पूरग्रस्तांसाठी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर शिंदाड येथे संपन्न

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील विविध भागांत काही दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे व अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक कुटुंबे बेघर झाली. विशेष म्हणजे पूरपाणी ओसरल्यानंतर नागरिकांपुढे साथीचे आजार, त्वचारोग, पोटाचे विकार, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना तत्काळ आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा यांच्यातर्फे शिंदाड गाव ता. पाचोरा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन मा. नामदार गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि आमदार किशोर आप्पा पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव) यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते पूरग्रस्त नागरिकांसाठी आयोजित या शिबिरात शेकडो लोकांनी सहभाग घेतला. गावातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने तपासणी करून घेतली. यावेळी सामान्य ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, त्वचेवरील संसर्ग यासारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचीही तपासणी करून त्यांना औषधे पुरविण्यात आली. विशेष म्हणजे औषधोपचार पूर्णपणे मोफत देण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत गरजू रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची माहितीही या शिबिरात नागरिकांना देण्यात आली. अनेकांना या योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन करून त्यांना नोंदणी प्रक्रियाही समजावून सांगण्यात आली. त्यामुळे शासकीय योजनांचा खरा लाभ गावोगावी पोहोचविण्याचे कार्य या शिबिरातून साध्य झाले. पूरग्रस्त भागातील नागरिकांची भीती दूर करून त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे हीच या शिबिरामागील प्रमुख भावना होती. नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत होता. विशेष म्हणजे गावातील महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा यांचे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांनी शिबिरात परिश्रम घेतले. दिवसभर रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला, उपचार व औषधोपचार पुरवण्यात आले. काही गंभीर रुग्णांची नोंद घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजना व अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरूच राहील,” असे ते म्हणाले. डॉ. सागर गरुड यांनी सांगितले की, “आरोग्य सेवा प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. पूरग्रस्त परिस्थितीत साथीच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी योग्यवेळी तपासणी व उपचार होणे गरजेचे आहे. शिंदाड गावात आयोजित केलेले हे शिबीर त्याच उद्देशाने घेण्यात आले आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.” या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील काही दिवसांत पाचोरा तालुक्यातील इतर पुरग्रस्त भागांतही अशा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जाहीर करण्यात आले. या शिबिरामुळे शिंदाड गावातील नागरिकांना केवळ मोफत तपासणी व औषधेच मिळाली नाहीत, तर आरोग्याबद्दल जागृती निर्माण झाली. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमामुळे मानवीतेचे खरे दर्शन घडले. विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा, मा. नामदार गिरीशभाऊ महाजन, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या           मार्गदर्शना खाली डॉ. सागर गरुडयांच्या आयोजीत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here