पाचोरा व पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत सर्वच अवैध व्यवसाय पुन्हा बहरत चालला आहे. शहराच्या विविध भागांमध्ये आणि आसपासच्या गावांत सर्वच सट्टा किंगचे एजंट सक्रिय असल्याची माहिती स्थानिक जनतेतून वारंवार समोर येत आहे. मात्र, यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काही निवडक लोकांचेच नाव ते सुद्धा अर्धवट मुद्दामहून उचलून धरले जात आहे, संदीप सांकेतिक चिंन्ह टाकून गैरसमज – संभ्रम निर्माण करण्यापेक्षा थेट पुर्ण नांव टाकणे योग्य आहे तर इतर जास्त सक्रिय असलेल्या एजंटांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना सामान्य जनतेत निर्माण झाली आहे.
सध्या सट्टा व सर्वच अवैध व्यवसायाचे जाळे इतके विस्तारलेले आहे की, त्यामागे कार्यरत असलेले खरे सूत्रधार कोण आहेत, हे जनतेच्या देखील लक्षात येऊ लागले आहे. मात्र दुर्दैवाने, या प्रकरणांतून काही निवडक व्यक्तींनाच टार्गेट करून त्यांच्या विरोधात अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित केल्या जात आहेत, आणि त्यातून लोकांमध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण होत आहे. खरोखरच ज्यांना वाटत असेल असे हे सर्वच अवैध धंदे बंद व्हायला पाहीजे त्यांनी संर्व जंत्री म्हणजेच सर्व पुरावे फोटो ते घेऊन उद्या माझ्या सोबत चला आमची मुंबईची जेष्ठ पत्रकारांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी पत्रकारांचे अधीक्षक स्वीकृती कार्ड वेब न्यूज आणि युट्युब यांच्या समस्या यावर चर्चा होणार आहे त्यावेळी हे सर्वच पुरावे घेऊनआपण CM साहेबांकडे मांडू शकतो मग ना कोणता संदीप. ना कोणी अवैध धंदे होतील तर सर्वच बंद होतील
गेल्या काही काळात एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली आहे – ती म्हणजे संदीप नावाच्या एका व्यक्तीबाबत प्रसारित होणाऱ्या अर्धवट बातम्या. या बातम्यांमध्ये ना कोणते ठोस पुरावे दिले गेले, ना कायदेशीर कारवाई संदर्भातील तपशील. अशा बातम्यांमुळे त्या व्यक्तीबाबत समाजात एकतर्फी प्रतिमा तयार होत असून, सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे.
जर खरोखर एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप करायचे असतील, तर पत्रकारिता हे माध्यम जबाबदारीने वापरले पाहिजे. कोणतेही वृत्त सत्यासहित, ठोस पुराव्यांसह, अधिकृत माहितीच्या आधारे दिले गेले पाहिजे. अन्यथा, हे केवळ वैयक्तिक द्वेषातून किंवा सामाजिक प्रतिमा खराब करण्यासाठीचे कटकारस्थान ठरते.
सट्टा किंगचे मुख्य एजंट अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस बळकट होत चालले आहे. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाई होताना अनेकदा निवडक कारवाई केली जाते, जी केवळ राजकीय, सामाजिक किंवा व्यक्तिगत दबावामुळे घडते असे चित्र निर्माण झाले आहे.
जर सर्वच अवैध धंद्यांना खरोखर आळा घालायचा असेल, तर तो सर्वच धंद्यांना सर्वच पातळ्यांवर समान नियमाने आणि एकसमान कार्यवाहीनेच शक्य आहे. निवडक लोकांवर कारवाई करून इतरांना मोकळं सोडणे, ही एक जुनी आणि अकार्यक्षम पद्धत ठरत आहे. ती केवळ जनतेचा रोष कमी करण्यासाठी केलेली दिखाऊ प्रक्रिया आहे, असाच याचा अनुभव आहे.
