Home Blog Page 18

श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त पाचोरात भक्तिभावात भव्य धार्मिक-सामाजिक उत्सव व मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न

0

Loading

पाचोरा – सृष्टीचे आद्य शिल्पकार व देवशिल्पी भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरात शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी भव्य धार्मिक व सामाजिक उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, पाचोरा, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, पाचोरा तसेच श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवाने शहरात धार्मिकता, सामाजिक एकता आणि श्रमसंस्कृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. सकाळपासूनच नंदनवन सिटी जवळ, जुना अंतुर्ली रोड, पाचोरा येथील नियोजित भगवान श्री विश्वकर्मा मंदिराच्या जागेवर भाविकांची मोठी गर्दी जमू लागली होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता महाआरती व विधीवत पूजनाने झाली. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या वातावरणात भगवान श्री विश्वकर्मा यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला भूमिपूजन सोहळा पार पडला. हा ऐतिहासिक भूमिपूजन समारंभ आप्पासो. किशोर धनसिंग पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव) यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी मंदिर उभारणीच्या दिशेने एक ठोस आणि ऐतिहासिक पाऊल टाकले गेले असून भविष्यात हे मंदिर पाचोरा शहरातील एक प्रमुख श्रद्धास्थान ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी व मान्यवर म्हणून किशोर गुणवंतराव बारवकर (उपनगराध्यक्ष, नगरपालिका पाचोरा), अॅड. दादासो. अविनाश देविदास सुतार (नगरसेवक, नगरपालिका पाचोरा) तसेच दादासो. अपूर्व अजय थेंडे (थेंडे बिल्डर्स, पाचोरा) यांची उपस्थिती लाभली. तसेच भूमिपूजन समारंभ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भारतीय जनता पक्षाचे नगरपालिका सभागृहाचे गटनेते नगरसेवक सुरजदादा वाघ आणि नगरसेवक अविनाश सुतार ,शिवसेना युवासेनेचे शहरअध्यक्ष सुरज उर्फ भावडू शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास सामाजिक, सार्वजनिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या संपूर्ण उत्सवात समस्त विश्वकर्मीय समाज बांधव, भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. भगवान श्री विश्वकर्मा हे सृष्टीचे रचयिता, श्रमसंस्कृतीचे प्रतीक आणि कष्टकरी समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील एकता, सेवा, कौशल्य आणि सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युवकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाच्या भावी उभारणीसाठी प्रेरणा घेतली. कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या महाप्रसादाच्या माध्यमातून समता, बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाली. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तीत आणि भक्तिभावात पार पडल्याबद्दल आयोजकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या निमित्ताने पाचोरा शहरात धार्मिकतेसह सामाजिक बांधिलकी अधिक बळकट झाली असून भविष्यात उभारल्या जाणाऱ्या भगवान श्री विश्वकर्मा मंदिरामुळे समाजाला एकत्र आणणारे आणि श्रद्धेचे केंद्र निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे, मान्यवरांचे आणि नागरिकांचे आयोजक संस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

आज दि.31/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-
आज कामात चपळता दिसून येईल. अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना आत्मविश्वास ठेवा, पण हट्ट टाळा. घरगुती वातावरण समाधानकारक राहील.
शुभ अंक: 1 शुभ रंग: तांबडा

वृषभ-आज आर्थिक बाबतीत जागरूक राहणे गरजेचे आहे. मेहनतीचे फळ हळूहळू मिळेल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढेल. संयम ठेवल्यास दिवस अनुकूल जाईल.
शुभ अंक: 6 शुभ रंग: गडद हिरवा

मिथुन- आज विचार आणि कृती यामध्ये सुसूत्रता राहील. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. लेखन, बोलणे किंवा संवादाशी संबंधित कामात यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 5 शुभ रंग: पिवळसर

कर्क- आज भावनिक स्थैर्य राखणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबाचा आधार मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक समतोल राहील.
शुभ अंक: 2 शुभ रंग: चंदेरी

