मालेगाव-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांची कन्या कु. भूमीच्या वाढदिवसानिमित्ताने “भूमीरत्न पुरस्कार” प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ महिलांचा “भूमीरत्न पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा शालेय


शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या धर्मपत्नी सौ. अनितामाई भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच मनपा आयुक्त रविंद्र जाधव, प्रांताधिकारी नितीन सदगीर व त्यांच्या पत्नी दामिनी सदगीर, मालेगाव बसस्थानक आगार प्रमुख मनीषा देवरे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शंकूनतला दीदी, भारती दीदी, दाभाडी लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम, माजी संचालक मामको रविष मारू, आश्रय अनाथालयाचे सचिव शामकांत पाटील यांसारखे मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या १३ महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात डॉ. फोरम हिमांशू सोनवणे, इंजि. सौ. शिल्पा राहुल देशमुख, सौ. कविता सुनील कासलीवाल, सौ. संगीता शामकांत चव्हाण, डॉ. सुरेखा सुदाम दप्तरे, सौ. सुरेखा नंदकिशोर भुसे, सौ.सुवर्णा अविष मारू, सरपंच सौ. सुरेखा शरद ठाकरे, सौ. सरोज ब्रिजलाल देवरे (पवार), सौ. शितल अनिल वाघ, कु. तनिशा पुंजराम कापडणीस, सौ. भावना निळकंठ निकम, सौ. वृषाली किरण निकम यांचा समावेश होता तर अविष मारू, तुषार सूर्यवंशी आणि भूषण बच्छाव यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.कु. भूमीच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि मिष्टान्न भोजनाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाने पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत समाजोपयोगी पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श प्रस्थापित केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बेलदार यांनी केले, सूत्रसंचालन प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे इनचार्ज हरीश मारू यांनी केले, तर आभार प्रबंधभूमीचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या नियोजनात वैभव भांबर, दिपक पवार, प्रभाकर सोळुंके, चंद्रकांत गोसावी, बबलू खैरणार, व आश्रय अनाथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.