पाचोरा शहरात गेल्या काही दिवसांपासून एका महत्त्वाच्या आणि सामाजिकदृष्ट्या जिव्हाळ्याच्या मुद्यावर मोठी घडामोड घडत आहे. चक्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अवैध जुगारधंद्यांचा पर्दाफाश करत पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुणाच्याही मागणीला प्रतिसाद न देता, परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून अत्यंत संयम आणि धैर्याने या अवैध धंद्यांचे उच्चाटन केले. त्यांच्या या निर्णयामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक सकारात्मक चित्र निर्माण झाले. अनेक सामान्य नागरिकांनी या कारवाईचं स्वागत करत त्यांच्या धाडसी भूमिकेला पाठिंबा दिला.
पाचोऱ्यात गेल्या काही महिन्यांत अवैध चक्रीचे प्रकार उघडपणे चालू होते. काही ठिकाणी स्थानिक बोगस पत्रकार व त्यांच्या संघटनेचे पाठबळ लाभलेल्या टोळ्या या धंद्यांच्या मागे कार्यरत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी स्वतः परिस्थितीचा अभ्यास करून कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ही कारवाई केली आणि चक्री धंद्याचा पाया नष्ट करण्याची मोहीम राबवली. ही कारवाई यशस्वी झाल्यानंतर अशोक पवार यांनी गुटखा माफियांविरुद्ध लक्ष केंद्रित केले आणि या मोहिमेमध्येही लाखो रुपयांचे गुटख्याचे घबाड पकडण्यात आले. या धडाकेबाज कारवायांमुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसला असून, पोलीस प्रशासनाच्या या कारभारामुळे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
मात्र, या यशस्वी कारवाईनंतर काही असामाजिक तत्वे, गुन्हेगारी प्रवृत्ती व राजकीय मान्यवरांना माहीत नाही तरीदेखील त्यांची नावे पुढे करून काम करणारे टोळके हे पुन्हा एकदा या अवैध व्यवसायांना सुरू करण्याच्या हालचाली करत असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. काल रात्री शहरातील एका तथाकथित हॉटेलमध्ये, स्वतःला पोलीस स्टेशनच्या बरोबरीचा अधिकारी समजणाऱ्या टिमने – जी स्वतःच्या मनाने कार्यरत असून, अवैध धंद्यांना परवानगी देणारे रणजीत दादा व त्यांचे सहकारी यांनी चक्री चालकांशी मोठा व्यवहार केला आणि आजपासून किंवा 8 ते 10 दिवसात पुन्हा एकदा चक्री धंदा चालू करण्याचा कट रचला. या सगळ्या प्रकारामागे पाचोरा येथील काही सन्माननीय राजकीय मान्यवरांचे नाव त्यांना माहित देखील नाही तरी त्यांचे नाव पुढे केले जात आहे. विशेषतः हे माफिया टोळके अशा राजकीय व्यक्तींच्या नावाखाली, अनेकदा त्यांच्याही नकळत, त्यांच्या पश्चात परवानग्या मिळवल्या जात असल्याचेही समजते. या दबावाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यावर चक्रीचे व्यवहार पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामध्ये एका प्रति पोलीस स्टेशन म्हणून काम करणाऱ्या पथकाचा सहभाग असून, या पथकाने पोलीस प्रशासनातील अंतरावरून फायदा घेत स्वतःस पोलीस अधिकारी समजून निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
हीच टीम, जी एका बाजूला अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन देते, तीच दुसऱ्या दिवशी रात्री हॉटेलमध्ये बसून अवैध धंदेवाल्यांशी तडजोड करते. त्यांच्याकडून अधिक हप्ते मिळवण्यासाठी हे तथाकथित कार्यकर्ते या धंदेवाल्यांना सन्माननीय राजकीय मान्यवरांकडे घेऊन जातात. तेथे त्यांना ‘बिचारे हे धंदेवाले आता रस्त्यावर आलेत’, ‘त्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे’, ‘कृपया एक फोन लावा साहेबांना आणि चक्री पुन्हा चालू करायला सांगा’ असे भावनिक संवाद घडवले जातात. ही पूर्ण शाळा यंत्रणा बोगस माफिया टीमद्वारे चालवली जात असून, ती सातत्याने पोलीस आणि राजकीय यंत्रणेला दिशाभूल करत आहे. सन्माननीय राजकीय मान्यवरांनी देखील या प्रकारातील वास्तविकता समजून घेत, अशा प्रवृत्तींना किती खतपाणी घालावे, याचा गांभीर्याने विचार करणे आता अत्यावश्यक बनले आहे.
बीडसारख्या जिल्ह्यांत यापूर्वी अशाच प्रकारची माफियांची कीड कशी वाढली & त्याचे परिणाम सर्वश्रृत आहे. आता हीच कीडचे हप्ते पाचोरा शहरातील व तालुक्यातील गुटखा, चक्री, मटका, पत्त्यांचे क्लब हे केवळ आर्थिक लूटमार करणारे धंदे नाहीत, तर हे सामाजिक अधःपतनाचे मूळ आहेत. या धंद्यांमुळे अनेक तरुणांची आयुष्य उध्वस्त झाली असून, कुटुंबांमध्ये अशांतता, आर्थिक संकटे आणि नैराश्य वाढले आहे. एकीकडे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी अशा धंद्यांवर कारवाई करताना आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे, तर दुसरीकडे काही लोक राजकीय मान्मवरांच्या नावाखाली काम करणारे माफिया टोळके या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी राजकीय नेत्यांनी देखील याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यांच्या नावाचा चुकीचा वापर करून जर कोणी अवैध कारवाया करत असेल, तर त्याचे मूलतः खंडन करणे आणि अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.