ऐनपूर महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञानातील करिअर संधींवर कार्यशाळा संपन्न

0

ऐनपूर – महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी यावर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना आयटी (IT) क्षेत्रातील विविध संधी, आवश्यक कौशल्ये, उद्योगातील मागणी, आधुनिक तंत्रज्ञान, आणि उच्च शिक्षणाच्या पर्यायांविषयी मार्गदर्शन करणे हा होता.
       कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे कॅम्ब्रिज इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशनच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. रेणुका वनारसे उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच संगणकशास्त्र आणि ग्रंथालय विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. मिलिंद भोपे यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. रेणुका वनारसे यांची ओळख करून दिली. त्यांनी त्यांच्या शिक्षण, संशोधन व व्यावसायिक अनुभवाचा परिचय उपस्थितांना करून दिला.
       यानंतर प्रा. डॉ. रेणुका वनारसे यांनी “माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायिक संधी आणि आवश्यक कौशल्ये” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या सखोल आणि प्रेरणादायी व्याख्यानातून त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संधींबद्दल माहिती दिली. त्यांनी विशेषतः खालील मुद्द्यांवर प्रकाश टाकल
      माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख विभाग:-सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,
डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स,क्लाउड कंप्युटिंग आणि डेव्हऑप्स वेब डेव्हलपमेंट आणि UI/UX डिझाईन=डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स
व्यवसाय व रोजगाराच्या संधी:-
मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये (MNCs) नोकरीच्या संधी ,स्टार्टअप आणि फ्रीलान्सिंगमधील करिअरचे महत्त्व,स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याच्या संधी आणि मार्गदर्शन,विदेशात उच्च शिक्षणासाठी उपलब्ध संधी आणि आवश्यक पात्रता
आवश्यक कौशल्ये आणि प्रमाणपत्रे:-
प्रोग्रामिंग भाषांचा अभ्यास (Python, Java, C++, JavaScript, SQL इत्यादी) ,डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि मशीन लर्निंग ,नेटवर्किंग आणि सायबरसुरक्षा कौशल्ये ,गूगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची माहिती,अपस्किलिंग आणि लाइफलाँग लर्निंगचे महत्त्व
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तर सत्र:- प्रा. डॉ. रेणुका वनारसे यांनी त्यांच्या सखोल व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी दिली. या सत्रात विद्यार्थ्यांनी त्यांच्या करिअरशी संबंधित प्रश्न विचारले. काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावर देण्यात आलेली उत्तरे पुढीलप्रमाणे होती—
प्रश्न: “माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणते कोर्स किंवा प्रमाणपत्रे उपयुक्त ठरू शकतात?”
उत्तर: “Google, AWS, Microsoft, Cisco यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमाणपत्र परीक्षा खूप उपयुक्त ठरतात. Coursera, Udemy, NPTEL आणि EdX यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध अभ्यासक्रम देखील फायदेशीर ठरू शकतात.”
प्रश्न: “नॉन-आयटी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत?”
उत्तर: “नॉन-आयटी पार्श्वभूमी असलेल्यांनाही डिजिटल मार्केटिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, UI/UX डिझाईन यासारख्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण घेतल्यास आणि अनुभव मिळवल्यास यशस्वी कारकीर्द घडवता येते.”
प्रश्न: “फ्रीलान्सिंग किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी कोणते कौशल्य महत्त्वाचे ठरते?”
उत्तर: “फ्रीलान्सिंगसाठी वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझाईन, कंटेंट रायटिंग, डिजिटल मार्केटिंग यासारखी कौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रॉब्लेम-सोल्विंग दृष्टिकोन, व्यवसाय व्यवस्थापन, आणि नवीन तंत्रज्ञानाची जाण असणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले:-“संगणक क्षेत्र हे केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून समाजाच्या सर्वच स्तरांवर तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणानंतर उच्च शिक्षणाच्या संधींचा विचार करावा. तसेच डिजिटल कौशल्ये आत्मसात करून उद्योजकतेकडेही लक्ष द्यावे. केवळ नोकरी मिळवणे हा उद्देश न ठेवता समाज उपयोगी ज्ञान वृद्धीसाठी प्रयत्नशील राहावे. शिक्षण घेत असताना उद्योगधंदे, संशोधन आणि नवोपक्रम (Innovation) यामध्ये योगदान देण्याचे ध्येय ठेवावे.”
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप साळुंके यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले. त्यांनी वक्त्यांचे स्वागत, विषयाची भूमिका, व कार्यशाळेचे स्वरूप स्पष्ट करून विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या महत्त्वाची जाण करून दिली.
     कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मिलिंद भोपे, प्रा. डॉ. संदीप साळुंके, प्रा. कोमल सुतार, प्रा. जागृती पाटील, प्रा. वैष्णवी पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मोलाचे योगदान दिले.
     कार्यक्रमासाठी ४५ विद्यार्थी उपस्थित होते, आणि त्यांनी या कार्यशाळेतून महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली. उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
       ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरली. आधुनिक तंत्रज्ञान, आयटी क्षेत्रातील संधी आणि आवश्यक कौशल्यांविषयी अधिक स्पष्टता मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नवी दिशा मिळाली. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून उज्ज्वल करिअर घडवावे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, हाच या कार्यशाळेचा मुख्य संदेश होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here