पाचोरा-पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित “स्मृतिगंध” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या वेळी पुणे येथील सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि शाहीर ऋतुजा माने यांच्या शाहिरी कार्यक्रम “महाराष्ट्राचा शाहिरी बाणा” याचे सादरीकरण करण्यात आले.
या शाहिरी सादरीकरणात महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित गीते सादर करताना शाहीर चंद्रकांत माने यांनी मॉसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. आपल्या ओजस्वी शैलीत त्यांनी “संस्कारक्षम माता हाच भविष्यातील तेजस्वी पिढी घडवू शकते” असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
आपल्या शाहिरीतून त्यांनी स्पष्ट केले की, “घराघरात मॉसाहेब जिजाऊ जन्माला यायला हव्यात, तरच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर, स्वाभिमानी आणि न्यायप्रिय मावळे घडतील. भावी पिढी संस्कारक्षम आणि सुसंस्कृत होण्यासाठी मातृशक्ती सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे.”
शाहीर ऋतुजा माने यांनी आपल्या शाहिरीतून सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या कार्यालाही उजाळा दिला. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला आणि दिवंगत पदाधिकाऱ्यांचे स्मरण केले.
यावेळी कै. द. मो. परांजपे, कै. बाबूभाई रावल, कै. माजी आमदार सू. भा. पाटील, कै. माजी मंत्री बापूसाहेब के. एम. पाटील, कै. माजी आमदार अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ, कै. अॅड. आर. एस. थेपडे, कै. अॅड. भाईसो वाय. बी. शर्मा, कै. अॅड. एस. आर. देशमुख यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “पी.टी.सी. संस्था म्हणजे संस्कारक्षम पिढी घडवणारे विद्यापीठ आहे. या संस्थेने आम्हा अधिकाऱ्यांना घडवून देशसेवेसाठी पाठविले आहे, हे आमचे भाग्य आहे.”
या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्हि. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब दगाजी वाघ, संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, अर्जुनदास पंजाबी, खालील दादा देशमुख, प्रकाश एकनाथ पाटील, अण्णासाहेब वासूदेव महाजन, प्रा. भागवत महालपुरे, दादासाहेब योगेश पाटील, सिताराम पाटील सर, दत्ता आबा बोरसे, डॉ. बी. एन. पाटील, डॉ. प्रशांत देशमुख (BOS चेअरमन, KBCNMU, जळगाव), सुचिताताई वाघ, ज्योतीताई वाघ यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील (पाचोरा महाविद्यालय), उपप्राचार्य दीपक मराठे (भडगाव महाविद्यालय), कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. जे. डी. गोपाळ तसेच संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिन्य यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी मानले.
या शाहिरी सादरीकरणामुळे मराठी संस्कृती, स्वराज्य संकल्पना आणि जिजाऊंच्या महान कार्याची नवी उमेद श्रोत्यांना मिळाली.
शाहीर चंद्रकांत माने यांच्या ओजस्वी शब्दांतून उमटलेला संदेश समाजमनात ठसणारा ठरला. “घराघरात जिजाऊ जन्मास याव्यात, तरच शिवबांच्या विचारांची पताका पुन्हा उंचावेल,” ही भावना या कार्यक्रमातून सर्वत्र पसरली.
समाजाच्या उन्नतीसाठी, नव्या पिढीच्या घडणीसाठी आणि इतिहासाच्या उजळणीसाठी अशा प्रेरणादायी कार्यक्रमांची नितांत गरज आहे.
शाहीर चंद्रकांत माने आणि ऋतुजा माने यांच्या शाहिरीने पाचोरा तालुक्यात इतिहासाचा जयघोष घडवला, हे निश्चित!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.