Breaking

सचिन अहिर म्हणजे गिरणी कामगारांच्या प्रश्नावर खंबीरपणे लढणारे नेतृत्व – खा.अरविंद सावंत

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गिरणी कामगारांच्या प्रश्नावर केंद्राची भूमिका क्लेशकारक राहीली आहे. त्याविरुद्ध खंबीरपणाने लढलं‌ नाहीतर कामगार उध्वस्त होतील. परंतु सुदैवाने गिरणी कामगारांना आमदार सचिन अहिर यांच्या रूपाने लढाऊ नेतृत्व लाभलं आहे, ते कामगारांना निश्चितच न्याय मिळवून दितील, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते, खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय मिल

मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने गुरुवार २१ मार्च अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या ५२ व्या वाढदिवसाच्या औचित्याने परळच्या महात्मा गांधी सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या‌‌वेळी‌ खासदार अरविंद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार सचिन अहिर यांना शुभेच्छा

देताना ते‌ पुढे म्हणाले, त्यांनी या प्रश्नामागे आश्वासक ताकद उभी केली, त्यामुळेच कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.याप्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, महाराष्ट्र इंटकचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. कैलास कदम, इंटकचे दिवाकर दळवी, मुकेश तिगोटे यांनीही आमदार सचिन अहिर यांचे अभिष्टचिंतन केले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची

महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल अध्यक्षांच्या वतीने त्यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी गोविंदराव मोहिते म्हणाले, अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर खर्‍या‌ आर्थाने कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांचा वारसा पुढे नेत आहेत. कामगारांचे प्रश्न कधी संघर्ष तर कधी सामंजस्याच्या मार्गाने सोडविण्यात त्यांनी यश मिळविले आहे.
‌याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे

नरेंद्र राणे, शे.का.प.चे नगरसेवक प्रकाश म्हात्रे, खजिनदार निवृत्ती देसाई, उत्तम गिते, संजय कदम, अवधेश पांडे यांनी सचिन अहिर यांच्या अष्टावधानी पैलूंवर भाष्य केले.आमदार सचिन अहिर म्हणाले, आपण कामगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर असेच लढत रहाणार आहोत.सर्वश्री अण्णा शशिर्सेकर, सुनिल अहिर, राजन लाड, सुनिल बोरकर, मिलिंद तांबडे, शिवाजी काळे, किशोर रहाटे,साई निकम आदी संघटनेचे पदाधिकारी, कामगार

सेनेचे पदाधिकारी तसेच विविध व्यवस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले. आमदार सचिन अहिर यांच्या ५२व्या वाढदिवसाच्या औचित्याने विविध कारखान्यांमध्ये कामगार प्रतिनिधींनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. आयडियल स्पोर्ट क्लबच्या सहकार्याने बुध्दीबळ स्पर्धाही पार पडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here