मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडियन एज्युकेशन सोसायटी मराठी प्राथमिक शाळा, मुलुंड (पूर्व) येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिरसपूर्ण आणि उत्साहाने भरलेली दृश्ये पाहायला मिळाली.
“आषाढी वारी आली शाळेच्या दारी” या भावसंपन्न घोषवाक्याला साजेसा आनंदोत्सव

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला, विठू नामाचा गजर करीत दिंडीत सहभागी झाले, रिंगण घातले आणि फुगड्यांचा मनमुराद आनंद लुटला. संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाल्यासारखा भासला.
या दिंडी सोहळ्यात पालकांनीही उस्फूर्त सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घातली.
कार्यक्रमाची संकल्पना साकारण्यासाठी आणि यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता अनभुले तसेच सतीश डोंगरे, मृणाली तावडे, सुरेखा पाटील आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष मेहनत घेतली.
लहानग्यांच्या टाळ-मृदंगाच्या नादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात पार पडलेला हा वारी सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात अध्यात्म, परंपरा आणि संस्कृतीची बीजे पेरणारा ठरला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.