जळगाव: खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आरंभ मराठी चॅनेलने ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ या भव्यदिव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी थाटामाटात संपन्न झाला. शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य, पत्रकारिता, व्यवसाय, वैद्यकीय आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांतील


मान्यवरांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
आरोग्यसेवेतील विशेष योगदान – डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील
या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरले पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ने गौरवण्यात आले.
डॉ. स्वप्निल पाटील हे एमबीबीएस व एमडी मेडिसिनमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली

सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने पाचोरा-भडगाव परिसरातील गंभीर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरवली आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या रुग्णालयात आयसीयू, एनआयसीयू, किडनी डायलिसिस, सिटीस्कॅन, टू डी इको, पॅथॉलॉजी लॅब, आणि रुग्णवाहिका यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
कोरोना काळातील अभूतपूर्व कार्य
कोरोना महामारीच्या काळात डॉ. स्वप्निल पाटील आणि त्यांच्या टीमने अहोरात्र


सेवा देत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांनी स्वतः कोरोनावर मात करून पुन्हा रुग्णसेवेसाठी झोकून दिले. त्यांच्या सेवाभावामुळे ते ‘कोरोना योद्धा’ म्हणून प्रसिद्ध झाले.
या सोहळ्याला मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते-केळकर (‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘नवा गडी नवं राज्य’ फेम) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते डॉ. स्वप्निल पाटील आणि डॉ. ग्रिष्मा पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार सुरेश मामा भोळे, खान्देशातील विविध क्षेत्रांतील



मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. स्वप्निल पाटील यांचा जीवनप्रवास – प्रेरणादायी आहे
डॉ. स्वप्निल पाटील यांचे शालेय शिक्षण गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे झाले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज व सायन हॉस्पिटल येथे पूर्ण केले. एमडी मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या डॉ. पाटील यांचा प्रवास उत्कृष्ट कामगिरीने भरलेला आहे.
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी कार्डिओलॉजी

फेलोशिप पूर्ण केली. त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन, यूकेकडून डायबेटिस आणि रिनल मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्राप्त केला. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
सिद्धिविनायक हॉस्पिटल – एक आरोग्य मंदिर
२०१९ मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णालयाने अल्पावधीतच परिसरातील लोकांचा विश्वासजिंकला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
‘खान्देश रत्न पुरस्कार २०२५’ सोहळ्याने खान्देशातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाला मान्यता देत समाजातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी

व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवरांच्या उत्साहवर्धक भाषणाने झाली.
डॉ. स्वप्निल पाटील यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलने रुग्णसेवेत नवा मापदंड उभा केला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत खान्देशच्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे मानचिन्ह ठरले आहेत.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.