पाचोरा – तालुक्यातील वडगाव टेक येथील मूळ रहिवासी आणि पाचोरा शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ स्वर्गीय ॲड. एच. एन. पाटील यांची नात कु. गरिमा निकित पाटील हिने MPSC मार्फत घेण्यात आलेल्या कर सहायक 2023 परीक्षेत घवघवीत यश संपादन करत राज्यात DT-A प्रवर्गातून चौथा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संपूर्ण कुटुंबासह पाचोरा आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
गरिमा ही निकित पाटील आणि सुवर्णा पाटील यांची कन्या असून, ती डॉ. अस्मिता पाटील यांची भाची आहे. तिच्या कष्ट, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीमुळे तिने हे यश संपादन केले आहे. MPSC परीक्षेसाठी तिने अथक परिश्रम घेतले होते आणि त्याचे फळ आज तिच्या उज्ज्वल भविष्याच्या रूपात मिळाले आहे.
गरिमाच्या या यशाबद्दल संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, शिक्षकवर्ग आणि मित्रपरिवाराकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या यशाने पाचोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
गरिमा निकित पाटील हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ती भविष्यात आणखी मोठी शिखरे पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.