सिंह-आज आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण दिसून येतील. महत्त्वाच्या निर्णयांसाठी योग्य वेळ आहे. सामाजिक मान-सन्मान वाढेल. खर्च करताना विचार करा.
शुभ अंक: 9 शुभ रंग: केशरी

कन्या- आज नियोजनबद्ध काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. सहकाऱ्यांशी समन्वय साधावा लागेल. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्यविषयक सवयी सुधाराव्यात.
शुभ अंक: 4 शुभ रंग: फिकट निळा

तुला-आज नातेसंबंधांमध्ये समतोल साधण्याची गरज आहे. भागीदारीतील व्यवहार लाभदायक ठरतील. कागदी कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक- आज संयम आणि शांतता उपयुक्त ठरेल. गुप्त प्रयत्नांना यश मिळू शकते. भावनांवर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीबाबत सल्ला घेणे योग्य ठरेल.
शुभ अंक: 8 शुभ रंग: जांभळा

धनु-आज उत्साह आणि सकारात्मकता जाणवेल. नवीन शिकण्याच्या संधी मिळतील. प्रवास किंवा भेटीगाठी लाभदायक ठरतील. घरात आनंदी वातावरण राहील.
शुभ अंक: 3 शुभ रंग: निळा

मकर- आज मेहनत आणि शिस्त यांचा योग्य परिणाम दिसेल. कामात स्थैर्य मिळेल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल.
शुभ अंक: 10 शुभ रंग: तपकिरी

कुंभ- आज नवीन कल्पनांना वाव मिळेल. सामाजिक किंवा समूहातील कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. निर्णय घेताना व्यवहारिक रहा.
शुभ अंक: 11 शुभ रंग: आकाशी

मीन- आज अंतर्मुखतेतून योग्य मार्ग सापडेल. सर्जनशील कामात समाधान मिळेल. भावनिक विषय स्पष्टपणे मांडावेत. खर्च करताना सावधगिरी बाळगा.
शुभ अंक: 12 शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.30/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-
आज निर्णयक्षमता वाढलेली जाणवेल. कामातील अडथळे दूर होतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या नीट पार पाडाल. आर्थिक बाबी संतुलित राहतील.
शुभ अंक: 9 शुभ रंग: गडद लाल

वृषभ-आज संयम ठेवल्यास फायदा होईल. कामात थोडा विलंब जाणवू शकतो, पण परिणाम सकारात्मक राहतील. घरगुती विषयांमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 6 शुभ रंग: ऑलिव्ह हिरवा

मिथुन-आज संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. नवीन संधींबाबत चर्चा होऊ शकते. प्रवास किंवा भेटीगाठी यशस्वी ठरतील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या.
शुभ अंक: 5 शुभ रंग: आकाशी

कर्क- आज मन थोडे संवेदनशील राहील. कामात स्थिरता राखण्यासाठी धीर धरावा लागेल. कुटुंबातील सहकार्य मिळेल. आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका.
शुभ अंक: 2 शुभ रंग: क्रीम

सिंह-आज आत्मविश्वास वाढेल आणि जबाबदाऱ्या समर्थपणे पेलाल. नेतृत्वाच्या भूमिकेत यश मिळू शकते. मान-सन्मान वाढण्याची चिन्हे आहेत. खर्च मर्यादेत ठेवा.
शुभ अंक: 1 शुभ रंग: सोनेरी

कन्या- आज बारकाईने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. सहकाऱ्यांशी समन्वय साधावा लागेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यासाठी दिनचर्या सुधारावी.
शुभ अंक: 4 शुभ रंग: फिकट हिरवा

तुला- आज नातेसंबंधात समतोल राखणे महत्त्वाचे आहे. भागीदारीतील व्यवहार लाभदायक ठरू शकतात. कागदी कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थैर्य जाणवेल.
शुभ अंक: 7 शुभ रंग: निळसर राखाडी

वृश्चिक- आज कामात गुप्त प्रयत्न यशस्वी ठरतील. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.
शुभ अंक: 8 शुभ रंग: मरून

