पाचोरा बसस्थानक परिसरात पाकीटमार व चैन-पोत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलीस कारवाई शून्य !

0

पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात पाकीटमार व चैन, पोत चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रवाशांना

सतत सावधगिरी बाळगावी लागत आहे. विशेषतः महिलांच्या दागिन्यांचे आणि प्रवाशांच्या रोख रकमेचे चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
  बसस्थानक हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, या गर्दीचा फायदा घेत पाकीटमार टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्रस्त नागरिकांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे

तक्रारी दिल्या असूनही पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता शून्य असल्याची टीका होत आहे.
    काही नागरिकांनी सांगितले की, बसस्थानक परिसरात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व प्रवाशांना चोरट्यांचे लक्ष्य बनवले जाते. काही वेळा चोरीनंतर तक्रार देऊनही पोलीस तपास फारसा पुढे सरकत नाही. त्यामुळे चोरटे अधिक

धाडसाने काम करत असल्याचे दिसते.
  बसस्थानक परिसरात फळविक्रेते, चहा-नाश्ता विक्रेते, व अन्य छोटे व्यवसाय करणारे लोकही या घटनांमुळे त्रस्त झाले आहेत. चोरट्यांच्या दहशतीमुळे प्रवाशांनी काही काळासाठी या ठिकाणी येण्याचे टाळले आहे, असे काही स्थानिक दुकानदारांनी सांगितले.
    त्रस्त नागरिकांनी पाचोरा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आम्ही वारंवार तक्रार दिल्या, पण पोलीस केवळ चौकशी करतो म्हणतात. अद्याप एकाही चोरी प्रकरणाचा तपास लागलेला नाही. चोरट्यांना अटक होणे तर दूरच,

पण चोरीच्या घटनांमध्ये अजूनही वाढ होत आहे
   या समस्येवर तोडगा म्हणून नागरिक  बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वाढ करणे, पोलीस गस्त वाढवणे, व चोरट्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या या मागण्यांवर ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा ठेवणे कठीण आहे. शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असून, पाचोरा पोलीस प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here