.
    संपूर्ण शहरासाठी ही एक जागरूकतेची घंटा आहे – केवळ गटारी सफाई पुरेशी नाही, तर नागरिकांनीही आपली कर्तव्ये पार पाडत नियम पाळले, तरच ‘स्वच्छ पाचोरा, आरोग्यदायी पाचोरा’ हे ध्येय प्रत्यक्षात येईल.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!