धनु- आज आशावादी दृष्टीकोन लाभदायक ठरेल. शिक्षण, प्रशिक्षण किंवा नवीन योजना सुरू करण्यास योग्य दिवस आहे. प्रवासातून अनुभव मिळेल. घरात समाधानाचे वातावरण राहील.
शुभ अंक: 3 शुभ रंग: जांभळट निळा

मकर-आज मेहनतीचे स्पष्ट परिणाम दिसतील. कामात स्थैर्य आणि विश्वासार्हता वाढेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. खर्चाचे योग्य नियोजन करा.
शुभ अंक: 10 शुभ रंग: तपकिरी

कुंभ- आज नवे विचार आणि कल्पना पुढे येतील. समूहात काम केल्यास यश मिळेल. मित्रांकडून मदत होईल. निर्णय घेताना वास्तववादी दृष्टी ठेवा.
शुभ अंक: 11 शुभ रंग: टर्कॉईज

मीन- आज अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवल्यास योग्य मार्ग सापडेल. सर्जनशील कामात समाधान मिळेल. भावनिक विषयांमध्ये स्पष्टता ठेवा. आर्थिक व्यवहार संयमाने करा.
शुभ अंक: 12 शुभ रंग: समुद्री निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

शेती, समाजकारण आणि वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे नेणारा भोसले परिवार; डॉ. अभय राजेंद्र भोसले यांच्या उज्ज्वल वाटचालीकडे आशेने पाहणारा पाचोरा

