पाचोरा(झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज ) गुटखा किंग दिलीप तारखडेकरचा अर्धा खान्देश व मराठवाडा गिळंकृत करण्याचा डाव; ४ छोटे हत्ती गुटखा मध्यप्रदेशातून मलकापूर-मुक्ताईनगर मार्गे आणण्यासाठी प्रयत्नशील
अर्धा खान्देश व मराठवाडा या भागात आपल्या गुटखा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या गुटखा किंग दिलीप तारखडेकर याने पुन्हा एकदा काळा धंदा फोफावण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशातून गुटख्याचा मोठा साठा घेऊन येणाऱ्या चार छोट्या हत्ती वाहनांच्या मदतीने मलकापूर–मुक्ताईनगर–बोदवड मार्गावरून गुटखा पुरवठा करण्याचा डाव आखण्यात आला आहे
दिलीप तारखडेकर याच्या गुटखा नेटवर्कचे मूळ मध्यप्रदेशात असून तेथून रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर गुटखा उत्पादन व पुरवठा होतो. हा गुटखा महाराष्ट्रात प्रतिबंधित असूनही विशेषतः खान्देश व मराठवाडा भागात तो मोठ्या प्रमाणावर विकला जात आहे. यामागे स्थानिक यंत्रणांचे दुर्लक्ष आणि आर्थिक फायद्यांचे आकर्षण यामुळे हा व्यवसाय जोमात सुरु असल्याचे बोलले जाते.
सदर प्रकरणात ४ छोटे हत्ती (वाहने) अत्यंत कुशलतेने मलकापूर मार्गे मुक्ताईनगर व बोदवडकडे वळवले जात होते. या मार्गाचा वापर पूर्वीपासून गुटखा वाहतुकीसाठी होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या वाहतूक मार्गावर सतत नजर ठेवूनही संबंधित गुटख्याचा साठा वाचवण्याचा कट पुन्हा एकदा केल्याचे संकेत आहेत.
यामुळे राज्यातील गुटखा माफियांच्या हालचालींवर सतर्क झाले असून, स्थानिक पोलीस यंत्रणा व प्रशासन यांची भूमिका देखील तपासणीच्या कक्षेत आली आहे. गुटख्यासारखा आरोग्यविघातक पदार्थ जनतेपर्यंत पोहचवणाऱ्या या गुटखा माफीयावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. दिलीप तारखडेकर याच्या गुटखा नेटवर्कविरोधात यापूर्वी अनेकवेळा तक्रारी दाखल झाल्या असूनही त्यावर मोक्का सारखी कारवाई का होत नाही, हा प्रश्न आहे.
गुटख्याचा हल्ला हे केवळ आरोग्यावरच नाही तर कायद्याच्या शासनावर देखील मोठे आव्हान आहे. त्यामुळे या गुटखा साम्राज्यावर लगाम घालण्यासाठी राज्य सरकार, अन्न व औषध प्रशासन, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तपणे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा खान्देश व मराठवाड्याचा हा भूभाग ‘गुटखामुक्त’ होण्याऐवजी ‘गुटखाग्रस्त’ होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.