पाचोरा विधानसभा मतदार संघात पक्षपाती धोरणांचा अनुभव घेत असलेल्या राजकीय नेत्यांना सल्ला नाही, परंतु असे माझे मत आहे

0

नासिक विभागात आगामी विधानसभा 2024 निवडणुकीत पैसा आणि गुंडगिरीसह शासकीय & निमशासकीय काही अधिकारी – कर्मचाऱ्यांची दबंगगिरी & पक्षपाती पणा बघायचा असेल तर पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातच मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल हे गेल्या दोन महिन्यांपासून मी सांगत आहे किंबहुना त्याचा काही प्रमाणात अनुभव काही राजकीय नेत्यांनी घेतला देखील आहे गुंडगिरीसह शासकीय & निमशासकीय काही अधिकारी – कर्मचाऱ्यांची दबंगगिरी & पक्षपाती पणा हे कोणासाठी हे कोण करतो हे अधिक सांगायची गरज नाही ते सर्वश्रृत आहे
परंतु हे देखील महत्वाचे आहे कोणीही राजमुकूट कायमस्वरूपी घेऊन आलेलं नाही आणि गुंडगिरी कायम कोणाचीही चालत नाही हे जळगाव जिल्ह्यातील राजकीय सत्तेचे व गुंडगिरीचे उदाहरण आहे व नंतर काय परिस्थीती होते हे सुद्धा आपण बघत आहोत
    अशा पक्षपाती पणाचा अनुभव घेणाऱ्या राजकीय मान्यवरांना सल्ला नव्हे तर हे माझे मत आहे पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघात शासकीय & निमशासकीय काही अधिकारी – कर्मचाऱ्यांची दबंगगिरी & पक्षपाती पणा  करणाऱ्यां विरुध्द एकजुट होऊन करेक्ट कार्यक्रम करणे आवश्यक आहे नाहीतरी
असे पण गेल्या दहा वर्षांत कोणत्याच कार्यालयात काम फुकट झालेले नाही सर्वाच्या तोंडाला रक्त लागले आहेच मग तो कोणाचाही नातेवाईक , मित्र किंवा टेंडर भरून मासीक पाकीट पुरवणारा भ्रष्टाचारी असो आता तक्रारी & चौकशी नको फक्त करेक्ट कार्यक्रम लावणे तो सुद्धा  लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुनच किंवा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा आणि जी घटना दिली आहे त्याचा उपयोग प्रामाणिक पणे केला आणि योग्य त्या ठिकाणी तक्रारी करून ठेवल्या तर  परिणाम उशिरा असो की लगेच असो तो होतोच याचे उदा जळगाव शहरासह जिल्ह्यात आहे एवढेच काय पाचोरा तालुक्यातील निपाणे प्रकरणी लाचार न होता काही स्वाभिमानी दलीत बांधवांनी योग्य त्या ठिकाणी लढा देऊन पक्षपाती पणा करणारे डी वाय एस पी व त्यांच्या सहकार्याचा  करेक्ट कार्यक्रम लावलाच & लागतोच फक्त योग्य वेळेची व मार्गाची गरज असते
म्हणुन पक्षपाती पणाचे बळी ठरलेले व ठरणारे नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास दृढ होण्यासाठी राजकीय मतभेद विसरून किमान अशा प्रकरणी तरी कार्यकर्त्यांसाठी एक होणे आवश्यक आहे                     
शेवटी
सत्य परेशान हो सकता है,
पराजित नहीं.

(Dhyeya News आणि सा. झुंजचे संपादक: संदीप दा. महाजन
(M.A.B.Ed &
Journalism)
73 8510 8510

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here