0

Loading

भडगाव – तालुक्यातील आमडदे गाव हे केवळ शेतीप्रधान म्हणूनच नव्हे, तर सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कुटुंबांसाठीही ओळखले जाते. याच आमडदे गावातील मूळ रहिवासी आणि सध्या पाचोरा येथे वास्तव्यास असलेला भोसले परिवार हा गेल्या अनेक दशकांपासून Agriculture, Public Life, Municipal Politics आणि Medical Profession या सर्व क्षेत्रांत सक्रिय राहिला आहे. या परिवाराने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पाचोरा व परिसरात विश्वास, प्रतिष्ठा आणि Service-Oriented Approachचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. डॉ. शिवाजी दयाराम भोसले, डॉ. सुरेश दयाराम भोसले माजी उपनगराध्यक्ष, डॉ. संजय दयाराम भोसले, डॉ. शांताराम किरण भोसले नगरसेवक, डॉ. विकास शांताराम भोसले, डॉ. हितेश सुरेश भोसले आणि डॉ. विजय चंद्रकांत भोसले अशा अनेक मान्यवर व्यक्तींच्या कार्यामुळे भोसले परिवाराची ओळख केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. ९० च्या दशकात एकाच परिवारातील तीन सदस्य तर आमडदे गावातील चार जण पाचोरा नगरपालिकेचे Councillor होते, ही बाबच या परिवाराचा सामाजिक व राजकीय प्रभाव स्पष्ट करणारी ठरते. या परंपरेला पुढे नेत राजेंद्र दयाराम भोसले मा.नगरसेवक तथा People’s Bank संचालक आणि Pachora Medical Associationचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. Co-operative Sector, Medical Fraternity आणि समाजकारण यांचा समतोल साधत त्यांनी पाचोरा शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामकाजातून Leadership, Organisational Skill आणि Patient-Centric Thinking सातत्याने दिसून येते. याच संस्कारांचे प्रतिबिंब त्यांचे सुपुत्र डॉ. अभय राजेंद्र भोसले यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीत ठळकपणे जाणवते. डॉ. अभय यांनी आपले Primary, Secondary आणि Higher Secondary Education पाचोरा शहरातच पूर्ण केले. शालेय जीवनात असताना ते संदीप महाजनसर संचलित Dhyeya Career Academyचे विद्यार्थी होते. अभ्यासाबाबतची त्यांची शिस्त, वेळेचे काटेकोर नियोजन आणि Goal-Oriented Study Pattern त्या काळातच सर्वांच्या लक्षात आली होती. विशेष म्हणजे अकॅडमीतील Night Study ( अभ्यासीका ) मध्ये त्यांचे सातत्याने उपस्थित राहणे, उशिरापर्यंत अभ्यास करणे आणि प्रत्येक विषयाची Conceptual Clarity मिळवण्याची त्यांची वृत्ती पुढील यशाची भक्कम पायाभरणी ठरली. शालेय शिक्षणानंतर त्यांनी श्री गो से हायस्कुल आणि श्री एम. एम. महाविद्यालय, पाचोरा येथे शिक्षण पूर्ण केले. पुढे Medical Entrance Preparation करत त्यांनी वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक येथे MBBSचे शिक्षण घेतले. कठोर परिश्रम, सातत्य आणि Academic Excellenceच्या जोरावर त्यांनी MGM Hospital, संभाजीनगर येथे MD Medicine ही पदविका यशस्वीपणे पूर्ण केली. या संपूर्ण प्रवासात त्यांनी केवळ अभ्यासावरच नव्हे तर Clinical Exposure, Patient Handling आणि Ethical Medical Practice यांवरही विशेष भर दिला. MD Medicine पूर्ण केल्यानंतरही त्यांनी समाधान मानले नाही. वैद्यकीय क्षेत्रातील वाढती गरज, विशेषतः Critical Patientsसाठी तज्ज्ञ उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी Super Speciality शिक्षणाचा मार्ग निवडला. SS Super Specialistसाठी DM या अभ्यासक्रमासाठी त्यांनी तयारी केली असून Critical Care या विषयात त्यांना All India Rank 581 मिळाला आहे. ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून पाचोरा, भडगाव तालुका आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद मानली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नामांकित Medical Collegesमध्ये पुढील शिक्षण पूर्ण करून Metro City Practice करण्याऐवजी, आपली वैद्यकीय सेवा वडिलोपार्जित कर्मभूमी आणि जन्मभूमीतच सक्रिय करण्याचा त्यांचा ठाम मानस आहे. ग्रामीण व निमशहरी भागात आजही Super Specialist Doctors आणि Advanced Critical Care Facilitiesची कमतरता आहे. अशा परिस्थितीत उच्च शिक्षित, तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्या मुळाशी राहून सेवा देण्याचा निर्णय घेणे ही सामाजिक दृष्ट्या अत्यंत मोलाची बाब ठरते. डॉ. अभय भोसले यांचा हा निर्णय अनेक Young Medical Aspirantsसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणार आहे. भोसले परिवाराची परंपरा ही केवळ पदे, सत्ता किंवा शिक्षणापुरती मर्यादित नसून समाजाशी असलेली नाळ, सामान्य रुग्णाच्या आरोग्याची काळजी आणि Service Before Self ही भावना या परिवाराचा खरा वारसा आहे. Agriculture Background जपत, Municipal Administration, Co-operative Banking आणि Medical Services या विविध क्षेत्रांत काम करताना त्यांनी लोकांचा विश्वास आणि आदर कायम राखला आहे. डॉ. अभय राजेंद्र भोसले यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी झुंज वृत्तपत्र व Dhyeya Newsचे संपादक संदीप महाजन यांच्या तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या यशस्वी प्रवासातून पाचोरा व परिसरातील रुग्णांना उच्च दर्जाची, Advanced, Specialised आणि संवेदनशील वैद्यकीय सेवा मिळेल, अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त होत असून भोसले परिवाराच्या दीर्घ आणि गौरवशाली परंपरेतून उभा राहणारा हा नवा अध्याय आरोग्यसेवा, समाजभान आणि जबाबदारीचा आदर्श निर्माण करणारा ठरेल, यात शंका नाही.

