Home Dhyeya News Special पाचोऱ्यात आज बाप्पांच्या भव्य – दिव्य स्पेशल झगमगटासह आगमनाचा जल्लोष; ७५ ढोल-ताशांच्या...

पाचोऱ्यात आज बाप्पांच्या भव्य – दिव्य स्पेशल झगमगटासह आगमनाचा जल्लोष; ७५ ढोल-ताशांच्या समूहातून भक्तीचा गजर, ३० मुलींचा विशेष सहभाग

0
118

Loading

पाचोरा – शहरातील गणेशोत्सवाच्या उत्साहाला आज, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य आणि देखण्या सोहळ्याची रंगत लाभणार आहे. संस्कृती, परंपरा आणि उत्सवप्रियतेची ओळख जपणाऱ्या रॉयल गृप गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा गणपती बाप्पांच्या आगमनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, छ. शिवाजी महाराज चौक ते गणपती मंडपा पर्यंतचा

परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे. या आगमन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते जळगाव येथील विश्वगर्जना ढोल पथक. तब्बल ७५ ढोल-ताशांच्या समूहाचा निनाद आणि त्यामध्ये ३० मुलींचा उत्स्फूर्त सहभाग हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण राहणार आहे. ढोल-ताशांच्या तालावर बाप्पांच्या आगमनाचा क्षण अनुभवताना उपस्थितांच्या  अंगावर रोमांच उभे राहतील, अशी तयारी करण्यात आली आहे. ढोल-ताशांच्या गजरासोबतच चेतन लाईट शोच्या नेत्रदीपक प्रकाशझोताने संपूर्ण मार्ग उजळून निघणार आहे. त्याचबरोबर OM SAI ON SAI यांचा DJ ओम साई 2.0, फटाक्यांची आतिशबाजी, पेपर शॉट, कोल्ड फायर, स्मोक मशीन यांसारख्या विविध आकर्षणांची आतषबाजीही उपस्थितांना

अनुभवता येणार आहे. प्रकाश, ध्वनी आणि भक्तीचा अनोखा संगम या निमित्ताने पाचोरेकरांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, रॉयल गृप गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या आगमन सोहळ्याला केवळ मनोरंजनाची जोड न देता गणेशभक्ती, शिस्त आणि संस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी महिला, पुरुष, युवक, युवती तसेच बालगोपाळांची मोठी उपस्थिती राहण्याची शक्यता असून, हजारो नागरिकांच्या साक्षीने हा सोहळा अविस्मरणीय करण्याचा मंडळाचा मानस आहे. आई मरी माता गल्ली, पाचोरा येथील रॉयल गृप गणेशोत्सव मंडळ आपल्या वैभवशाली परंपरेला यंदाही नवा आयाम देत आहे. “परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन” या मूल्यांची सांगड घालत “भव्यतेची परंपरा, संस्कृतीची जोपासना” हा संदेश घेऊन बाप्पांचे स्वागत करण्यात येणार आहे. पाचोरा शहरात प्रथमच अशा भव्य स्वरूपात साकारला जाणारा हा आगमन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. बाप्पांच्या मंगलमय आगमनाचा हा क्षण डोळ्यांत साठविण्यासाठी पाचोरेकरांनी सहकुटुंब उपस्थित राहून भक्ती, उत्साह आणि संस्कृतीच्या या अनोख्या सोहळ्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रॉयल गृप गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/royal_group_pc/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!