![]()
पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर (जि. जळगाव) पो स्टे हद्दीत घडलेली अल्पवयीन मुलीवरील अमानुष घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण मानव समाजाच्या स्वाभिमानाला काळा डाग लावणारी आहे. मानवी संवेदनांना झणझणीत चपराक मारणाऱ्या या घटनेने केवळ पीडित कुटुंब नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशी हादरून गेली आहे. गावागावांतून संतापाची लाट उसळत असून आरोपींवर तातडीने कठोर आणि आदर्शवत अशी शिक्षा व्हावी, हीच काळाची मागणी आहे. या प्रकरणातील आरोपी विवाहित हाबिद हुसेन शेख (पत्नी व दोन मुले असलेला) व त्याची आई फातिमा बी शेख जलील ही सुद्धा या षडयंत्रात सहभागी असल्याचे यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे समोर आलेले आहेत. परंतु एवढ्यावरच थांबून चालणार नाही. या विकृत कृत्यात त्यांच्या सोबत इतरांनी साथ दिली असेल, तर त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात बसविणे अनिवार्य आहे. अन्यथा न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास डळमळीत होईल. समाजात असा संदेश गेला पाहिजे की, गुन्हेगारी प्रवृत्तीला साथ देणारा कोणताही व्यक्ती कायद्याच्या पाशातून सुटणार नाही. ही घटना लव्ह जिहादच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. केवळ एका विकृत वाहनचालकाने केलेली कृत्य म्हणून हा गुन्हा दुर्लक्षीत करण्याचा प्रयत्न होऊ नये. मुलींच्या सुरक्षेशी निगडित गंभीर प्रश्नांकडे आपण समाज म्हणून डोळेझाक केली, तर अशा विकृती अधिक बोकाळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीडित मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार दिल्यानंतरही संबंधित शाळेने कोणतीही कारवाई केली नाही, हा प्रकार अक्षम्य आहे. दोषी वाहनचालकाला नोकरीवरून काढून टाकणे ही प्राथमिक जबाबदारी होती. पण प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे शाळा प्रशासनानेच या विकृत कृत्याला अप्रत्यक्ष पाठबळ दिले, असेच म्हणावे लागेल. अशा निष्काळजी वर्तनामुळे आज एक अल्पवयीन मुलगी नराधमांच्या विकृत वासनांना बळी पडली आहे. म्हणूनच या शाळेच्या प्रशासनावरही कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल व्हावा, एवढेच नव्हे तर त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करून कठोर दंडात्मक कारवाई व्हावी. कारण शाळा-विद्यापीठे ही मुलांच्या सुरक्षिततेची पवित्र मंदिरे आहेत. या मंदिरात जर कमी पैशात नोकरी करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वाववरत असतील, तर त्याची जबाबदारी थेट प्रशासनावरच येते. अशा कारवाया झाल्या तर भविष्यात कोणतीही शाळा वा महाविद्यालय गुन्हेगार वृत्तीच्या व्यक्तींना कामावर ठेवण्याचे धाडस करणार नाही. याशिवाय या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत चार्जशीट दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणे गरजेचे आहे. अन्यथा गुन्हेगार वर्षानुवर्षे कायद्याच्या पळवाटांचा गैरवापर करून सुटू शकतात. अल्पावधीत न्याय मिळणे हेच या कुटुंबाच्या मानसिक समाधानाचे साधन आहे. न्यायाला विलंब झाला, तर तो अन्याया समान ठरतो. म्हणूनच या घटनेत कठोर, वेगवान व आदर्शवत निकालाची आवश्यकता आहे. याच ठिकाणी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करावी लागेल. सध्याची परिस्थिती पाहता व येणारे विविध हिंदू–मुस्लिम धार्मिक सण लक्षात घेता हे प्रकरण अतिशय संवेदनशील होते. अशा परिस्थितीत पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीमती वर्मा मॅडम यांनी आपल्या पोलीस दलासह अत्यंत शांत, संयमी व निर्णायक भूमिका निभावली. कुठेही आपल्या हालचालींचा गवगवा न करता, कोणत्याही प्रकारच्या तणावाला वाव न देता आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी यश मिळवले. त्यांच्या या कार्यपद्धतीचे व धैर्यशील नेतृत्वाचे निश्चितच कौतुक करावे लागेल. कारण अशा घटनांमध्ये पोलिसांचा दृष्टिकोन हा समाजात शांतता राखणारा, तसेच न्यायप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. पीडित कुटुंब आज अत्यंत संकटात आहे. त्यांच्या आयुष्याचा आधारच कोसळला आहे. अशा स्थितीत सरकारने त्यांना तातडीने मदत करणे ही केवळ औपचारिकता नाही तर नैतिक जबाबदारी आहे. त्यांना आर्थिक सहाय्य, वैद्यकीय व मानसोपचार मदत, तसेच पुरेशी सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. कारण न्यायाच्या प्रक्रियेत त्यांना धमक्या मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेने एक मोठा धडा शिकवला आहे. समाजातील मुलींची सुरक्षा हा केवळ शासनाचा प्रश्न नाही, तर समाजाचाही आहे. गावोगावी विशेष सुरक्षा उपाययोजना राबविणे, शाळा-महाविद्यालयांत काटेकोर चौकशी करूनच कर्मचारी नियुक्त करणे, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना वेगवान शिक्षा देणे, अशा ठोस पावले उचलणे आता काळाची गरज आहे. जर आपण अशा नराधमांविरुद्ध एकजुटीने उभे राहिलो नाही, तर उद्या प्रत्येक घराची मुलगी असुरक्षित ठरेल. आरोपींना शिक्षा करून कायद्याची ताकद दाखवावी लागेल. समाजात आदर्श निर्माण झाला पाहिजे की, जो कोणी मुलींवर हात उगारण्याचे धाडस करेल, तो जिवंतपणी समाजात तोंड दाखवू शकणार नाही. आज प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही, तर आपल्या सर्वांच्या अस्मितेचा आहे. मुलींच्या सुरक्षेला धक्का बसतो म्हणजे संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाला आव्हान दिले जाते. म्हणूनच या घटनेवर केवळ शोक व्यक्त करून थांबता कामा नये, तर ठोस, झटपट आणि आदर्शवत कारवाई हीच खरी न्यायप्राप्ती आहे
समाजाने आता जागे होऊन ‘नराधमांना शिक्षा’ आणि ‘मुलींना सुरक्षा’ या दोन मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवणे अशक्य होईल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






