एकनाथ शिंदे साहेब ठरले देवदूत; गिरीशभाऊ महाजन यांच्या तत्परतेने वाचले किडनी रुग्णाचे प्राण

0

जळगाव – जिल्ह्याच्या मातीला संतांच्या परंपरेचा वारसा लाभलेला आहे. मुक्ताई नगरीतील संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळा हा त्या परंपरेचा जिवंत आविष्कार आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी शिवसेना प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः मुक्ताईनगर येथे आले होते. आपल्या व्यस्त राजकीय वेळापत्रकातून वेळ काढून या अध्यात्मिक व सांस्कृतिक उत्सवात सहभागी होणे हेच त्यांच्या माणूस म्हणून असलेल्या ओळखीचे प्रतीक आहे.
या दौऱ्यानंतर साहेब मुंबईकडे परतण्यासाठी मुक्ताईनगरहून जळगाव विमानतळावर पोहोचले. परंतु काही कारणास्तव त्यांच्या चार्टर्ड विमानाच्या उड्डाणास थोडा विलंब झाला. हाच क्षण नियतीने एका गरजू भगिनीसाठी आशेचा किरण ठरवून ठेवला होता. कारण या विलंबामुळेच एका मायभगिनीच्या प्राणवाचक उपचारांचा मार्ग मोकळा झाला.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रहिवासी शीतलताई बोरडे या गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया नियोजित होती. याच शस्त्रक्रियेसाठी त्या आपल्या पतीसह मुंबईला जाण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाल्या होत्या. मात्र काही वेळेच्या फरकाने त्यांचे कमर्शियल विमान निघून गेले. डोळ्यात अश्रू, मनात काळजी आणि जीवावर बेतलेली वेळ — अशा अवस्थेत त्या मायभगिनी पूर्णपणे हतबल झाल्या होत्या. ही माहिती जळगावचे लोकप्रिय जनप्रतिनिधी, मदतीस तत्पर असलेले राज्याचे मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घातली. ‘कोणत्याही परिस्थितीत या भगिनीला वेळेत मुंबईला पोहोचवणे आवश्यक आहे’ हे गिरीशभाऊंनी ओळखले. त्यांचे जनसेवेप्रती असलेले बांधिलकी आणि तत्परता पुन्हा एकदा दिसून आली. ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या विनंतीवर एकनाथ शिंदे साहेबांनी क्षणाचाही विचार न करता तात्काळ संमती दिली. “आपलं विमान उशिरा जातंयच, आपण आपल्या भगिनीला सोबत घेऊनच जाऊ,” असे म्हणत त्यांनी आपल्या चार्टर्ड विमानात शीतलताई आणि त्यांच्या पतीला सहप्रवासी म्हणून घेतले. केवळ विमान प्रवासाची परवानगी देणे एवढ्यावरच साहेब थांबले नाहीत. त्यांनी स्वतः प्रवासादरम्यान शीतलताईंची आस्थेने चौकशी केली. “किती त्रास होतोय? डॉक्टरांना दाखवलं का? ऑपरेशन कधी आहे?” अशा प्रश्नांतून त्यांची आत्मीयता आणि आपुलकी प्रत्ययास आली. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्यांनी आधीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करून ठेवली होती. या विशेष रुग्णवाहिकेतून शीतलताईंना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे नियोजित वेळेत त्यांची शस्त्रक्रिया पार पडू शकली. आज त्या सुखरूप आहेत आणि याचे पूर्ण श्रेय जातं दोन महान व्यक्तिमत्त्वांना — एकनाथजी शिंदे आणि गिरीशभाऊ महाजन. शीतलताईंनी अश्रूपूरित डोळ्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांचे हात पकडत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यांच्या चेहऱ्यावरचा दिलासा आणि मनातली कृतज्ञता हीच त्या दिवशी महाराष्ट्राच्या मनाला भिडणारी गोष्ट ठरली. त्यांनी म्हटलं, “साहेब नसते धावून आले, तर कदाचित मी आज हयातही नसते. साहेबांनी माझ्यासाठी एक भाऊ बनून देवदूतासारखी मदत केली.” गिरीशभाऊ महाजन यांचं देखील या घटनेतील महत्त्व अपार आहे. राजकीय दबाव, प्रशासकीय गडबड याच्या पलीकडे जाऊन, गिरीशभाऊंनी केवळ मानवतेच्या नात्याने हे प्रकरण शिंदे साहेबांपर्यंत पोहचवले. यातून त्यांची संवेदनशीलता आणि जनसेवेची तळमळ पुन्हा सिद्ध झाली. या घटनेने अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर न बोलता प्रकाश टाकला आहे. अनेकदा सामान्य माणूस अशा संकटसमयी एकटं पडतो. मात्र या वेळी दोन जबाबदार नेते — एक राज्याचा उपमुख्यमंत्री आणि दुसरे कॅबिनेट मंत्री — हे दोघंही एका सामान्य भगिनीच्या मदतीसाठी एका क्षणात उभे ठाकले. यापेक्षा मोठं नेतृत्वाचं उदाहरण काय असू शकतं? ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक शिकवण आहे. हे दाखवून देणारी घटना आहे की, राजकारणाच्या पलीकडेही माणुसकीचं एक जग असतं, जेव्हा नेता आपल्या जनतेच्या दुःखात सहभागी होतो. एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणतात की, “मी मुख्यमंत्री नाही, मी फक्त सामान्य माणसांचा सेवक आहे.” आणि त्यांनी ही भूमिका कृतीतून सिद्ध केली आहे. शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील ही विशेषता — मातीशी जोडलेपणं, नम्रता, सर्वसामान्यांप्रती आपुलकी आणि तत्परता — हीच त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात विशेष स्थान देऊन जाते. तर दुसरीकडे गिरीशभाऊ महाजन यांचे संकटसमयी केलेले त्वरित नियोजन, संवेदनशीलता आणि सहवेदना यामुळेच त्यांच्याविषयीही जनतेत अपार आदर आहे. ही घटना कुठल्याही प्रचारासाठी नव्हती. यात कुठलाही फोटोसेशन नव्हता. एकही प्रसारमाध्यम यावेळी सोबत नव्हतं. पण सत्य, सद्भावना आणि माणुसकीने घडलेल्या घटनांना प्रसिद्धीची गरज नसते — त्या लोकांच्या मनात घर करतात. याच घटनेवर आधारित समाजमाध्यमावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी म्हटलं, “हेच खरे नेते. सामान्य माणसाच्या दुःखात जो सहभागी होतो, तोच खरा नेता असतो.” काहींनी तर शिंदे साहेबांना ‘जीव वाचवणारा योध्दा’ तर गिरीशभाऊंना ‘संकटात देवदूताचा संपर्क करणारा दूत’ असे गौरवले. अशा घटनांमुळेच महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होते. इथे नेते केवळ पदासाठी नाहीत, तर सेवेसाठीही असतात. एकनाथजी  शिंदे आणि गिरीशभाऊ  महाजन हे दोघेही त्याचे जिवंत उदाहरण आहेत. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं
नेतृत्व म्हणजे भाषणं नव्हे, कृतीतून उमटलेली माणुसकीची झुळूक असते.
आणि त्या झुळुकीचा अनुभव जळगाव जिल्ह्याने या दिवशी घेतला. ना.एकनाथ शिंदे साहेब आणि गिरीशभाऊ महाजन यांचं माणुसकीचं हे असंच कार्य सातत्याने अखिल महाराष्ट्राच्या जनतेला प्रेरणा देत राहो.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here