पाचोराच काय व परिसरात नव्हे तर संपूर्ण राज्य व देशात सट्टा व्यवसायाच्या विरोधात यापूर्वीही अनेकदा बातम्या झळकल्या, आंदोलन झाली, निवेदने दिली गेली. मात्र, त्यातून फारसा काही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत नाही. कारण, संपूर्ण यंत्रणेतच या व्यवसायाचा आडवा पाठिंबा असल्याची शंका जनतेच्या मनात खोलवर रुजली आहे.
गेल्या दहा वर्षांतील अनुभव सांगतो की, अवैध धंद्यांविरोधात फक्त बातम्यांनी किंवा निवडक पोलिस कारवाईंनी काहीही साध्य होत नाही. कारवाईचे खरे स्वरूप वरून सुरू होऊन खालपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यात पक्ष, गट, व्यक्ती, जात, धर्म यांचा भेदभाव नसावा.
जर एखाद्या व्यक्तीवर कारवाई करायची असेल, तर तो कायद्याच्या आधारे आणि पुराव्याच्या आधारेच होणे अपेक्षित आहे. निव्वळ समाजात दबाव निर्माण करणे, खोट्या बातम्यांमुळे व्यक्तीची समाजातील प्रतिमा डागाळणे, ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक प्रवृत्ती आहे.
“एकच नियम – एकच कायदा” हे तत्व सर्वच समाज घटकांवर लागू व्हावे, ही सर्वसामान्यांची मागणी आहे. मग तो कोणताही अवैध व्यवसाय असो – सट्टा, जुगार, गुटखा, गांजा, दारू, वेशवृत्ती, वाळू तस्करी – सर्वांवर एकसमान कारवाईच हवी.
माध्यमांचा उपयोग हा समाजप्रबोधनासाठी असावा. पण आज अनेक पत्रकारिता करणारे पोर्टल्स, सोशल मीडिया चॅनल्स केवळ “Breaking News” ची स्पर्धा जिंकण्यासाठी अर्धवट माहिती देऊन लोकांच्या मनात चुकीची धारणा निर्माण करत आहेत. त्यामुळेच, वृत्त पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
संदीप नावाच्या व्यक्तीबाबत बातम्यांमध्ये पुरावा नसताना केवळ त्याचे नाव वापरून अफवा पसरवणे, हे एक सामाजिक गुन्हाच आहे. पत्रकारांनी अशा गोष्टींची गंभीर दखल घेतली पाहिजे.
खरोखर निस्वार्थ व कोणत्याही मतलब नसताना अवैध धंदे बंद करायचे असेल तर संपूर्ण समाज, पत्रकार, प्रशासन, पोलीस, राजकारणी व सर्व नागरी संघटनांनी एकत्र येऊन ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. निवडक लोकांवर आरोप करून समाजातील फूट वाढवण्याऐवजी, सट्टाच नव्हे तर संपूर्ण अवैध व्यवसायाला मुळासकट उखडून टाकण्याची गरज वाटत असेल तर
यासाठी लोकशक्ती, प्रशासकीय इच्छाशक्ती आणि पत्रकारितेची निष्ठा एकत्र आली तरच खरे बदल घडू शकतात. अन्यथा, नेहमीसारखे – बातम्या झळकतील, लोक चर्चा करतील आणि सट्टा एजंट पुन्हा आपले जाळे वाढवत राहतील. आणि वाढणारच आहे
संदीप नावाच्या व्यक्तीवर अर्धवट नावाने व अर्धवट बातम्यांच्या आधारे आरोप लावले जात असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण सत्याचा पाठपुरावा करू, पुराव्यावर आधारित माहिती समाजासमोर ठेवू आणि कोणत्याही व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा नष्ट होऊ देणार नाही. संपूर्ण समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे – “जर अवैध धंदे बंद करायचे असतील तर सर्वच करा – निवडक नाही.” अन्यथा, अशा प्रकारच्या निवडक मोहिमा समाजात फक्त संभ्रम आणि फूट निर्माण करतील, समस्या सुटणार नाहीत. आणि पोलीसांनी देखील अशा अर्धवट बातम्या कडे व ब्रेकिंग कडे दुर्लक्ष केलेले बरे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.