Home Dhyeya News Special श्री समर्थ गोविंद महाराज सहकारी पतसंस्थेची सातत्याने प्रगती; सभासदांना 12 टक्के लाभांश...

श्री समर्थ गोविंद महाराज सहकारी पतसंस्थेची सातत्याने प्रगती; सभासदांना 12 टक्के लाभांश मंजूर

0
43

Loading

पाचोरा – येथील श्री समर्थ गोविंद महाराज सहकारी पतसंस्थेची आर्थिक वाटचाल सातत्याने प्रगतीपथावर असून, संस्थेच्या सर्व सभासदांच्या भरीव सहकार्यामुळे संस्थेने आर्थिक वर्ष मार्च 2026 अखेर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या आर्थिक प्रगतीला सातत्याने चालना मिळत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थेने समाधानकारक व भरीव नफा मिळवला असून, सभासदांच्या हिताला प्राधान्य देत मिळालेल्या नफ्यातून प्रत्येक भागधारकास 12 टक्के लाभांश (डिव्हिडंट) देण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. संस्थेच्या या निर्णयामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण असून, संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा थेट लाभ सभासदांना मिळणार आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळासोबतच सर्व सभासदांचा विश्वास, सहकार्य व संस्थेच्या व्यवहारातील सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे भविष्यातही संस्थेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सभासदांनी संस्थेशी असलेले सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाने केले आहे. दरम्यान, 12 टक्के लाभांशाची रक्कम सभासदांना 1 ऑक्टोबर 2026 पासून संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित सभासदांनी संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला लाभांश घेऊन जावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाभांश वितरणासाठी संस्थेच्या कार्यालयाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!