बांबरुड- ता. पाचोरा महादेवाचे बांबरुड येथील कुस्ती क्षेत्रातील नामवंत खेळाडू, समाजहितासाठी कायम कार्यरत असलेले, तसेच बजाज ऑटो कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे क्वालिटी कंट्रोलर

इन्स्पेक्टर पदावर तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक सेवा .बजावलेले काकासाहेब कृष्णराव पाटील यांचा निरोप समारंभ रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता बांबरूड महादेवाच्या ग्रामस्थ सभागृहात संपन्न होणार आहे.
काकासाहेब पाटील यांनी आपल्या सेवाकाळात केवळ नोकरीत निष्ठेने लावत बांबरुड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी

शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत अनेक योजना, विकास कामे आणि क्रीडांगण सुधारणा साध्य केल्या. कुस्तीप्रेमी आणि सामाजिक भान असलेल्या काकासाहेबांनी गावातील युवकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
या गौरव समारंभाच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ, हितचिंतक, नातेवाईक व मित्रमंडळींनी एकत्र येत भव्य स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले आहे. पद्माई सिमेंट प्रॉडक्टस् आणि महादेवाचे बांबरुड येथील ग्रामस्थ यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या समारंभाला राजकीय व . प्रशासकीय क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आप्पासाहेब किशोर पाटील, माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ आणि जळगाव येथील आरटीओ विभागातील इन्स्पेक्टर दादासाहेब हेमंत शिवाजी पाटील हे उपस्थित राहून काकासाहेबांच्या कार्याचा गौरव करणार आहेत.
या कार्यक्रमात काकासाहेबांच्या सेवेचा आढावा, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र प्रदान, पाहुण्यांची मनोगते आणि शेवटी काकासाहेबांचे भावनिक उत्तर भाषण होणार आहे. तदनंतरच स्नेहींचा सत्कार स्वीकारला जाणार आहे कार्यक्रम समाप्तीनंतर उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि आमंत्रितांसाठी स्नेहभोजनाची सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा महादू पाटील, भाऊराव केशव पाटील बबन सहादू पाटील, प्रकाश चंद्रभान पाटील, भालचंद्र तुळशीराम पाटील भाऊसाहेब कृष्णराव पाटील,ज्ञानेश्वर विनायक पाटील,सुनिल पाटील, भटू पाटील (स्नेह
पत्रिकेच्या माध्यमातून संपूर्ण गावाला आवाहन करण्यात आले असून, हा कार्यक्रम कर्तृत्वाचा, सेवाभावाचा आणि गावाच्या एकतेचा प्रतीक ठरणार आहे. कार्यक्रमानंतर काकासाहेबांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गावकऱ्यांच्या वतीने सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि भावस्पर्शी गौरवपर उद्गार दिले जाणार आहेत.
बांबरुड ग्रामस्थांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, ही केवळ सेवा निवृत्ती नाही तर संपूर्ण पिढीला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे. त्यामुळे प्रत्येक बांबरुडकर आणि हितचिंतकाने उपस्थित राहून काकासाहेबांच्या योगदानाला सामूहिक मान्यता द्यावी, अशी विनम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.