पाचोरा (प्रतिनिधी) –पाचोरा शहरातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपल्या निस्वार्थ व सातत्यपूर्ण सेवेमुळे वेगळा ठसा उमठवणाऱ्या सिद्धिविनायक हॉस्पिटलने ८ यशस्वी वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून, येत्या सोमवार, दिनांक २६ मे २०२६ रोजी या हॉस्पिटलचा ९ व्या वर्षात उत्साहपूर्ण प्रवेश होत आहे. या निमित्ताने हॉस्पिटलचे संस्थापक व संचालक डॉ. राहुल प्रभाकर झेरवाल यांच्या संकल्पनेतून एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील जास्तीत जास्त
नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.पाचोऱ्यातील कृष्णापुरी भागात ८ वर्षांपूर्वी सुरू झालेले सिद्धिविनायक हॉस्पिटल आज शहरात व तालुक्यात अत्याधुनिक आरोग्यसेवांचे केंद्र बनले आहे. रुग्णांच्या गरजेनुसार सतत नविन सुविधा व सेवा पुरवण्याचा डॉ. राहुल झेरवाल यांचा सतत प्रयत्न राहिला आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती असो वा गरीब गरजू नागरिक, प्रत्येक रुग्णाच्या वेदना कमी करणे हेच आपले कर्तव्य मानणाऱ्या डॉ. झेरवाल यांचे रुग्णसेवेशी असलेले नाते केवळ व्यवसायिक न राहता पूर्णपणे मानवीय भावनेवर आधारित आहे.या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या अत्यावश्यक व आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये डे केअर युनिट, इन-पेशंट डिपार्टमेंट (IPD), बालरोग विभाग, अत्याधुनिक 5 पॅरा कार्डिअॅक मॉनिटर्स, ईसीजी, एक्स-रे, अल्ट्रासॉनिक नेब्युलायझर यांसारख्या जीवनावश्यक सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना एकाच छताखाली विविध प्रकारच्या तपासण्या व उपचार मिळण्याची सुविधा आहे. कोरोना महामारीच्या काळात बहुतेक हॉस्पिटले कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणं कठीण बनलं होतं. अशा कठीण काळातही सिद्धिविनायक हॉस्पिटलने नॉन कोविड रुग्णांसाठी आपले दरवाजे खुले ठेवले. त्यावेळी अनेक रुग्ण भीतीत असताना डॉ. झेरवाल यांच्या धाडसामुळे आणि वैद्यकीय बांधिलकीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. हॉस्पिटलने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत सेवा देण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने डॉ. राहुल झेरवाल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “माझ्यासाठी डॉक्टर होणे म्हणजे केवळ पदवी मिळवणे नाही तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. रुग्णाच्या वेदनांना आपले समजून त्यांच्या त्रासाचे समाधान शोधणे हेच माझे ध्येय आहे. गोरगरीब व गरजू रुग्णांवर उपचार करताना त्यांचा जीव वाचवता आला, तर त्याहून मोठा आनंद दुसरा नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “गेल्या ८ वर्षात आम्ही रुग्णांशी केवळ औषधांचेच नव्हे तर विश्वासाचे नाते जोडले आहे. या प्रवासात माझे कुटुंब, हॉस्पिटलमधील कर्मचारी, शहरातील नागरिक, आणि सर्व रुग्ण यांचे मी मनापासून आभार मानतो. ९ व्या वर्षात प्रवेश करत असताना, ही सेवा अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे.” सिद्धिविनायक हॉस्पिटलने ९ व्या वर्षात पदार्पण करताना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजासाठी एक महत्वाचा सामाजिक संदेश दिला आहे – “रक्तदान हेच जीवनदान”. रक्ताचा तुटवडा हा देशभरातील आरोग्य व्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. अपघात, शस्त्रक्रिया, गर्भवती महिला, आणि थॅलेसेमिया, हिमोफिलिया यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे अत्यावश्यक असते.यामुळेच सिद्धिविनायक हॉस्पिटलने २६ मे २०२६ रोजी सकाळी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, शहरातील तरुणांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, आणि प्रत्येक जबाबदार नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असा उदात्त हेतू व्यक्त केला आहे. रक्तदान शिबिराचे ठिकाण: सिद्धिविनायक हॉस्पिटल, कृष्णापुरी, पाचोरा दिनांक: सोमवार, २६ मे २०२६ वेळ: सकाळी १० वाजल्यापासून ८ वर्षांच्या प्रवासात सिद्धिविनायक हॉस्पिटलने पाचोरा व परिसरातील हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. सामान्य सर्दीपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत प्रत्येक रुग्णाला समर्पित सेवा देणारे हे हॉस्पिटल म्हणजे आरोग्यसेवेतील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. अनेक गरीब कुटुंबांनी डॉ. झेरवाल यांना आपल्या कुटुंबातील सदस्यासारखा मान दिला आहे, कारण त्यांनी केवळ उपचारच केले नाहीत, तर त्यांच्यासोबत माणुसकीचाही एक सेतू तयार केला आहे. ९ व्या वर्षात प्रवेश करत असताना सिद्धिविनायक हॉस्पिटल केवळ सेवा नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे भानही जपत आहे. पुढील काळात आणखी अत्याधुनिक सुविधा, नवीन तंत्रज्ञान, आणि अधिक रुग्ण केंद्रित सेवा देण्याचा हॉस्पिटलचा संकल्प आहे.डॉ. राहुल झेरवाल यांनी शेवटी सांगितले की, “आरोग्यसेवेचा मूलमंत्र म्हणजे रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करणे. हा विश्वासच आम्हाला पुढे नेतो आणि हीच प्रेरणा आम्हाला अधिक कार्य करण्यास भाग पाडते.”पाचोरा शहरात सिद्धिविनायक हॉस्पिटलचा हा सेवाभावी प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अशाच रुग्णसेवेने ते आगामी काळात आरोग्याच्या क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.