पाचोरा पोलीस स्टेशनवर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन साजरा, विद्यार्थी – विद्यार्थीनींना मार्गदर्शन

0

पाचोरा: आज पाचोरा पोलीस स्टेशनवर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन (रेझिंग डे) सप्ताहानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या

कार्यक्रमात पाचोरा येथील तावरेबाई कन्या शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनींना पोलीस प्रशासनाच्या विविध अंगांबद्दल सखोल माहिती देण्यात आली.
        सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस कार्याचे महत्त्व, सायबर क्राईम, डायल 112, सी टीम, वाहतुकीचे नियम, पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय, पोलीस काका व पोलीस दीदी याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना पोलीस

स्टेशनमध्ये होणाऱ्या विविध कार्यविभागाची माहितीही दिली गेली.
    कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश गणगे यांनी पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे महत्त्व आणि पोलीस क्षेत्रातील प्रमुख बाबींबद्दल मार्गदर्शन केले. त्यात सायबर क्राईम, डायल 112 चा वापर, सी टीमचे कार्य, वाहतुकीचे नियम आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस काकांचा व पोलीस दीदींचा

महत्त्वपूर्ण रोल याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले.
    या कार्यक्रमाला तावरेबाई कन्या शाळेचे अंदाजे 40 ते 50 विद्यार्थी – विद्यार्थीनींना  तसेच शिक्षक जितेंद्र काळेसर , संजय निकुंभ उपस्थित होते. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी जाणीव जागरूकता निर्माण केली.
     कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल सांगितले गेले.विद्यार्थी – विद्यार्थीनींना सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबद्दल योग्य माहिती

मिळाल्याने त्यांच्या मनात पोलीस कार्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
    हा कार्यक्रम विद्यार्थी – विद्यार्थीनींना एक प्रेरणादायक आणि शैक्षणिक अनुभव ठरला. पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यामुळे, त्यांना त्यांच्यासोबतच समाजाची सुरक्षितता कशी सुनिश्चित केली जाऊ शकते याचे ज्ञान मिळाले.
             या कार्यक्रमामुळे विद्यार्थी – विद्यार्थीनींना पोलीस आणि प्रशासनासोबत काम करण्याची, तसेच समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार करण्याची प्रेरणा मिळाली.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here