पाचोरा – तालुक्यात सध्या एक गंभीर आणि अस्वस्थ करणारी बाब समोर येत आहे. ‘स्टॅटेलाईट चॅनलचा प्रतिनिधी’ & राज्य स्तरावरील दैनिकाचा प्रतिनीधी म्हणून ओळख निर्माण करत काही व्यक्ती शासकीय कार्यालयांमध्ये, राजकीय बैठकीत, राजकीय मान्यवरांसमोर, कार्यक्रमांमध्ये, तसेच विविध सामाजिक घडामोडींमध्ये सक्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या व्यक्तींच्या ओळखीबाबत जबाबदार आणि अधिकृत माहिती उपलब्ध नाही. स्थानिक पत्रकारिता क्षेत्रात एक चांगली आणि विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करणाऱ्या सॅटॅलाइट चॅनल व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा गैरवापर करून स्वतःला ‘प्रतिनिधी’ म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीमुळे खऱ्या पत्रकारांच्या कामावरच संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पाचोरा परिसरात वावरणाऱ्या या ‘तोतया पत्रकारा’ची नावे निश्चित न सांगता, तो कोणत्या अधिकृत सॅटॅलाइट चॅनलशी संबंधित आहे याची कुठलीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुष्टी न मिळता, तो सर्रासपणे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनिधीच्या
भूमिकेत प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे त्याने कुठल्याही अधिकृत मान्यता न घेता, ना आयडी कार्ड, ना नियुक्तीपत्र, केवळ चॅनलचे व राज्यस्तरीय दैनिकाच्या नाव सांगून बातम्या गोळा करणे, फोटो काढणे, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे आणि स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. अशा प्रकारचे वर्तन केवळ पत्रकारितेच्या नावलौकिकावरच नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर देखील गदा आणणारे आहे. हे लोक केवळ चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या नावाचा आधार घेत, घडामोडी कव्हर करत नाहीत, तर अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारिता हे एक जबाबदारीचे, समाजाशी बांधिलकी ठेवणारे, सत्य आणि वस्तुनिष्ठतेवर आधारलेले क्षेत्र आहे. मात्र असे तोतया लोक जेव्हा बाजारात उघडपणे फिरू लागतात, तेव्हा ते संपूर्ण क्षेत्राला बदनाम करून टाकतात. विशेष बाब म्हणजे, जिल्हा स्तरावरील मूळ सॅटॅलाइट चॅनलच्या प्रतिनिधींनी
व राज्यस्तरीय दैनिकाच्या या प्रकरणाकडे तातडीने आणि गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित चॅनलच्या व्यवस्थापनाने पाचोरा परिसरात त्यांचा अधिकृत प्रतिनिधी कोण आहे, याची स्पष्ट आणि सार्वत्रिक घोषणा करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘घरबसल्या’ बातम्या व पाकीट पाठवणारा आणि चॅनलच्या नावावर बाजार करणारा हा व्यक्ती भविष्यात चॅनलच्याच नावाला धक्का पोहोचवेल. अशा प्रकारच्या बनावट प्रतिनिधींच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात, दलालगिरीत, प्रशासकीय फेऱ्यांमध्ये. आणि समाजात चिथावणीखोर वातावरण तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक सॅटॅलाइट चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकाच्या हे ठरवून द्यायला हवे की कोणत्या बातम्या अधिकृत आहेत,आणि त्या कोण पाठवत आहे. तसेच जर हे तोतया पत्रकार राज्यस्तरीय दैनिकाच्या व खऱ्याच चॅनलचा अधिकृत प्रतिनिधी नाही आणि तरीही त्याच्या पाठवलेल्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असतील यावरून हे लक्षात घ्यावे की, या कथित प्रतिनिधीच्या बातम्या कुठून येतात? तो कोठे वास्तव्यास आहे? त्याचे चॅनलशी संबंध काय आहेत? या सर्व गोष्टींची छाननी झाली पाहिजे. अनेक वेळा असे ही निदर्शनास आले आहे की, या कथित पत्रकारांनी शासकीय कर्मचाऱ्यांना ‘कव्हरेज’ देण्याच्या नावाखाली दबाव टाकून लाभ घेतलेले आहेत या पार्श्वभूमीवर, सॅटॅलाइट चॅनलच्या व राज्यस्तरीय दैनिकाच्या अधिकाऱ्यांनी अशा बनावट प्रतिनिधींविषयी ठोस भूमिका घेऊन, अधिकृत प्रतिनिधींची यादी प्रसिद्ध करणे, त्यांच्या आयडी कार्डांची नोंद प्रशासनाकडे पाठवणे, आणि सोशल मीडियावर त्यांचा अधिकृत परिचय देणे ही काळाची गरज आहे. शिवाय अशा तोतया प्रतिनिधींनी पत्रकारितेच्या आडून सट्टेबाजी, दलाली, धमकी, किंवा कोणत्याही प्रकारचे अनैतिक कार्य केल्याचे आढळून आल्यास, चॅनलने व राज्यस्तरीय दैनिकांच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करून आपला आळवलेला नाताच संपवावा. पाचोऱ्यासारख्या शहरात, जिथे अनेक युवक पत्रकारितेच्या नावाने सामाजिक बदलासाठी योगदान देत आहेत, तिथे अशा तोतया लोकांमुळे संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरते. त्यामुळे या प्रकारांना वेळीच रोखणं हे समाजासाठी, प्रशासनासाठी आणि खरी पत्रकारिता करणाऱ्यांसाठी आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य ठरतं. पुन्हा एकदा जिल्हास्तरावरील सर्व सॅटॅलाइट चॅनल प्रतिनिधींनी व राज्यस्तरीय दैनिकाच्या व्यवस्थापन मंडळ सजग होणे, पाचोरा परिसरातील या बनावट पत्रकाराची ओळख पटवून त्याच्याविरोधात ठोस पावले उचलणे, आणि जनतेसह शासकीय यंत्रणेलाही खरे आणि खोटे यामधील फरक समजेल अशी दिशा देणे आवश्यक आहे. कारण खरी पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आणि तोतया पत्रकार या स्तंभावरचा मोठा धोका! आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.