पाचोरा – येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व CG Nephrocare & Dialysis Center यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डायलेसिस सेंटरचे उद्घाटन रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा सेंट्रल येथील पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पाचोरा आणि परिसरातील मूत्रपिंड विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी सुसज्ज आणि दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे शुभहस्ते आमदार किशोर आप्पा पाटील (पाचोरा-भडगाव) यांच्या हस्ते होणार असून, मा. संजय दादा गरुड यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत. या कार्यक्रमाला मा. दिलीपभाऊ वाघ (माजी आमदार पाचोरा-भडगाव), मा. सौ. वैशालीताई सूर्यवंशी (संचालिका निर्मल सिड्स, पाचोरा) आणि मा. अमोलभाऊ शिंदे (भाजपा पाचोरा-भडगाव) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या वतीने सुरू होणारे हे डायलेसिस सेंटर हे पाचोरा तालुक्यातील सर्वाधिक डायलेसिस करणारे व ते सुद्धा मोफत सुविधा असलेले केंद्र ठरणार असून, यामध्ये 24/7 तत्काळ सेवा, अत्याधुनिक यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व कुशल नर्सिंग स्टाफ उपलब्ध राहणार आहे. उद्घाटनानिमित्त डायलेसिस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात रुग्णांना किडनी विकार, मधुमेह, रक्तदाब व त्याचा मूत्रपिंडावर होणारा परिणाम, आहार आणि जीवनशैली यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. CG Nephrocare & Dialysis Center ही देशातील अग्रगण्य संस्था असून त्यांनी अत्याधुनिक सुविधा पाचोरा शहरात उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर डायलेसिसची सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना आतापर्यंत जळगाव, भुसावळ किंवा औरंगाबाद येथे जावे लागत होते. यामुळे वेळ, पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, या केंद्रामुळे आता पाचोऱ्यातच मोफत उपचार मिळणार असून, ही सुविधा गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण पहिला मजला, पाचोरा सेंट्रल, APMC कंपाउंड, जिल्हा – जळगाव असे असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्यसेवेच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9529428691 / 9096545920 या क्रमांकावर संपर्क साधावा. वेबसाईट www.cgnephrocare.com द्वारे देखील माहिती उपलब्ध आहे. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या या उपक्रमामुळे “आरोग्य हीच खरी सेवा” या तत्त्वाचा प्रत्यय पाचोरावासीयांना मिळणार असून, सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यसेवेचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.