पाचोऱ्याचा गणेश शिंदे पत्रकार पुण्यात गाठतोय यशाची नवी वाट – मेहनतीने घेतली मालवाहतूक गाडी, आता स्वतःच्या कष्टावर उभारली संधी!

Loading

पाचोरा (प्रतिनिधी) – पत्रकार गणेश शिंदे आपल्या जन्मगावी असलेल्या पाचोऱ्यातून पुणे या प्रगत महानगरात स्थायिक होऊन तरुण पत्रकाराने केवळ नोकरी करून न थांबता स्वतःचे स्वप्न उभे करण्यासाठी घेतलेले कष्ट आज प्रेरणादायी ठरत आहेत. पाचोरा येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जपणाऱ्या गणेश शिंदे या युवकाने सध्या पुणे येथे नोकरी करत असतानाच मेहनतीच्या बळावर एक महिंद्रा पिकअप मालवाहतूक गाडी आज स्वतःच्या मालकीची घेतली आहे.
हे केवळ वाहन खरेदी नाही, तर एका सर्वसामान्य पत्रकाराने केलेली स्वबळावरची सुरुवात आहे. विशेष म्हणजे या गाडीचे नामांकित कंपनीत यशस्वीपणे कंत्राटीनुसार नियोजन केले असून, त्यामार्फत नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. ही मालवाहतूक गाडी पुणे परिसरात वापरली जात असून, सद्यस्थितीत गाडी चालविण्यासाठी विश्वासू आणि प्रामाणिक चालकाची गरज आहे.
या संदर्भात इच्छुक उमेदवारांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून, मासिक पगार १२ हजार रुपये, दोन वेळचे सकस जेवण, दोन वेळचा नाश्ता व चहा तसेच निवासाची मोफत सोय यांचा समावेश असणार असल्याचे शिंदे यांनी सांगीतले आहे.विशेष म्हणजे हे सर्व लाभ निश्चित अटी व नियमांच्या अधीन राहूनच देण्यात येणार आहेत.
आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवत, मोठ्या स्वप्नांची बीजे पेरणाऱ्या या पत्रकाराने यशाचा मार्ग निर्माण करताना स्वतःच्या कष्टावर उभ्या केलेल्या या योजनेमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. अत्यंत नम्रतेने, कुठलीही गाजावाजा न करता गणेश शिंदे म्हणतो – “आज गाडी घेतली आहे, उद्या दोन होतील; पण प्रत्येक यश मागे प्रामाणिक काम आणि सातत्य असावं लागतं.”
अशा या मेहनती, मनोबलाने प्रेरित आणि ध्येयवेड्या तरुणाचा संपर्क क्रमांक – ९०२८८८००४५ असून, गरजूंनी त्याच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here