“पत्रकारिता ही वृत्ती आहे, पोस्ट नव्हे – संघटनेच्या नावावर बिनदिक्कत खेळणाऱ्यांचा खरा चेहरा”

0

आजकाल स्पेशली पाचोरा शहरात पत्रकारितेच्या नावावर खोटं बोटं प्रस्थापित करत कोणालाही न विचारता त्यांचे स्वखर्चाने समाजासमोर देखावा करण्यासाठी बॅनर लावणे स्वतःला मोठं भासवणाऱ्यांची संख्या वाढतेय. समाजातील एका महत्त्वाच्या चौथ्या स्तंभावर – म्हणजेच पत्रकारितेवर – विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. लेखणीचा आवाज आता हॉटेलमधल्या बाकांवर नुस्तं ओरडून दाखवणाऱ्यांच्या तोंडात अडकतोय. जुनी रेकॉर्डिंग्ज ऐकवून “बायल्याचं” स्वप्न उराशी बाळगणारे आता फक्त “ब्रेकिंग न्यूज”च्या नावाखाली स्वतःचं पोट भरतात.
ज्या पत्रकार संघटनेचं अस्थीत्व नाही ज्या पत्रकार संघटेनेचे घटना व नियमा नुसार राज्य, विभाग, जिंल्हातर सोडाच परंतु तालुका आणि शहराची कार्यकारीणी नाही अशा हॉटेलच्या टेबलावर जन्म झालेल्या पत्रकार संघटनेत पदं पत्रकार नसलेल्या ना घेण्याची व वाटपाची चढाओढ आज समाजात स्पेशली पाचोऱ्यात प्रतिष्ठेचा भाग बनली आहे, पण त्यामागची खरी जबाबदारी, नैतिकता आणि पात्रता कुठे हरवली आहे हे विचारण्याची वेळ आता आली आहे. एखाद्या व्यक्तीला पत्रकार म्हणवून घेण्यासाठी फक्त आयडी कार्ड, माईक आणि ग्रुप फोटो पुरेसं ठरत नसेल – त्यासाठी आवश्यक आहे ती चोख लेखणी, प्रगल्भ वाचन, सखोल अभ्यास आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन. असे गुण नसलेले पत्रकार कधीही समाजाचा आवाज बनू शकत नाहीत.
पत्रकारिता म्हणजे हॉटेलच्या टेबलावर बसून & पोलीस स्टेशनला चकरा मारून 25% वर  शिकारचा शोध घेणे नव्हे, तर जमिनीवर उतरून वास्तव समजून घेणं. ती खरी पत्रकारीता
आज पाचोर्‍यात वर्षातून तीन चार वेळा कार्यक्रम घेतात पत्रकार असल्याचं भासवतात “पत्रकारांचा विमा काढायचा”, “डोनेशन द्या”, “पत्रकार सुरक्षा निधी” ज्या पुरस्काराचे स्वतःच्या तोंडून नाव घेण्याची लायकी नाही अशा नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करतात. पण जेव्हा खरंच एखादा पत्रकार आपल्या कर्तव्यात जीव गमावतो, त्याच्या कुटुंबाकडे मदतीचा हात पुढं करायची वेळ येते – तेव्हा फक्त ढंडोरा वाजवतात आम्ही विम्याचा चेक देणार आहोत नंतर हेच मंडळी गायब होतात. एवढेच काय संकलित केलेल्या निधीतून त्या मृत पत्रकाराच्या कुटुंबाला ‘विमा कंपनीचा अधिकृत धनादेश’ द्यायची साधी नैतिकता दाखवली असती, तरी कदाचित त्या दिवंगत पत्रकाराच्या आत्म्याला शांती मिळाली असती.
अशा परिस्थितीत, जेव्हा कोणी स्वतःला पत्रकार म्हणून मिरवतो, तेव्हा त्याच्या लेखणीवर, कर्तृत्वावर आणि सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्न विचारणं ही लोकांची जबाबदारी आहे. “कोणतंही मोठं नाव हे विश्वासार्हतेचं प्रतीक नसतं.” आज हे प्रकर्षाने समजून घ्यायची गरज आहे.
समोरासमोर बोलणं हेच खरं पत्रकारितेचं लक्षण
जे खरे पत्रकार असतात, जे एका “बापाचे” असतात – ते नेहमी स्पष्ट, थेट आणि निर्भीड असतात. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात कोणतीही दुटप्पी भूमिका नसते. ते समोरासमोर मुद्दे मांडतात, संवाद साधतात आणि निर्माण झालेली प्रत्येक गोंधळाची स्थिती मोकळेपणाने स्पष्ट करतात.
पण जे लोक सतत मागे बोलतात, गैरसमज पेरतात, चिखलफेक करतात – तेच खरे कधीच नसतात. ते नेहमी ‘पाठीमागून वार’ करण्याच्या नादात असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवण्या आधी, त्यांना डोक्यावर उचलण्याआधी, लोकांनी स्वतः विचार करून प्रश्न विचारायला शिकायला हवं.
पत्रकार संघटना म्हणजे लुटारूंचा गट नव्हे किंवा विनोद नव्हे, ती जबाबदारी आहे
