![]()
नागपूर : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख दिशा देणाऱ्या पाचोरा येथील टॅली प्रोफेशनल अॅकॅडेमीला यंदाही एक मोठा सन्मान मिळाला आहे. इंडिया एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ या भव्य सोहळ्यात अॅकॅडेमीला प्रतिष्ठेचा ‘ज्ञान गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा मानाचा सन्मान संस्थेला सलग पाचव्यांदा प्राप्त झाला आहे, ज्यामुळे केवळ पाचोरा नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे. हा पुरस्कार अॅकॅडेमीचे संचालक अमीन पिंजारी व आसिफ पिंजारी यांना नागपूर येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री व मिस इंडिया वर्ल्ड २००४ किताबाची मानकरी सायली भगत उपस्थित होती. तिच्या हस्ते तसेच AICPE चे संचालक शरद तावरी व सौ. कविता तावरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी टॅली प्रोफेशनल अॅकॅडेमीने केलेल्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. टॅली प्रोफेशनल अॅकॅडेमीने अत्यल्प कालावधीत शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. अल्पावधीत विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल प्रशिक्षण, उद्योगसदृश वातावरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घडविण्यात ही संस्था अग्रेसर ठरली आहे. टॅली प्राईम, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऍडव्हान्स एक्सेल यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक शिक्षण देण्यात येत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात तसेच विविध खाजगी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत आहेत. आजवर या अॅकॅडेमीतून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली आहे. काहींनी स्वतःचे व्यवसाय उभारले, तर काहींनी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल केले. या सगळ्या प्रक्रियेत अॅकॅडेमीचे संचालक अमीन पिंजारी व आसिफ पिंजारी यांचे मार्गदर्शन, परिश्रम आणि दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे. या अॅकॅडेमीची खासियत म्हणजे येथे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न देता प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. संगणक क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी प्रॅक्टिकल्सवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्वरित कार्यक्षम व आत्मनिर्भर होतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या अॅकॅडेमीमुळे रोजगारक्षम झाले असून, त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले आहे. गेल्या पाच वर्षांपासून मिळत असलेला ज्ञान गौरव पुरस्कार हा अॅकॅडेमीच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, दर्जेदार शिक्षण पद्धतीचा आणि विद्यार्थ्यांच्या घडवलेल्या उज्ज्वल भवितव्याचा गौरवच मानला जात आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सलग पाचव्यांदा मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या कार्याला एक वेगळेच अधोरेखित करतो. या यशाबद्दल संचालक अमीन पिंजारी व आसिफ पिंजारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्थानिक स्तरावरून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत कौतुकाच्या आणि शुभेच्छांच्या वर्षावाने अॅकॅडेमीचा उत्साह आणखी दुणावला आहे. समाजातील विविध घटक, विद्यार्थी व पालकांनी या सन्मानाचे स्वागत केले असून, पुढील काळातही अॅकॅडेमी अधिकाधिक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ज्ञान आणि गुणवत्तेच्या बळावर उभारलेली ही ओळख पाचोराच नव्हे तर जिल्ह्यातील इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ज्ञान गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे टॅली प्रोफेशनल ॲकेडेमीच्या कामगिरीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे आणि आगामी काळात ही संस्था आणखी उंच भरारी घेईल, अशी ध्येय न्युज & झुंज वृत्तपत्र परिवारा तर्फे शुभेच्छा
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






