पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा : शेतकऱ्यांच्या हितासाठी विनामूल्य न्यायालयीन लढाई – ॲड. सुनील पाटील, ॲड. परेश पाटील व ॲड. हर्षल रणधीर मैदानात

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील बहुचर्चित शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. या घोटाळ्यामुळे हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नाकारला गेला असून, कोट्यवधी रुपयांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे उघड झाले आहे.प्राथमिक स्वरूपात व प्रथम टप्प्यात या प्रकरणात 1 कोटी 20 लाखाच्या जवळपास अपहार केल्याचा गुन्हा दाखल होऊन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाचोरा न्यायालयातील विधी तज्ञ ॲड. सुनील पाटील (Mo 8888261883)
जिल्हा सत्र न्यायालयातील विधी तज्ञ जळगाव येथे ॲड. परेश पाटील (Mo 8625034444) आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील विधी तज्ञ ॲड. हर्षल रणधीर (Mo.9766399885 ) यांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या बाजूने विनामूल्य लढाई लढण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या प्रकरणात तीनही वकिलांनी घेतलेला निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरतो आहे. कारण न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तो परवडणारा नसतो. पण या प्रकरणात शासनाच्या वतीने सरकारी वकील असले तरी त्यांच्या सोबत शेतकऱ्यांच्या बाजूने मदतनीस म्हणून या वकिलांनी नि:शुल्क खटला लढवण्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असुरक्षितता दूर झाली आहे. शेतकरी वर्गात या निर्णयाचे स्वागत होत असून, “आता आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,” अशी एकमुखाने मागणी केली जात आहे. कारण शासनाच्या योजनांवर डोळा ठेवून बनावट कागदपत्रांद्वारे केलेल्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या घोटाळ्याची सत्यस्थिती बाहेर आणण्यात आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा व अन्न – पाणी त्याग करून हा विषय उचलून धरला. शेतकरी वर्गाचे आवाज त्यांनी प्रामाणिकपणे माध्यमांतून पोहोचवले. तसेच आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधून घेण्यातही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. जनतेच्या हितासाठी धोका पत्करून आणि दबावाला बळी न पडता सातत्याने कार्य करणाऱ्या संदीप महाजन यांचे काम समाजमनात आदर निर्माण करणारे आहे. त्यामुळे आज न्यायालयीन लढाईसाठी सक्षम वकिलांचे समर्थन मिळाले असले तरी या प्रकरणाला गती देण्याचे श्रेय संदीप महाजन यांनाही जाते, पाचोरा परिसरातील शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या योजनांतील निधी हा त्यांचा जीवनदायी आधार आहे. नैसर्गिक संकटे, तोटा आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी शासनाच्या योजनांकडे आशेने पाहतात. मात्र भ्रष्ट यंत्रणा आणि दलाल यांच्या संगनमताने तयार केलेल्या बनावट कागदपत्रांमुळे शेतकऱ्यांचा हक्क हिरावला गेला. त्यामुळे आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये, असे सर्व स्तरांवरून सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील सुनावण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषतः अटकपूर्व जामिनावर होणाऱ्या युक्तिवादात सरकारी वकीलां सोबत या वकीलांची देखील ठाम भूमिका आरोपींच्या भवितव्याला निर्णायक ठरेल. शेतकरी वर्ग, सामाजिक संघटना व जनतेचे डोळे आता न्यायालयाच्या निर्णयावर खिळलेले आहेत. पाचोरा न्यायालयात ॲड. सुनील पाटील, जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. परेश पाटील आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात ॲड. हर्षल रणधीर या तिन्ही वकिलांची उपस्थिती शेतकऱ्यांच्या मनाला आत्मविश्वास देणारी आहे. तर आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचा जागृतीचा व सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणूनच हा लढा या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. या घोटाळ्यामुळे शेतकरी बांधवांच्या विश्वासाला तडा गेला असला तरी, त्यांच्या बाजूने उभे ठाकलेले वकील आणि पत्रकार-आंदोलनकर्त्यांची एकजूट ही लढाईला नवी ताकद देणारी आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेली ही लढाई आता केवळ पाचोऱ्यापुरती मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. शेतकरी वर्गाने आता निर्धार केला आहे की, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. न्यायालयीन प्रक्रियेत तज्ज्ञ वकिलांचे नि:शुल्क योगदान आणि संदीप महाजन यांचे न थकता केलेले आंदोलन यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढाईला अपेक्षित यश मिळेल, अशी ठाम आशा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here