पाचोरा पिपल्स बँकेतर्फे हॅट्रिक विजेते आमदार किशोर पाटील यांचा नागरी सत्कार आणि सीडीएम कॅश डिपॉझिट मशीनचे लोकार्पण

0

पाचोरा : दि पाचोरा पीपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीने हॅट्रिक विजेते कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांचा नागरी सत्कार आणि मुख्य शाखेत सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. या प्रसंगी विविध

सहकारी संस्थांनी आमदार पाटील यांचा विशेष सत्कार केला.                     कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अतुल संघवी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे व्हाईस चेअरमन प्रशांत अग्रवाल यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी बँकेच्या विकासाचा आढावा घेतला आणि

डिजिटल क्रांतीत बँकेने उचललेल्या पुढाकाराबद्दल माहिती दिली.                                                          या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सत्कारकर्त्यांमध्ये पाचोरा पीपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे

चेअरमन अतुल संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांत अग्रवाल, संचालक मंडळ, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन एकनाथ तावडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे

डॉ. जयंत पाटील, डॉ. मनोज पाटील, डॉ. आनंद पाटील, श्रेयस परिवाराचे डॉ. जयंतराव पाटील, जय किरण प्रभा पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बंठीया, जळगाव मजूर फेडरेशनचे संचालक

प्रकाश पाटील, भारतीय जैन संघटनेचे राजेश जैन, गजानन उद्योग समुहाचे प्रमोद सोनार यांचा समावेश होता.      सत्काराला उत्तर देताना आमदार किशोर पाटील म्हणाले, “गेल्या दहा वर्षांतील विकासकामांचा आढावा घेतला तर मतदारांचे उपकार फेडणे शक्य नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने पाचोरा शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी

प्रयत्नशील राहणार आहे. वाघूर धरणावरून ५६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना सुमारे २०० कोटी रुपयांची असून, ती लवकरच पूर्णत्वास नेणार आहे.”                                    पुढे बोलताना पाटील यांनी एमआयडीसीतील समस्या सोडवण्याबाबत प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. सूतगिरणी प्रकल्पाला चालना देऊन रोजगारनिर्मितीवर भर देण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.                           बँकेची प्रगती आणि भविष्यातील उद्दिष्टे                                        अध्यक्षीय भाषणात बँकेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी यांनी बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला.              “मी चेअरमन झालो त्यावेळी बँकेकडे ७५ कोटींच्या ठेवी होत्या, त्या आज दीडशे कोटींवर पोहोचल्या आहेत,” असे त्यांनी

नमूद केले. बँकेने एटीएम, एनईएफटी, ऑनलाइन बँकिंग यासारख्या सेवा कार्यक्षमतेने सुरू केल्या असून जिल्ह्याबाहेरही बँकेचा विस्तार यशस्वीपणे झाला आहे. कार्यक्रमास संचालक अ‍ॅड. अविनाश भालेराव, विकास वाघ, जीवनभाऊ  जैन, डॉ. जयंतराव पाटील, प्रा. भागवत मालपुरे, अविनाश कुडे, प्रमोद बंठीया आदी मान्यवर उपस्थित होते.             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकाश्री प्रा सी. एन. चौधरी यांनी केले, तर आभारप्रदर्शन अ‍ॅड. अविनाश भालेराव यांनी मानले. या भव्य कार्यक्रमाने पाचोरा शहरातील सहकारी संस्थांच्या एकजुटीचे प्रतिक दर्शवले आणि विकास कार्यात केलेल्या योगदानाची दखल घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here