पाचोरा निवडणूक : उमेदवारांची ओळख नव्हे, तर ‘पैसा’च ठरतो अंतिम निकष

0

Loading

पाचोरा – नगर पालिका निवडणूक यंदा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. प्रथमच नगराध्यक्ष पद तसेच सर्व प्रभागातील उमेदवार थेट पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवताना दिसणार आहेत. आतापर्यंत अनेक जण स्थानिक आघाड्यांवर, तर काही स्वतंत्र चिन्हांवर रिंगणात उतरत होते. परंतु यंदाची लढत सरळ आणि स्पष्ट — कोणतीही आघाडी नाही, तडजोड नाही, फक्त पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि मतदारांच्या न्यायालयात त्यांची सरळ चाचणी. परंतु या सर्वांपेक्षा अधिक चर्चा आहे ती मतदारांच्या बदललेल्या प्रवृत्तीची. गेल्या काही निवडणुकांत दिसलेला अनुभव असा की पाचोरा शहरात साधारणतः ९५ टक्के मतदार एखाद्या उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, पक्षनिष्ठा, जुनी कार्यकर्त्यांची परंपरा किंवा विकास कामांचा लेखाजोखा पाहून मतदान करत नाहीत. मतदानाच्या आधीच्या रात्री व पहाटेपर्यंत कोण उमेदवार किती खर्च करतो, किती ‘संपर्क’ साधतो आणि किती ‘व्यवस्था’ करतो यावरच बहुतेक 50% सर्वात मोठा निर्णय घेतला जातो. अर्थात ते सुद्धा “रात गयी बात गयी” होते “झाले – केले ते सर्व गेले पाण्यात” मतदानाच्या दिवशी सात नंतर कोणता उमेदवार काय & किती देतो ते सुद्धा स्वतंत्र मतदाराच्या हातातच म्हणजे घरातील प्रमुख किंवा इतर सदस्यांच्या हातात नाही जसा जसा सूर्यास्त होतो तसे तसे मतांचे भाव वाढतात हीच मतदारांच्या दृष्टीने मतदानाच्या दिवशी ‘योग्यता’ बनलेली असते. यामुळे प्रत्येक उमेदवाराला प्रत्यक्ष राजकीय शक्तीपेक्षा आर्थिक शक्तीची तयारी करूनच रिंगणात उतरावे लागते. आज घडीला सर्वच आघाड्यांचे दावेदार याच मानसिकतेने स्वतःची तयारी करताना दिसत आहेत. पाच वर्षांची कामे, सार्वजनिक जीवनातील सुख दुःखामध्ये मदत जबाबदाऱ्या, किंवा नागरिकांसाठी केलेली पायाभूत सोय — हे सर्व दुय्यम ठरले आहे. उलट, कोणत्याही छोट्या–मोठ्या सामाजिक प्रसंगात विजयी झालेले लोकप्रतिनिधी हजेरी न लावल्यास मतदार नाराज होतात. लग्न, बारसे, मृत्यू, सुख-दुःख, गल्लीतल भंडारा अगदी साध्या पाहुणचारापर्यंत लोकप्रतिनिधींनी वेळ काढून यायलाच हवे, अशी प्रबळ अपेक्षा समाजात निर्माण झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे निवडणूक लागताच उमेदवारांनी प्रत्यक्ष घरी येऊन पायऱ्या चढून मत मागावे, हे ‘अधिकार’ म्हणून अनेक मतदार मानू लागले आहेत. अशा अपेक्षांचा आणि व्यवहारांचा भार कोणत्याही लोकप्रतिनिधीवर अवास्तवपणे वाढत आहे.अर्थात कोणीही निवडून गेल्यानंतर हजाराचे लाख करतात – लाखांचे कोटी करतात हे उघड डोळ्यांनी मतदार सुद्धा पाच वर्षे पाहतात मात्र मतदारांनीही सध्याच्या परिस्थितीचे, शहराच्या गरजांचे आणि उमेदवारांच्या व्यक्तिगत व आरोग्यात्मक परिस्थितीचे भान ठेवून अपेक्षा ठेवणे कितपत आवश्यक आहे, हे आत्मपरीक्षण आज अत्यंत गरजेचे ठरत आहे. लोकशाही ही सेवा, मूल्ये आणि विकास यांवर उभी असते. परंतु पाचोरामध्ये निवडणूक म्हणजे प्रत्येक सेकंदाला पैसे देणार ‘नवा भिडू, नवा राज’ अशी वर्षानुवर्षे तयार झालेली मानसिकता आता बदलण्याची वेळ आली आहे. दहशद & पैशाच्या जोरावर गुंडांचा सुद्धा राजकारणात शिरकाव होऊ लागला आहे म्हणुन पाचोऱ्याच्या भविष्यासाठी मतदारांनी योग्य विचार करून, फक्त पैशाच्या आधारे नव्हे तर शहराच्या विकासाला व संस्कृती सह शांततेला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदान करणे, हेच खरे लोकशाहीला बळकट करणारे पाऊल ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here