राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (RIMC) प्रवेश पात्रता परीक्षा 1 जून रोजी; अर्ज करण्याचे आवाहन

0

जळगाव दि. 10 ( जिमाका ): महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. 8 वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. 05 जून 2025 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात. या परिक्षेसाठी विद्यार्थी विद्यार्थीनी उमेदवार दि. 01 जानेवारी, 2026 रोजी कोणत्याही

मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा. या परीक्षेसाठी परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. 31 मार्च 2025 पर्यंत जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थीनी/विद्यार्थ्यांचे वय दि. 1 जानेवारी 2026 रोजी 11 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा

कमी व 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी परीक्षेस पात्र समजण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थ्यांचा जन्म दि. 2 जानेवारी 2013 च्या आधी आणि दि. 1 जुलै 2014 च्या नंतरचा नसावा.
आवेदनपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया परीक्षेचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन

मिलिटरी कॉलेज, हेहराडून उत्तराखंड पिन कोड 248003 यांचेमार्फत मागवता येणार आहे.
ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधरण व इतर संवर्गाकरिता रु. 600/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- पैसे भरून आवेदनपत्र

मिळवता येणार आहे.
डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र मागविण्यासाठी मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्याथी (उमेदवार) करीता रु. 600/- चा डी.डी. व अनुसूचित जाती जमाती करीता रु. 555/- चा डी.डी कमांडंट RIMC फंड, ड्रॉवी शाखा, एचडीएफसी बँक, बल्लुपूर चौक, डेहराडून, (बँक कोड 1399), उत्तराखंड यांचे नावाने काढावा, सदर डी. डी. कमांडंट “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, 248 003या पत्त्याबर पाठविणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/ छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक

आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. तसेच इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होणार आहे.
आवेदनपत्र 2 प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जन्म दाखल्याची

छायाप्रत, उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र छायाप्रत, अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत, विद्यार्थ्यांचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.आधारकार्ड छायाप्रतजोडणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फतसाक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.
आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत

आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आधारकर रिसर्च इन्स्टिटयूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे 411004. या पत्त्यावर दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे पेपर असतील. हा पेपर रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी होणार आहे. लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल. आधिक माहितीसाठी Phone No. 020-29709617, Email: mscepune@gmail.com, Website: www.mscepune.iल या फोन नंबरवर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here