पाचोरा – महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय आणि जनतेच्या मनामनात स्थान निर्माण केलेले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व तालुक्याच्या वतीने एक उल्लेखनीय व समाजोपयोगी उपक्रम — भव्य रक्तदान शिबिर व महासंकल्प अभियान — उत्साहात पार पडले. या अभियानाचे आयोजन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर केवळ पाचोरा शहरापुरते मर्यादित न राहता त्याचा विस्तार पिंपळगाव, भडगाव व नगरदेवळा या भागांपर्यंत करण्यात आला होता. या चार ठिकाणांवर एकूण २२० रक्तदात्यांनी आपल्या रक्तदातृत्वाचा ठसा उमटवून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपली. पाचोऱ्यात ५८, पिंपळगाव येथे ४५, भडगाव येथे ७५, तर नगरदेवळा येथे ४२ अशा प्रकारे रक्तदात्यांनी सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी बनवले. या शिबिरासाठी पाचोरा येथे संजीवनी रक्तपेढी, जळगाव यांचे सहकार्य लाभले. तसेच नगरदेवळा येथील शिबिरासाठी भवर रक्तपेढीने रक्तसंकलनासाठी पुढाकार घेतला. दोन्ही संस्थांनी आपल्या अनुभवी वैद्यकीय पथकासह अचूकतेने व नियमबद्धतेने रक्तसंकलनाची प्रक्रिया पार पाडली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व समारोपप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित प्रत्येक रक्तदात्याचे मनोबल वाढवण्यासाठी दिलीप वाघ यांनी त्यांच्या राष्ट्रप्रेमाचा, समाजकार्यासाठी असलेल्या संवेदनशीलतेचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला नानासाहेब संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, पाचोरा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार, पिंपळगाव मंडळाध्यक्षा शोभाताई तेली, जिल्हा चिटणीस ज्योतीताई भामरे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष तुकाराम पाटील, माजी सभापती बन्सीबापू पाटील, अनिल धना पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एन. सी. पाटील, मार्केट कमिटी सदस्य विजय कडू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपबापू पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद सोमवंशी, कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर संचेती, शिवदास पाटील, माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, मुकेश पाटील, तालुकाउपाध्यक्ष शरद अण्णा, गोपाळ पाटील, योगेश माळी, पिंटू भामरे, व्ही.टी. जोशी, भागवत महालपुरे, प्रकाश एकनाथ पाटील, सतीश चौधरी, हरुण दादा देशमुख, योगेशदादा पाटील, भूषण वाघ, ललित वाघ, अॅड. दीपक पाटील, विनोद पाटील, पिंटू राजपूत, अॅड. अविनाश सुतार, गौरव वाघ, अजय अहिरे, गणेश पाटील, रेखाताई देवरे, सरलाताई पाटील, नीलिमा पाटील, कल्पनाताई पाटील, प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ, जयश्री वाघ, सपना सूर्यवंशी, गायत्री क्षीरसागर, रणजीत पाटील, प्रा. डॉ. माणिक पाटील, हेमराज पाटील, प्रकाश चौधरी, भगवान मिस्तरी, धर्मराज पाटील, अनिल देवरे, सतीश देशमुख, संदेश पवार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, माणिक शिंदे, महादू कोकणे, प्रदीप वाघ, अली पेंटर, निवृत्ती सूर्यवंशी, डॉ. वासुदेव वले, राजेश माडोळे, प्रा. नितीन पाटील, विनोद महाजन, वसंत गिते, अविनाश सोमवंशी, शांतीलाल तेली, प्रा. अतुल सूर्यवंशी, प्रा. महेंद्र महाजन, निलेश पाटील, वसंत पाटील, महेश माळी, ललित पाटील, गणेश पाटील, प्रा. प्रदीप पाटील, कुलदीप पाटील, गोलू पाटील, महेश नेरपागर, मनोज पवार, उमेश माळी, बंटी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शवून समाजसेवेसाठी महिलांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केले. विशेषतः रेखाताई देवरे, सरलाताई पाटील, नीलिमा पाटील, कल्पनाताई पाटील, प्रा. डॉ. सुनीता गुंजाळ, जयश्री वाघ, सपना सूर्यवंशी, गायत्री क्षीरसागर यांचा उल्लेखनीय सहभाग होता. माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचे नेतृत्व करीत नाहीत तर त्यांनी आपले कार्यकर्तृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि झपाट्याने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे राष्ट्रीय स्तरावरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसाचा उपयोग केवळ अभिनंदनापुरता मर्यादित न ठेवता, समाजासाठी उपयुक्त ठरेल अशा उपक्रमातून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याचा हा प्रयत्न आहे.” या कार्यक्रमात रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व विशद करताना सांगितले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या आजारी व्यक्तीच्या जीवाला दिलेले हे रक्त म्हणजे जीवनदानच असते.” कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांची तपासणी, नोंदणी, प्रमाणपत्र वितरण आणि शिबिराचे व्यवस्थापन यासाठी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. अशा समाजोपयोगी आणि मानवतेची भावना जागृत करणाऱ्या उपक्रमामुळे पाचोरा परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. हा उपक्रम पुढील काळातही वारंवार राबविण्याचे संकेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिले असून युवकांना समाजहिताच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माजी आमदार दिलीप वाघ व त्यांच्या नेतृत्वाखालील टीमचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतून साकारलेली कृती म्हणून स्थानिक जनतेतून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.