पाचोरा : पत्रकारिता ही समाजहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी झटणारी प्रमुख संस्था आहे. ती लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न मांडण्यासोबतच सत्याला वाचा फोडणारे महत्त्वाचे साधन ठरते. पत्रकारितेच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत पाचोरा उबाठा शिवसेनेतर्फे 6 जानेवारी 2025 रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सन्मान सोहळा पाचोऱ्यातील मध्यवर्ती शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता होईल. या वेळी समाजहितासाठी कार्यरत असलेल्या पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात येईल.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेच्या माध्यमातून जनहितासाठी केलेल्या कार्याची चर्चा होणार असून पत्रकारांच्या समस्या, त्यांची भूमिका आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवरही चर्चा होईल. हा कार्यक्रम समाजातील प्रत्येक घटकाने अनुभवण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
तरी पाचोरा व परिसरातील सर्व पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पाचोरा उबाठा शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. ठिकाण: मध्यवर्ती शिवसेना कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा
तारीख: 6 जानेवारी 2025 (सोमवार)
वेळ: सकाळी 9:30 वाजता
हा कार्यक्रम पत्रकारांच्या कार्याला मान्यता देणारा आणि समाजहितासाठी त्यांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.