Breaking

सौ वैशालीताई नंतर अमोलभाऊ शिंदे यांची वाढती प्रतिमा & प्रतिष्ठासह पक्षश्रेष्ठींचा विशेष आशिर्वाद बघता आता त्यांच्या बाबतही अफवा

0

झुंज & ध्येय न्युज पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना खुद्दार गटाच्या म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वैशालीताई सूर्यवंशी तर भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक नामदार गिरीशभाऊ महाजन तसेच पक्षप्रमुख बावनकुळे साहेब यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त असलेले अमोलभाऊ शिंदे या दोघांमध्ये पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक चुरशीशी होणार आहे हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे

काही महिन्यांपूर्वी वैशालीताई सूर्यवंशी या आपले पिताश्री स्व तात्यासाहेब आर ओ पाटील यांची पक्ष व जनतेशी असलेली निष्ठा तसेच बदलीचे पैसे – टक्केवारीचा डाग न लागू देतात दोन वेळा विधानसभेचे केलेले नेतृत्व लक्षात घेता वैशालीताई सूर्यवंशी यादेखील उद्धव साहेबांच्या खुद्धार शिवसेनेत सक्रिय झाल्या आता -आता पर्यंत त्या लोकसभेच्या उमेदवार असतील विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत अशी अफवा जोरदार सुरू होती किंबहुना लोकांचा रक्षाबंधन कार्यक्रमामुळे काही प्रमाणात समज देखील झाला होता परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर या अफवेला पूर्णविराम मिळत नाही तोच

आता आणखी एक अफवेमध्ये भर पडली ती म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव प्राप्त केलेले भारतीय जनता पक्षाचे पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांच्या बाबत उलट सुलट चर्चा व अफवा

सुरू झाल्यात ही बातमी प्राप्त होताच निर्भीड पत्रकारीता करणारे परंतु लाचारी पत्रकारीता न करणारे झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजचे पत्रकार तथा संपादक संदीप महाजन यांनी अमोलभाऊ शिंदे यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रीया व सत्यता विचारली असता त्यांनी सांगितले
मी भारतीय जनता पार्टी सोडून कुठल्यातरी पक्षात जात असल्याबाबतच्या अफवा विविध समाज माध्यमांमध्ये व काही वृत्तवाहिनीवर सुरू असल्याचे आत्ताच मला कळलं मी आपणास सर्व जनतेला सांगू इच्छितो की मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून, माझे नेते संकटमोचक, आदरणीय गिरीषभाऊ महाजन & पक्ष प्रमूख मा. बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठपणे पक्ष वाढीसाठी माझे काम सुरू आहे & पुढेही असेच सुरू राहील पाचोरा-भडगाव तालुक्यातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असल्या अफवांकडे मुळीच लक्ष देऊ नये.
अपणासह सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की आज मी श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे आलो आहे येथून पुढे माझ्या मुलीच्या शैक्षणिक प्रवेशासाठी इंदोर येथे जाणार आहे तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी विचलित न होता पक्ष संघटनेचे कार्य सुरू ठेवावे हे तर अजून सुरुवात आहे आणखी बऱ्याच उलट सुलट चर्चा किंवा अफवा पसरवून गैरसमज पसरू शकता म्हणून कोणीही यावर विश्वास ठेवू नये जय श्रीराम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here