श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त पाचोरात भव्य धार्मिक-सामाजिक उत्सव व मंदिर भूमिपूजन सोहळा

0

Loading

पाचोरा – सृष्टीचे आद्य शिल्पकार, देवशिल्पी भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरात शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी भव्य धार्मिक व सामाजिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विश्वकर्मा जयंती उत्सव २०२६ निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक विधी, पूजन, मंदिर भूमिपूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार असून या सोहळ्याला विश्वकर्मा समाजासह सर्व भाविक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. भगवान श्री विश्वकर्मा हे सृष्टीचे रचयिता, श्रमसंस्कृतीचे प्रतीक आणि कष्टकरी समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील एकता, श्रद्धा, सेवा आणि सृजनशीलतेचे मूल्य अधिक दृढ करण्याचा उद्देश या उत्सवामागे असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या जयंती उत्सवाचे आयोजन महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, पाचोरा, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, पाचोरा आणि श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता महाआरती व विधीवत पूजनाने होणार असून त्यानंतर भगवान श्री विश्वकर्मा यांच्या नियोजित मंदिराच्या जागेचे भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. हा भूमिपूजन सोहळा आप्पासो. किशोर धनसिंग पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव) यांच्या शुभहस्ते पार पडणार असून या प्रसंगी मंदिर उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल टाकले जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून सौ. सुनीता किशोर पाटील (नगराध्यक्षा, नगरपालिका पाचोरा), किशोर गुणवंतराव बारवकर (उपनगराध्यक्ष, नगरपालिका पाचोरा), अॅड. दादासो. अविनाश देविदास सुतार (नगरसेवक, नगरपालिका पाचोरा) तसेच दादासो. अपूर्व अजय थेंडे (थेंडे बिल्डर्स, पाचोरा) यांची उपस्थिती लाभणार आहे. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास सामाजिक, सार्वजनिक व सांस्कृतिक प्रतिष्ठा प्राप्त होणार असून समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी, समाजबांधवांनी व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या माध्यमातून समाजातील समता, बंधुभाव आणि एकोप्याची भावना अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. हा संपूर्ण उत्सव नंदनवन सिटी जवळ, जुना अंतुर्ली रोड, पाचोरा येथील नियोजित भगवान श्री विश्वकर्मा मंदिराच्या जागेवर पार पडणार आहे. या ठिकाणी भविष्यात भव्य मंदिर उभारले जाणार असून ते पाचोरा शहरातील श्रद्धास्थान ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवक, ज्येष्ठ, महिला व कष्टकरी समाज एकत्र येऊन धार्मिक व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करतील, तसेच भगवान श्री विश्वकर्मा यांच्या विचारांप्रमाणे श्रम, कौशल्य व सर्जनशीलतेला समाजात योग्य स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या पवित्र सोहळ्याला सर्व समाजबांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र विश्वकर्मा सेना, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था आणि श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आज दि.29/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज कामात गती येईल, पण घाई टाळणे गरजेचे आहे. वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवा. घरगुती बाबींमध्ये समतोल राखावा लागेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
शुभ अंक: 3 शुभ रंग: लाल

वृषभ-आज संयम आणि स्थिरता तुमची ताकद ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सहकार्य लाभेल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा.
शुभ अंक: 6 शुभ रंग: हिरवा

मिथुन-आज नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. बोलण्यात स्पष्टता ठेवल्यास गैरसमज टळतील. प्रवासाचे योग संभवतात. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
शुभ अंक: 5 शुभ रंग: पिवळा

कर्क-आज भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कामात जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: 2 शुभ रंग: पांढरा

सिंह-आज नेतृत्वगुण दिसून येतील. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास ठेवा. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. खर्च आणि बचत यांचा समतोल साधा.
शुभ अंक: 1 शुभ रंग: केशरी

कन्या-आज नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. सहकाऱ्यांकडून मदत मिळू शकते. आरोग्याच्या सवयी सुधाराव्यात.
शुभ अंक: 4 शुभ रंग: निळा

तुला- आज संबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवावा लागेल. काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधा. कायदेशीर किंवा कागदी कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबी स्थिर राहतील.
शुभ अंक: 7 शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक- आज गोपनीय बाबी उघड होऊ शकतात, सावध रहा. मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. भावनिक निर्णय टाळा. गुंतवणुकीपूर्वी माहिती घ्या.
शुभ अंक: 9 शुभ रंग: जांभळा

धनु- आज सकारात्मक विचारांनी दिवस पुढे जाईल. शिक्षण किंवा कौशल्यवृद्धीसाठी योग्य वेळ आहे. प्रवासातून लाभ संभवतो. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
शुभ अंक: 8 शुभ रंग: फिकट निळा

