*’म्हणी अनुभवाच्या खाणी’ या विषयावर प्रा. नेहा भोसले यांच्या व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद*

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रीमती माणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नेहा भोसले होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी केले. व्याख्यानात प्रा. नेहा भोसले यांनी विद्यार्थिनींना म्हणींचे महत्त्व आणि त्यांचा वापर आपल्या रोजच्या जीवनात कसा करावा हे सांगितले. त्या म्हणाल्या, “लोकजीवनातून आविष्कृत झालेल्या म्हणी भाषा अधिक समृद्ध बनवितात.”

कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या गाण्यात अनेक सुंदर म्हणींचा समावेश आहे, अशा विचारांचे विवेचन त्यांनी केले. तसेच, बोलीभाषेतील म्हणींचा अभ्यास आणि संकलन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमास प्रा. किरण जाधव, डॉ. रेखा शेलार, ग्रंथालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here