पाचोरा, दि. 10 ऑक्टोबर — भारतीय कृषी क्षेत्रातील शाश्वत शेतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘निर्मल सिड्स’ संस्थेचे संचालक डॉ. जे. सी. राजपूत यांना ‘सॉईल हेल्थ गार्डियन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान ‘नॅशनल जेविक फर्टिलायझर प्रोड्युसर असोसिएशन’, नाशिक आणि आसाम ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा आसाम कृषी विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. डॉ. राजपूत यांना या प्रसंगी अनेक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. त्यांच्या हस्ते भारतीय कृषी विज्ञान क्षेत्रात मातीचे आरोग्य, सेंद्रिय खतांचा वापर, आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती या माध्यमातून शाश्वत विकास घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. राजपूत यांनी शेतीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, बी-बियाणे निर्मिती, तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या माध्यमातून सेंद्रिय आणि मातीस्नेही शेतीस प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत देशभरातील कृषी संस्था आणि संशोधन क्षेत्राने त्यांचा गौरव केला. डॉ. राजपूत यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले की, “मातीचे आरोग्य हेच राष्ट्राचे खरे आरोग्य आहे. रासायनिक खतांवर अवलंबित्व कमी करून जैविक शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.” त्यांच्या या विचारसरणी आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे ते आज भारतीय कृषी क्षेत्रात प्रेरणास्थान ठरले आहेत. या पूर्वीही डॉ. जे. सी. राजपूत यांना नाईक मेमोरियल गोल्ड मेडल, इंटरनॅशनल हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडिया पुरस्कार अशा अनेक मान्यवर सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. ‘सॉईल हेल्थ गार्डियन अवॉर्ड’ हा त्यांच्या दीर्घकाळच्या कार्याचा योग्य सन्मान ठरला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.