पाचोरा–भडगाव स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राजकीय रणधुमाळीचा प्रारंभ – पैशाचा प्रवाह, पक्षीय समीकरणे आणि गिरीशभाऊं- किशोरआप्यांची रणनीती ठरणार निर्णायक

0

Loading

पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. गावोगाव चर्चा रंगू लागली असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. राजकीय दृष्टीने पाहता, ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवणारी ठरणार आहे, असा सर्वसाधारण कयास व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या प्राथमिक स्थितीकडे पाहता विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांचे पारडे सध्या जड दिसत आहे. यामागचे कारणही ठोस आहे — आमदार किशोरआप्पा पाटील यांचे कार्य आणि संघटनशक्ती गेल्या काही वर्षांत अत्यंत बळकट झाली आहे. त्यांनी मतदारसंघातील सर्व स्तरांवरील जनतेशी घट्ट नाते जोडले असून त्यांच्या व मुलगा सुमीत किशोरआप्पा पाटील यांच्या संपर्कक्षमता आणि कार्यशैलीमुळे त्यांचा प्रभाव पाचोऱ्यापुरता मर्यादित न राहता भडगावच नाही तर पारीसरातील संलग्ध भागांपर्यंत पोहोचला आहे. तथापि, राजकारणात कार्य जितके महत्त्वाचे तितकाच पैसा हा निवडणुकीतील निर्णायक घटक ठरतो. “आमदार किशोरआप्पांना निवडणुकीत पैसा खर्च करायला कलेजा नाही,” अशी चर्चा सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यां पासून मतदारांपर्यंत आहे, आणि त्यात काही अंशी सत्यता असल्याचे मान्य करावे लागेलच. पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार केला तर अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. काहींनी आपापले प्रभाग निश्चित केले आहेत, तर काहींनी गटबाजीच्या माध्यमातून राजकीय बळ मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु काही असेही आहेत, जे प्रत्यक्ष निवडणुकीत उभे राहणार नाहीत, तरीही आमदार किशोरआप्पांच्या नावावर आणि त्यांच्या जवळीकतेवरून वर्षानुवर्षे ठेके – आर्थिक लाभ घेत आले आहेत. कोटयाधिश झाले तरी पुरग्रस्तांसाठी स्वतःच्या खिशात हात घालुन पैसे वाटप केले नाही स्वतः दौरे केले नाही अशा व्यक्तींना देखील आता या निवडणुकीत स्वतःसाठी व इतरांसाठी खर्च करावा लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. कारण जनतेसमोर आता केवळ कार्य नव्हे, तर आर्थिक योगदान आणि निवडणूक यंत्रणा उभारणेही महत्त्वाचे ठरले आहे. अनेकांच्या मते जर उमेदवार हा थेट आमदार किशोरआप्पांच्या घरातीलच असला, तर इतर उमेदवारांचे आर्थिक ओझे हलके होते. हे सुर्य प्रकाशा एवढे सत्य व स्पष्ट आहे म्हणुन विशिष्ठ फळी प्रमुख उमेदवार आप्पांच्या घरातीलच पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे कारण अशावेळी अनेकांचा असा समज असतो की “आप्पांच्या घरातील उमेदवाराने निवडणूक लढवली, की खर्चाचा ताण आपोआप मिटून जाईल.” या चर्चांना सध्या स्थानिक पातळीवर चांगलाच ऊत आला आहे. हे पण सत्य आहे प्रत्येक निवडणुकीत उमेदवार सुरुवातीला ज्या प्रमाणात खर्च सांगतो, त्याच्या एकपट रक्कम जरी मागितली की विविध कारणे सांगून वेळ मारून नेणारी वृत्ती देखील दिसून येते. परिणामी, शेवटी संपूर्ण आर्थिक भार पॅनलप्रमुख किंवा पक्षप्रमुखावरच पडतो. हे दृश्य आता पुन्हा पाचोऱ्यात दिसत आहे.किंवा नेत्यांसाठी नवीन नाही नेत्याची स्वतःची निवडणूक असली की कार्यकर्त्यांच्या हाती पैसा द्यावा लागतो, पण जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते, तेव्हा त्याच नेत्याला घरातून पण पैसा द्यावा लागतो नंतर निवडून आल्यावर ती कमाई पुन्हा कार्यकर्ता घरातच जमा करतो. हे आता पाचोरा–भडगाव परिसरातील नित्याचे वास्तव सत्य आहे, नव्हेतर हे “सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट” आहे. त्यामुळे ही परिस्थिती केवळ आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यापुरती मर्यादित नाही, तर सर्वच राजकीय पक्षांत दिसणारी आहे. अशा स्थितीत या निवडणुकीत नेत्यांना अष्टपैलू कस लावून स्पष्ट आर्थिक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी किमान २५ कोटी रुपये आणि डिपॉझिट टिकवण्यासाठी एका नगरसेवकास किमान २५ लाख रुपये लागतील, असा अंदाज आहे. तर प्रत्यक्ष विजयी होण्यासाठी नगरसेवकाला ३५ ते ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत. हे वास्तव सर्व