पाचोरा व येथील जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘करिअर कंपास’ कार्यक्रम म्हणजे केवळ एक उपक्रम नव्हता तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दीपस्तंभ ठरलेला एक प्रभावी सोहळा होता आणि या समृद्ध सोहळ्याचे खरे केंद्रबिंदू ठरले ते एसएसएमएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वासुदेव वले सर ज्यांनी आपल्या सखोल, समर्पक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात नव्या संधींची, नव्या स्वप्नांची आणि नव्या विश्वासाची प्रेरणा निर्माण केली त्यांच्या वकृत्वाने आणि जीवनानुभवाने विद्यार्थी केवळ करिअर निवडीसंबंधी जागरूक झाले नाहीत तर त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा धडा शिकला प्रा. वले सरांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना सर्वप्रथम करिअर म्हणजे केवळ नोकरीचे साधन नसून ते जीवनाचा गाभा आहे हे सहजतेने समजावून सांगितले त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की तुमचे ध्येय तुम्ही स्वतः ठरवा कोणत्याही सामाजिक दबावामुळे किंवा केवळ प्रतिष्ठेच्या झगमगाटामुळे तुम्ही तुमचे भविष्य ठरवू नका तर स्वतःच्या आवडी क्षमता मर्यादा आणि जीवनातील मूल्ये लक्षात घेऊन करिअरची दिशा निवडा लहान वयातच आपली स्वप्न निश्चित केली तर ती साध्य करणे सोपे जाते असे ते म्हणाले त्यांनी स्पष्ट केले की योग्य करिअर निवडीसाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे स्वतःच्या आवडीनिवडी गुणवैशिष्ट्ये आणि आकांक्षा यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे आपले रोजचे नियोजन अभ्यासाची आखणी परीक्षेच्या तयारीची योजना ह्या सर्व गोष्टींमध्ये सातत्य व चिकाटी लागते असे सांगत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भविष्यासाठी एक स्वप्न बाळगण्याचे आवाहन केले त्यांनी विज्ञान वाणिज्य व कला या सर्व शाखांमधील करिअरच्या अफाट संधींवर प्रकाश टाकला विज्ञान शाखेतील डॉक्टर इंजिनिअर संशोधक पर्यावरणतज्ज्ञ यांसारख्या व्यावसायिक संधींबरोबरच वाणिज्य शाखेतील चार्टर्ड अकाउंटंट फायनान्स अॅनालिस्ट मॅनेजमेंट क्षेत्रातील आव्हाने तसेच कला शाखेतील सिव्हिल सर्व्हिसेस पत्रकारिता शिक्षण साहित्य क्षेत्रातील अनंत संधी यांचा वेध घेत विद्यार्थ्यांना सर्व पर्यायांची माहिती दिली करिअर निवडताना केवळ क्षेत्राचे बाह्य आकर्षण पाहू नये तर त्या क्षेत्राशी आपले नाते जुळते का आपल्याला त्यात दीर्घकाळ आनंद व समाधान मिळेल का याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचे महत्त्व विशद करताना त्यांनी यूपीएससी एमपीएससी बँकिंग एसएससी अशा विविध परीक्षांचे स्वरूप तयारीची योग्य दिशा आणि वेळ व्यवस्थापन याचे महत्त्व पटवून दिले तसेच आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात नव्या संधी जसे की डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप व उद्योजकतेच्या क्षेत्रात होणारी झपाट्याने वाढ याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांना विश्वास दिला की कोणतेही स्वप्न मोठे नाही जर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जिद्द व परिश्रम असतील त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करा ध्येय निश्चित करा अपयशातून धडा घ्या आणि सतत पुढे चालत राहा हा संदेश दिला त्यांच्या संवादातून विद्यार्थ्यांना केवळ करिअरविषयी नव्हे तर जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव इतका खोलवर होता की सभागृहातील प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या प्रत्येक शब्दात स्वतःला शोधत होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जैन संघटनेचे विभागीय संचालक रितेश ललवाणी पाचोरा अध्यक्ष राजेश जैन महिला अध्यक्षा हर्षा संघवी जिल्हा कार्यकारिणी सचिव तृप्ती संचेती संचालक राजेश संघवी मनोज बांठिया पारस मुणोत निलेश सुराणा मधुर बोथरा सचिन संघवी प्रतिभा बाफना प्रशांत संघवी सोनी जैन पाश संघवी यश संघवी चेतन छाजेड हेमराज बाफना पायल बाफना मित्तल शहा दर्शना खुशी बांठिया लता बांठिया राजश्री बडोला हर्षाली छाजेड प्रियंका संघवी दिपाली संचेती क्रितिका ओस्तवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले संस्थेचे अध्यक्ष दिनेशजी बोथरा उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी सचिव जीवनजी जैन सहसचिव संजयजी बडोला खजिनदार जगदीशजी खिलोशिया स्कूल कमिटी चेअरमन लालचंदजी केसवाणी सचिव रितेशजी ललवाणी संचालक संजयजी चोरडीया गुलाबजी राठोड गोपालजी पटवारी प्रितीजी जैन महेंद्रकुमारजी हिरण अशोककुमारजी मोर शेखरकुमारजी धाडीवाल यांचेही मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या तयारीत शाळेचे सीईओ अतुल चित्ते व मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच निर्मला पाटील प्रतिभा मोरे रुपाली जाधव प्रिती शर्मा शितल तिवारी दिपिका रणदिवे योगिता शेंडे पुजा पाटील ज्योती बडगुजर कविता जोशी रूपाली देवरे भाग्यश्री ब्राम्हणकर विद्या थेपडे शितल महाजन स्मिता देशमुख हरिप्रिया नम्र किशोरी साळुंखे वाल्मिक शिंदे किरण बोरसे संगीता पाटकरी पुजा अहिरे पुनम कुमावत शालिनी महाजन कल्पना बोरसे निवृत्ती तांदळे संजय सोनजे संदिप परदेशी कृष्णा शिरसाठ आनंद दायमा मनोज बडगुजर शिवाजी ब्राम्हणे अलका बडगुजर अश्विनी पाटील सुनिता शिंपी मनिषा पाटील शिवाजी पाटील विकास मोरे या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बोरसे यांनी केले आणि वाल्मिक शिंदे यांनी आभार प्रदर्शन करत सर्वांचे मनापासून आभार मानले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वप्न पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्यासाठीची दिशा मिळाली आहे प्रा. डॉ. वासुदेव वले यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने ‘करिअर कंपास’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्या प्रेरणेचा आणि संधींच्या वाटेचा आधारस्तंभ ठरला आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.