चारधाम यात्रेच्या पूर्णत्वाचा पावन सोहळा : पाचोऱ्यात गंगापुजन, वास्तुशांती आणि पुस्तक तुला सोहळा

1

Loading

पाचोरा – (झुंज वृत्तपत्र आणि ध्येय न्यूज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर मो. ९९२२६१४९१७) भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा संगम साधणाऱ्या पाचोऱ्यातील शिवनेरी नगर येथे दिनांक ४ मे २०२५ रोजी एक आगळावेगळा, अभूतपूर्व आणि पाचोरा पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात प्रथमच घडणारा पावन सोहळा संपन्न होणार आहे. गंगापुजन, वास्तुशांती आणि पुस्तक तुला या तीन गोष्टींच्या संगमाने हा कार्यक्रम एक नव्या अध्यात्मिक व सांस्कृतिक अध्यायाचा आरंभ ठरणार आहे. दादासो अरुण मोतीराम पाटील आणि आईसो सरुबाई अरुण पाटील यांनी आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण संकल्प पूर्णत्वास नेला आहे. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, द्वारका, गंगासागर, जगन्नाथपुरी, काशीविश्वेश्वर, रामेश्वरम्, बद्रीनाथ, केदारनाथ, तसेच नेपाळ येथील पशुपतिनाथ मंदिर अशा सर्व पवित्र स्थळांची चारधाम यात्रा त्यांनी पूर्ण केली. या यात्रेचा सफल, निर्विघ्न समारोप करण्यासाठी आणि ईशकृपेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गंगापुजनाचा मंगल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चारधाम यात्रेच्या निमित्ताने गंगेचे पूजन करून पवित्रतेचा महिमा वाढवण्याचा आणि वडीलधाऱ्यांच्या पुण्यस्मृतीचे पूजन करण्याचा जो उपक्रम राबविला जात आहे, तो संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवत ठरणारा आहे. कै. मोतीराम तान्हा पाटील, कै. नर्मदाबाई मोतीराम पाटील, कै. प्रविण रंगराव पाटील यांच्या पुण्यस्मृतींना अर्पण म्हणून हा पवित्र कार्यक्रम आरंभला गेला आहे. शिवनेरी नगर, कैलामाता मंदिराच्या पाठीमागे, महादेव मंदिराजवळ, भडगाव रोड, पाचोरा येथे दिनांक ४ मे २०२५ रोजी या पवित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा आरंभ एक दिवस आधी, दिनांक ३ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता होणाऱ्या रविकिरण महाराज यांच्या किर्तन सोहळ्याने होणार आहे. किर्तनाच्या मधुर सुरावटीत अध्यात्मिक व सकारात्मक ऊर्जा जागृत करून मुख्य कार्यक्रमासाठी भावमय वातावरण तयार होईल. गंगापुजनाच्या निमित्ताने गंगेच्या पावन प्रवाहाची, तिच्या जीवनदायी शक्तीची आणि तिच्या सदैव प्रवाही पुण्यतेची महती उलगडली जाणार आहे. वास्तुशांतीच्या माध्यमातून घरातील व परिसरातील सर्व वाईट शक्तींचा नायनाट करून सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित केली जाणार आहे. तर ‘पुस्तक तुला’ या अनोख्या उपक्रमाद्वारे ज्ञानार्जनाचे महत्व अधोरेखित करत, पुस्तकांचे पूजन होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आपल्या जीवनात आई-वडिलांच्या आशीर्वादाने व त्यांच्या सुसंस्कारांनी मिळालेल्या घडामोडींचे स्मरण करणे आणि भगवंताच्या चरणी आपल्या श्रद्धेची अर्पण करणे हा आहे. “पावन गंगा, पावन धाम, धन्य धन्य माता पिता चरण पूर्ण काम” या भक्तिरसपूर्ण ओळींमध्ये या सोहळ्याचा सार गुढलेला आहे. या भव्य सोहळ्याच्या निमंत्रक म्हणून निंबा मोतीराम पाटील, रंगराव मोतीराम पाटील, अरुण मोतीराम पाटील, वाल्मीक अरुण पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, कु. प्रणाली वाल्मीक पाटील, चि. अराद्य लक्ष्मण पाटील, सौ. निर्मलाबाई निंबा पाटील, सौ. मथुराबाई रंगराव पाटील, सौ. सरुबाई अरुण पाटील, सौ. वैशाली वाल्मीक पाटील, सौ. शितल लक्ष्मण पाटील, कु. देवांगी वाल्मीक पाटील, चि. पिनाक लक्ष्मण पाटील , चि. धृव हे सर्व कुटुंबीय समर्पित भावनेने निमंत्रक म्हणून पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमामुळे केवळ एक धार्मिक विधी साजरा होणार नाही, तर पाचोऱ्याचे अध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवही उजळून निघणार आहे. परंपरेचे आणि संस्कृतीचे जे धागे आपल्या जीवनात अतूट आहेत, त्यांना या निमित्ताने अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न होत आहे. या सोहळ्यात देवभक्ती, वडीलधाऱ्यांविषयीची कृतज्ञता, धर्मपरायणता, सामाजिक सलोखा आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. वडीलधाऱ्यांच्या कष्टांना, संस्कारांना आणि जीवनातील त्यागाला अभिवादन करण्याचा हा एक आगळा विलोभनीय सोहळा आहे. आईवडिलांनी आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आपल्या संततीसाठी जे स्वप्न उभे केले, त्या स्वप्नपूर्तीची आणि त्यांच्या कष्टांची ही साक्षांतिक भरभरून द्यायची आहे. त्यांच्या आठवणींना नमन करून गंगामातेच्या साक्षीने त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. या सोहळ्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘पुस्तक तुला’ उपक्रम. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात वाचनसंस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे. वाचनाने व्यक्तिमत्व घडते, विचारशक्ती प्रगल्भ होते आणि समाजात प्रगल्भ नागरिक घडतात. या पुस्तक तुला उपक्रमातून ज्ञानाचा सन्मान होणार असून, विविध ग्रंथांचे पूजन व तुला सोहळा होणार आहे. यातून वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यावर भर देण्यात येणार आहे. पाचोरा पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमास सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, धर्मप्रेमी, वाचनप्रेमी आणि श्रद्धावंत नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गंगापुजन, वास्तुशांती आणि पुस्तक तुला कार्यक्रमाचा सोहळा स्थळ : शिवनेरी नगर, कैलामाता मंदीराच्या पाठीमागे, महादेव मंदीराजवळ, भडगाव रोड, पाचोरा दिनांक : ४ मे २०२५, रविवार तर रविकिरण महाराज यांचे भावपूर्ण कीर्तन दिनांक : ३ मे २०२५, शनिवार वेळ : रात्री ८ वाजता स्थळ : वरील प्रमाणे असणार आहे. ज्या श्रद्धावानांनी आपल्या जीवनात धर्माचे, संस्कृतीचे, वडीलधाऱ्यांविषयीच्या कृतज्ञतेचे महत्व जाणले आहे, त्या सर्व भाविकांनी या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि या पावन क्षणांचे साक्षीदार व्हावे, असे आयोजकांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here