पाचोरा – येथील छत्रपती राजे संभाजी महाराज चौकान आज दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी दै. सकाळ चे पत्रकार आणि श्री शेठ मुरलीधर मानसिंगका महाविद्यालयाचे उपप्राचार्य काकाश्री प्रा. सी. एन. चौधरी सर (MO 8087530950 ) यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात चौधरी सरांचा सत्कार विविध स्वरूपात करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते चौधरी सरांना शाल, श्रीफळ, टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्याने झाली. यानंतर राजेंद्र पाटील यांनी सरांना छ. शिवाजी कोण होता? हे ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक भेट दिले, ज्यामुळे चौधरी सरांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सत्कार समारंभा दरम्यान चौधरी सरांच्या पत्रकारीता & शैक्षणिक सह सामाजीक कार्याचा गौरव करताना त्यांचं शिक्षण, पत्रकारितेतील योगदान, तसेच महाविद्यालयीन पातळीवर त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्ययावर प्रकाश टाकण्यात आला. चौधरी सरांनी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने देखील अनेक उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
कार्यक्रमात ग्रुपच्या सर्व सदस्यांनी चौधरी सरांना त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी व यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सदस्यांनी चौधरी सरांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं इतिहास विषयावर मार्गदर्शन कसं प्रेरणादायी आहे, याबद्दल आपापल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचा समारोप गोडधोड आणि चहापानाने करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम विशेषतः छ. संभाजी राजे चौकात झाल्याने त्यांच्या जिवनातील अनेक आठवणी व अनुभवासह मित्रत्वाची आणि आनंदाची आठवण देणारा ठरला. मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.