“शहरी सजावटीच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘स्टुडीओ स्वरुप’ आर्किटेक्चर, इंटेरिअर डिझाईन आणि वास्तु कन्सल्टंट फर्मचा भव्य शुभारंभ!”

0

पाचोरा | दिनांक : १५ मार्च २०२५
सजग विचार, शास्त्रशुद्ध दृष्टिकोन आणि सौंदर्यपूर्ण साकारतेची त्रिसूत्री बाळगून शहरात आता एक नव्या युगाची सुरुवात होत आहे. वास्तुशास्त्र, अंतर्गत सजावट (इंटेरिअर डिझाईन) आणि आधुनिक स्थापत्यकलेची त्रिसंधी साधणारी एक अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण फर्म “स्टुडीओ स्वरुप” याचा भव्य शुभारंभ साजरा होत आहे. हा उद्घाटन सोहळा फाल्गुन कृ. १, शनिवार दि. १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार असून, हा कार्यक्रम शहरी स्थापत्य आणि वास्तु क्षेत्रात एक नवा अध्याय ठरणार आहे.
    हा विशेष सोहळा पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावर, पोलीस लाईनसमोर साजरा होणार आहे. सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात पाचोऱ्यातील विविध मान्यवर, वास्तुविशारद, व्यापारी, उद्योजक, शासकीय अधिकारी, आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीं उपस्थीत राहणार आहे
     या फर्मच्या स्थापनेमागे उभे आहेत दोन प्रेरणादायी तरुण आर्किटेक्ट – आर्किटेक्ट जयेश अविनाश पाटील (B.Arch.) आणि विशाल राजेंद्र सोनवणे. त्यांचा दृष्टीकोन म्हणजे – सौंदर्य, उपयोगिता आणि शास्त्र यांचं समतोल मिश्रण. घर, ऑफिस, व्यावसायिक संकुल, दुकाने किंवा क्लासिक वास्तू – प्रत्येकासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना, कार्यक्षम रचना, आणि शास्त्रीय दृष्टीकोन यांचा संगम साधणं हेच ‘स्टुडीओ स्वरुप’चे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे.
   या फर्मचे संस्थापक आर्किटेक्ट जयेश अविनाश पाटील हे एक कुशाग्र, तंत्रज्ञानाशी सुसंगत, आणि नवसंवेदनेने झपाटलेले तरुण आहेत. त्यांचे वास्तुविशारद क्षेत्रातील शिक्षण “विद्यावर्धन आयडिया कॉलेज, नाशिक” येथे पूर्ण झाले. बाल्यापासूनच त्यांच्या मनात वास्तुशास्त्राविषयी आकर्षण आणि रचनात्मक विचारांची बीजे रोवली गेली होती.
  गो.से.हायस्कूल, पाचोरा येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या कलेच्या अभ्यासासाठी नाशिकमध्ये वास्तुशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यांच्या कामाच्या पद्धतीत नेमकेपणा, कल्पकता आणि भारतीय वास्तुशास्त्राची सखोल समज यांचे उत्तम सामंजस्य पाहायला मिळते.                 आर्किटेक्ट जयेश पाटील यांचे आजोबा बाबा डॉ. विष्णू पाटील हे एक नामवंत व अनुभवी वैद्यकीय अधिकारी होते. तारखेडा बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव. समाजसेवा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रामाणिकतेचे मूल्य त्यांनी आपल्या कुटुंबात रुजवले. आज जयेश पाटील यांचे विचार आणि कामाचे बळ हे त्यांच्या आजोबांच्या संस्कारांचीच साक्ष देतात.
     ‘स्टुडीओ स्वरुप’ ही फर्म केवळ स्थापत्य डिझाईनपुरती मर्यादित नसून, खालील क्षेत्रांमध्ये सेवा देण्याचा संकल्प करते –
नवीन घर , बंगले ,अपार्टमेंट यांची संपूर्ण आराखडा व रचना
व्यावसायिक संकुल, शोरूम, ऑफिसेस यांचे अंतर्गत सजावट डिझाईन
वास्तुशास्त्रावर आधारित सल्ला आणि प्लॅनिंग
नूतनीकरण व पुनर्रचना (Renovation & Remodeling) सेवा
पर्यावरणस्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम बांधकाम कल्पना
    पाचोरा सारख्या शहरात अशा व्यावसायिक फर्मची गरज खूप दिवसांपासून जाणवत होती. पारंपरिक आराखड्यापलीकडे जाऊन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक योजनांची निर्मिती ‘स्टुडीओ स्वरुप’च्या माध्यमातून होणार आहे. यातून नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
     ‘स्टुडीओ स्वरुप’च्या स्थापनेमुळे आता स्थानिक ग्राहकांना देखील जागतिक दर्जाच्या आर्किटेक्चरल व इंटेरिअर डिझाईन सेवा सहज उपलब्ध होतील. यामुळे जिल्ह्याबाहेर जाऊन डिझाईन सल्ला घेण्याची गरज संपेल. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होईलच, शिवाय स्थानिक स्तरावरच रोजगार व विकासाच्या संधीही निर्माण होतील.
    या फर्मच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आपण सर्व नातेवाईक,मान्यवर, कुटुंबिय, मित्रपरिवार व वास्तुशास्त्र प्रेमी यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक – आर्किटेक्ट जयेश अविनाश पाटील, विशाल राजेंद्र सोनवणे व त्यांचा परिवार यांनी केले आहे.संपर्कासाठी खालील क्रमांकांवर आपण थेट संवाद साधू शकता :
मोबाईल : ७०८३१२००३१ / ७७२१०५९७७२

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here