मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह देशी डेनिम ब्रँड स्पायकर लाइफस्टाइल ने त्यांच्या नव्या मोहिमेचा धडाकेबाज शुभारंभ केला आहे — “दौर अपना है”. आत्मविश्वास, अभिव्यक्ती आणि अभिमानाने पुढे येणाऱ्या भारतीय तरुणाईचा उत्सव ही मोहीम साजरा करत आहे. नव्या युगाची ही टॅगलाईन भारतीय तरुणांच्या सळसळत्या आत्म्याचे प्रतीक ठरत आहे.
या मोहिमेची सुरुवात एका उच्च ऊर्जा असलेल्या म्युझिक व्हिडीओद्वारे झाली आहे. विकेड सनी, धार्मिक आणि व्हिक्सेन्स क्रू यांच्या सहयोगातून साकारलेला सशक्त रॅप अँथम तरुणांच्या जिद्द, कौशल्य आणि महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडवतो. दमदार ठेका आणि लक्षवेधी सूरांमुळे हा अँथम युवापिढीत वेगाने लोकप्रिय होत आहे.
या मोहिमेबद्दल स्पायकर लाइफस्टाइल प्रा. लि. चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वाखारिया म्हणाले, “स्पायकर नेहमीच आत्मनिर्भर, स्पष्टवक्ते आणि महत्त्वाकांक्षी भारतीय तरुणांचा प्रतिनिधी राहिला आहे. ‘दौर अपना है’ ही संकल्पना याच तत्त्वज्ञानावर आधारित आहे. हा रॅप अँथम मोहिमेची पहिली पायरी आहे. भारताचा तरुण जेव्हा मर्यादा ओलांडतो आणि यशाची नवी व्याख्या करतो, तेव्हा स्पायकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील – त्यांना भारतीय अभिमानाने सजवलेल्या स्टाईल आणि आत्मविश्वासाने सशक्त करत.”
डेनिम क्षेत्रात भक्कम पाय रोवून स्पायकर आज एक संपूर्ण लाइफस्टाइल ब्रँड म्हणून उभा आहे. अॅपेरल आणि अॅक्सेसरी क्षेत्रातही स्पायकरने मजबूत उपस्थिती नोंदवली आहे. भारतीय शरीरयष्टीला अनुरूप डिझाइन्स, उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि आंतरराष्ट्रीय ट्रेंड्सशी सुसंगत कपडे ही त्यांची खासियत ठरली आहे. देशभरातील स्टोअर्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि निष्ठावान ग्राहकांमुळे स्पायकर भारतीय फॅशनमधील एक अत्यंत ओळखता येणारे नाव बनले आहे.
“दौर अपना है” मोहिमेद्वारे स्पायकर पुन्हा एकदा भारतातील उत्कृष्ट डेनिम ब्रँड म्हणून आपले स्थान बळकट करत आहे. ही मोहीम केवळ स्टाईलच नव्हे तर आत्मविश्वास, अभिव्यक्ती आणि भारतीय प्रतिभेच्या गौरवाला चालना देणारा संवाद निर्माण करत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.