पत्रकार संघटना म्हणजे केवळ इव्हेंट घेणं, फोटोचे बॅनर लावणे , पैसे घेऊन पुरस्कारासाठी व्यासपीठावर बोलावणं नव्हे. ती संघटना म्हणजे पत्रकारांच्या हक्कांचं रक्षण करणं, त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं, आणि एखाद्या पत्रकारावर अन्याय झाला तर त्याच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं.
पण सध्याच्या तथाकथित पाचोरा येथील पत्रकार संघटनांमध्ये हेच मूळ मूल्य हरवत चाललं आहे. काही व्यक्ती या संघटनांचा वापर फक्त स्वतःचा आर्थिक खिचा भरण्यासाठी किंवा सामाजिक ब्रँड तयार करण्यासाठी करतात. त्यांच्या लेखणीच्या ताकदीपेक्षा बॅनर वर फोटो झळकायचं वेड जास्त असतं. आणि जेव्हा खरे प्रश्न उभे राहतात – पत्रकार भवनाचे ,पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचे ,पत्रकारांच्या सुरक्षेचे, मोबदल्याचे, किंवा विम्याचे पैसे देण्याची वेळ येते तेव्हा ह्याच मंडळींची “गायब” होणारी भूमिका सर्वांना ज्ञात आहे.
माध्यमांचा वापर नव्हे, दुरुपयोग सुरु आहे
आज सोशल मिडिया, न्यूज पोर्टल्स आणि मोबाईल पत्रकारितेने प्रत्येकाला आवाज दिला आहे. पण काही लोक या तंत्रज्ञानाचा योग्य वापर न करता, त्याचा दुरुपयोग करत आहेत. लोकांची दिशाभूल करणं, खोटी माहिती पसरवणं, आणि व्यक्तिगत आकसातून बातम्या बनवणं – या गोष्टी पत्रकारितेचं शस्त्र नव्हे, तर तिचं अपमान करणं आहे.पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील आणि माझा वाद जेव्हा झाला तेव्हा याच स्थानिक पोटभरु पत्रकारांनी आमदारांचे कार्यालय जणू आपले पोट भरण्याचे कार्यालय समजून तेथे बस्थान माडले होते आणि दिवसभर गैरसमज कसे होतील व वाढतील यासाठी पूर्ण शक्ती खर्च करीत होते
“ब्रेकिंग टाकून पोट भरतो” हा आरोप अनेकांवर लागू होतो – कारण त्यांनी पत्रकारितेला व्यवसाय नव्हे तर धंदा बनवलं आहे. अशी मंडळी कोणत्याही सन्मानाच्या पात्र नाहीत.
पत्रकार होणं म्हणजे स्वतःला “माध्यम” म्हणवून घेणं नव्हे, तर खर्‍या अर्थाने माध्यम बनणं. लोक आणि प्रशासन, शासन यांच्यातील विश्वासाचं पुलं बनणं. पण जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या पदाचा, नावाचा, किंवा ओळखीचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करते – तेव्हा ती फक्त स्वतःला नाही, तर संपूर्ण पत्रकार समाजाला बदनाम करते.
आज आपण जागरूक होण्याची वेळ आली आहे. जे स्वतःच्या नावापुढे तालुका जिल्हा विभाग राज्य अशी पत्रकारितेची मोठी मोठी पदे लावतात इतर सहकाऱ्यांसाठी सोडा पण स्वतःकडे किंवा स्वतःसाठी अधिकृत शासनमान्य अधिस्विकृतीचे कार्ड देखील घेण्याची लायकी नसते मोठ्या पदाच्या ,नावाच्या आड पत्रकारितेचं खोटं नाटक करणाऱ्यांपासून सावध राहण्याची वेळ आहे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी स्वच्छ पत्रकारिताचं अस्तित्व गरजेचं आहे. आणि ती स्वच्छता हेवेदावे, डावपेच, आणि स्वार्थापेक्षा जास्त महत्त्वाची असते.
म्हणूनच स्नेहलचं हे नम्र आवाहन आहे – कोणताही मोठा चेहरा बघून त्याच्या मागे न लागता, थेट प्रश्न विचारा, समोरासमोर संवाद साधा. जो खरा पत्रकार असेल, तो उत्तर द्यायला कधीच मागेपुढे पाहणार नाही. कारण ज्याचं मन साफ असतं, त्याला पारदर्शकतेची भीती नसते. आणि तोच एका बापाचा असतो- तुर्त एवढेच

पाचोरा येथून सतत प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे & शासकीय मान्यता प्राप्त ( अदाता नोंदणी क्र. 5301000145000179 & अदाता क्र. 53010010490 ) जाहीरात यादीत समावेश साप्ता.झुंज या वृत्तपत्राचा वर्ष 18 अंक क्र. 01 दि. 5 एप्रील 2025
आपणास सस्नेह सादर करीत आहे
Dhyeya News & सा. झुंज संपादक..  संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
M0. 73 8510 8510 7588645907 /94222 75807

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here