जळगाव, दि.10 एप्रिल २०२५ –
महावीर जयंती या पवित्र जैन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, गृह शाखा, आकाशवाणी चौक, जळगाव येथून क्रमांक-दंडप्र/1/कावि/2025/321, दिनांक 07/04/2025 रोजीचा अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
या आदेशानुसार, दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी येणाऱ्या महावीर जयंती दिवशी, संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिली आहे. या निर्णयामुळे सामाजिक सलोखा, धार्मिक भावना आणि परंपरेला आदर देण्याचा संदेश प्रशासनाने पुन्हा एकदा दिला आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीला महत्त्वपूर्ण पत्रआधारभूत ठरली आहेत. प्रथम, श्री ललित गांधी, अध्यक्ष, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ, मुंबई यांनी दिनांक 01/04/2025 रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. ही मागणी जैन समाजाच्या धार्मिक भावना व पवित्रतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती.
जिल्हा प्रशासनाने आपल्या आदेशामध्ये महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथील पत्राचा संदर्भ घेतला आहे. सदर शासन निर्णय क्र. संकीर्ण-10/2002/प्रक्र 111/नवि 27, दिनांक 28 मार्च 2003 अन्वये दरवर्षी महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाही प्रशासनाने या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशद्वारे कळविण्यात आले आहेत
या प्रमुख यंत्रणांना आपल्या कार्यक्षेत्रात आवश्यक ती उपाययोजना करून दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी कत्तलखाने व मांस विक्री दुकाने पूर्णपणे बंद राहतील याची खात्री करणे अपेक्षित आहे. हे आदेश जिल्हा अप्परजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.
महावीर जयंती हा जैन समाजासाठी अत्यंत पवित्र आणि अहिंसेच्या तत्वांवर आधारित सण आहे. भगवान महावीर यांनी संपूर्ण मानवजातीसाठी करुणा, संयम आणि अहिंसा यांचे तत्त्व शिकवले. त्यांच्या जयंतीदिनी प्राणहिंसा होणार नाही याची खबरदारी घेणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने धार्मिक भावनांचा सन्मान राखला जातो आणि सार्वजनिक सलोख्याला चालना मिळते.
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित व्यावसायिक व व्यापाऱ्यांना या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. महावीर जयंतीच्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महापालिका कारवाई करणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापार्यांनी आणि मांस विक्रेत्यांनी या दिवशी स्वखुशीने आपले व्यवसाय बंद ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे जळगाव जिल्हा धार्मिक समजूतदारपणा व सहिष्णुतेचे उत्तम उदाहरण आज पर्यंत वर्षानुवर्षे दिसून आले आहे याच पार्श्वभूमीवर व परंपरा जपत सर्वधर्मसमभावाची ही भावना जपण्यासाठी यावेळी देखील अशा निर्णयांना समाजातील सर्व घटकांकडून पाठिंबा मिळणार असल्याचे दिसून येत आहे .जैन समाजाच्या श्रद्धास्थानाचा सन्मान राखत जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांना दृढ करणारा ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रशासनाने महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय केवळ आदेशापुरता मर्यादित न राहता तो एक व्यापक सामाजिक संदेश देणारा ठरत आहे. भगवान महावीर यांच्या शिकवणीप्रमाणे ‘अहिंसा परमो धर्मः’ या तत्वाचा आदर करत संपूर्ण जिल्ह्यात शांतता, संयम आणि सलोखा नांदावा यासाठी प्रशासन, पोलीस, महापालिका, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन या निर्णयाला समर्थन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी शासनाच्या निर्णयासाठी कोणत्याही प्राण्यांची इच्छा न करण्याची भूमिका सर्व स्तरावर दिसत आहे.
महावीर जयंतीचा हा शुभदिन यापुढेही वर्षानुवर्षे धार्मिक आस्था आणि सामाजिक एकोपा जपणारा ठरावा, हीच अपेक्षा!
सर्व जैन धर्मीय बांधवांना झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.