सेंट जोसेफ महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने ‘उद्योजकता प्रशिक्षण अर्थात Enterpreneural Talk Show’ चे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार मधील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी सांगितले, की उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू तितका नफा जास्त कमवितो.
   
प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड म्हणाले, “कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची नितांत गरज असते.”  सदर कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध उद्योजक जॉय डायस म्हणाले, “व्यवसायातील उज्वल यशासाठी आणि भवितव्यासाठी तुमचा जनसंपर्क दांडगा असायला हवा. प्रत्येक ग्राहकाला भगवान मानता यायला हवे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्योजकांचे स्वागत सेल्फ फायनान्स कॉर्डिनेटर डॉ. दीपा लोपीस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबिना कोरीया आणि आभार प्रदर्शन अलिशा तुस्कानो यांनी केले. सदर कार्यक्रमास आई क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. विन्सेंट डिमेलो, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ फायनान्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here