पक्षांना माहीत असून, त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आपल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांनाच प्राधान्य देत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण पाचोरा–भडगाव मतदारसंघात माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, माजी विधानसभा उमेदवार अमोलभाऊ शिंदे आणि सौ. वैशालीताई सूर्यवंशी हे तीनही प्रभावी नेते सध्या भाजपात एकत्र आले आहेत. प्रारंभी त्यांच्या मध्ये थोडे मतभेद असल्याची चर्चा होती, मात्र जळगाव विमानतळावर नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने झालेल्या ‘संकटमोचक’ बैठकीत त्यांचे मनोमिलन साधले गेले, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. यानंतर नामदार गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पाचोरा–भडगाव मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला एकतर्फी विजय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे अर्थात पक्षाने दिली आहे. विशेष म्हणजे, या सर्व नेत्यांचे पाचोरा येथे सतत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले गोपनीय दौरे आणि स्थानीक तीघंही नेत्यासोबत गोपतीय बैठकांचे वेळापत्रक आता चर्चेचा विषय ठरले आहे. रात्री दहा नंतर दिलीपभाऊ वाघ, अमोलभाऊ शिंदे, वैशालीताई सूर्यवंशी यांच्या सोबत नामदार गिरीशभाऊ महाजन आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या गुप्त बैठका हे दाखवतात की भाजपने या निवडणुकीत गंभीर तयारी सुरू केली आहे. गिरीशभाऊ महाजन यांच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली, तर त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय निवडणुकीत यशस्वी ठरला आहे. त्यांनी ज्या जागा जिंकता येतील असे म्हटले, त्या जागा प्रत्यक्षात विजय मिळवतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे पाचोरा–भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार कोणताही दिला, तरी तो निवडून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दृढ आहे. महाजन यांची राजकीय रणनीती म्हणजे उमेदवाराला निवडून आणण्याची कला — आणि हीच कला आता भाजपासाठी निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेचाही या निवडणुकीत तगडा सहभाग राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक “शिंदे गट विरुद्ध भाजप” अशा थेट लढतीत रूपांतरित होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. या दोन्ही गटांमधील संघर्ष जितका तीव्र होईल, तितका पैसा आणि प्रचार यांचा प्रवाह वाढणार आहे. काही अनुभवी कार्यकर्त्यांच्या मते, “या वेळी अतिवृष्टीत जसे पाणी वाहीले, तसा पैसा वाहील,” ही म्हण यंदा प्रत्यक्षात उतरणार आहे. फरक एवढाच की हा पैसा मध्यातच अडकू नये — तो थेट मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचावा, हाच खरा प्रश्न असेल. कारण आता मतदारही अधिक जागरूक आणि व्यवहारिक झाला आहे. त्याच्यासाठी आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत, विकास आणि प्रामाणिकता हाच मोजमापाचा निकष झाला आहे. अशा परिस्थितीत पाचोरा–भडगाव परिसरातील राजकीय समीकरणे अतिशय गुंतागुंतीची आणि तितकीच रोचक बनली आहेत. एका बाजूला आमदार किशोरआप्पा पाटील यांची संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांवरील पकड, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे संकटमोचक नामदार गिरीशभाऊ महाजन यांची अचूक रणनीती — या दोघांपैकी कोणाचे पारडे जड ठरणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र इतके निश्चित आहे की, या निवडणुकीत पैसा, परिश्रम, प्रचार आणि पक्षीय एकजूट हे चार घटकच अंतिम विजय ठरवतील. या निवडणुकीत प्रभागनिहाय मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, कोणत्या पॅनेलचा चढा हुकूम लागतो, हे पाहण्यासाठी आता सर्वांच्या नजरा पाचोरा–भडगाव नगरपालिकेकडे खिळल्या आहेत. कारण ही निवडणूक फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची नाही, तर आगामी विधानसभेच्या राजकीय भवितव्याची कसोटी ठरणार आहे. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकी नंतर मे न्यायालयाच्या निर्णया नंतर शिंदे शिवसेने जवळ पक्ष व धनुष्यबाण चिंन्ह राहिले तर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here