पाचोरा शहरात जलदगतीने अधिकारी वर्गाचा विकास, जनतेच्या विकासाचे काय?

0

पाचोरा –  शहरातील वसुंधरा अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही शहराच्या विकासात काही विशेष बदल जाणवत नाही. शासनाने सुमारे ५० लाख रुपयांचे न पा प्रशासनाला दिले जाणारे बक्षीस का दिले जात आहे शासनाचा माझी वसुंधराचा निधी कुठे आणि कशासाठी वापरले गेला याबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शंका निर्माण झाली आहे. या निधीचा नेमका वापर कसा झाला आणि कोणत्या कामांसाठी झाला, याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे ‘माझी वसुंधरा’ फंडाचे योग्य नियोजन आणि कार्यान्वयन झाले का, याबद्दल नागरिकांमध्ये शंका आहे.
विशेष म्हणजे, पाचोरा नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या एका संवर्ग अभियंत्याने अवघ्या दोन वर्षांत आपल्या गावी राजमहाला प्रमाणे मोठा बंगला बांधला आहे. पाच वर्षांपूर्वी भाड्याच्या घरात राहणाऱ्या या अधिकाऱ्याचा इतक्या कमी वेळात झालेला आर्थिक विकास अनेकांच्या नजरेत आला आहे. या प्रकारामुळे शहरातील अनेक भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या भ्रष्ट आचारधर्माबद्दल शहरात चर्चा सुरू आहे.
विकासाचे काम तर दूर, पाचोरा शहरातील नागरी सुविधांवर अजूनही मर्यादा आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने, जनतेचा विकास न होता केवळ त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी निधीचा वापर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नागरी सुविधांच्या कमतरतेमुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाचोरा शहर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लकी ठरले आहे असे उपहास म्हणता येईल
लाच – लुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत विकास योजनांचा नीट आढावा घेतला जावा आणि भ्रष्टाचाराविरोधात ठोस पावले उचलली जावीत, अशी मागणी झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजच्या वतीने केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here