पाचोरा – येथील कोळी समाज बांधवांनी आपले न्याय्य हक्क, जातीचे दाखले व सरकारी लाभ यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला असताना या आंदोलनाच्या पवित्र हेतूवर काही ठराविक व्यक्तींनी स्वार्थाचा डाग लावल्याचे गंभीर आरोप समाजात होत आहेत. समाजातील काही प्रभावशाली लोकांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी प्रशासनाशी गुप्त समझोते करून स्वतःचे दाखले मंजूर करून घेतले, मात्र इतर सर्व साध्या समाज बांधवांना वाऱ्यावर सोडल्याने समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोळी समाजात संतापाचे
वातावरण निर्माण झाले असून अनेक बांधवांनी अशा स्वार्थी प्रवृत्तींचा निषेध केला आहे. समाजातील एकतेचा उपयोग काही जणांनी स्वतःचे राजकीय व वैयक्तिक उद्दिष्ट साधण्यासाठी केल्याने आंदोलनाचा मूळ हेतूच दूषित झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणाऱ्या निष्पाप बांधवांची दिशाभूल करून काहींनी मिळवलेले फायदे उघडकीस आणण्यासाठी समाजातील कार्यकर्ते एकत्र येत आहेत. लवकरच या प्रकरणी कोळी समाज बांधवांचे मोठे आंदोलन पुन्हा उभे राहणार असल्याची चर्चा असून, या वेळी समाजातील सर्व स्तर एकत्र येऊन खऱ्या अर्थाने न्याय मिळवण्यासाठी ठाम पवित्र्यात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोळी समाजातील असंतोष आता उफाळून आला असून “आमच्यावर अन्याय सहन नाही” या भूमिकेतून नव्या चळवळीची ठिणगी पडली आहे.विशेष म्हणजे या सर्व बाबींची ध्येय न्यूजला पूर्वीच कल्पना होती वेळेवेळी काही समाज बांधवांना याबाबत सुचित देखील केले होते
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.