मकर- आज शिस्त आणि परिश्रम यांचा फायदा होईल. कामात स्थैर्य मिळेल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. खर्च नियोजनबद्ध ठेवा.
शुभ अंक: 10 शुभ रंग: तपकिरी

कुंभ- आज कल्पकता आणि नवीन विचार उपयोगी पडतील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. समाजकार्य किंवा समूहात काम करण्याची संधी येऊ शकते. निर्णय घेताना व्यवहारिक राहा.
शुभ अंक: 11 शुभ रंग: जांभळट निळा

मीन- आज अंतर्मुखता वाढेल. सर्जनशील कामात समाधान मिळेल. भावनिक बाबतीत स्पष्टता ठेवा. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.
शुभ अंक: 12 शुभ रंग: समुद्री हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.28/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज नवीन निर्णय घेण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. आर्थिक बाबतीत सुधारणा जाणवेल. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: गडद लाल

वृषभ-आज संयम ठेवल्यास अनेक अडचणी सोप्या होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामात सातत्य ठेवल्यास प्रगती होईल. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवा

मिथुन-आज संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रवासाचे योग संभवतात. मन उत्साही राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: पिवळा

कर्क -आज भावनिक बाबतीत स्थैर्य राखणे गरजेचे आहे. घरगुती विषयांकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. निर्णय शांतपणे घ्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: पांढरा

सिंह -आज आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण यामुळे कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठेत वाढ होईल.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: सोनेरी

कन्या-आज नियोजनबद्ध काम केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्याल. सहकाऱ्यांशी सहकार्य ठेवा. मानसिक ताण कमी होईल.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: निळा

तुला -आज नातेसंबंधात समतोल राखणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवा. सर्जनशील कामात प्रगती होईल. मन शांत राहील.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक -आज अंतर्मुख होऊन विचार करण्याचा दिवस आहे. गुप्त योजना यशस्वी ठरू शकतात. वाद टाळावेत. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: मरून

धनु -आज नवीन अनुभव आणि शिकण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित गोष्टी अनुकूल राहतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील. उत्साह वाढेल.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: नारंगी

मकर-आज मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामात स्थैर्य राहील. वरिष्ठांकडून विश्वास मिळेल. कुटुंबात समाधानकारक वातावरण असेल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: तपकिरी

कुंभ-आज नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. मित्रांकडून सहकार्य लाभेल. खर्चाचे नियोजन गरजेचे आहे. मानसिक समाधान मिळेल.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: आकाशी

मीन -आज अंतःप्रेरणा योग्य दिशा दाखवेल. सर्जनशील कामात यश मिळेल. भावनिक स्थैर्य ठेवल्यास दिवस चांगला जाईल. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: निळसर हिरवा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

आज दि.27/01/2026 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष-आज निर्णयक्षमता वाढलेली राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांना मान मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिरता जाणवेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
शुभ अंक: 9 | शुभ रंग: तांबडा

वृषभ-आज संयम आणि सातत्य आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांकडे लक्ष द्या. नोकरी-व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक: 6 | शुभ रंग: हिरवट तपकिरी

मिथुन-आज नवीन संपर्क आणि माहिती मिळेल. कामात गती येईल. प्रवास किंवा बैठका यशस्वी ठरतील. मन उत्साही राहील.
शुभ अंक: 5 | शुभ रंग: फिकट पिवळा

कर्क-आज भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. घरगुती विषयांवर वेळ द्यावा लागेल. आर्थिक बाबतीत समाधान मिळेल. शांत विचारांनी निर्णय घ्या.
शुभ अंक: 2 | शुभ रंग: दुधी पांढरा

सिंह-आज आत्मविश्वासामुळे कामे सहज होतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. खर्च थोडा वाढू शकतो. प्रतिष्ठेत वाढ होईल.
शुभ अंक: 1 | शुभ रंग: केशरी

कन्या-आज बारकावे आणि नियोजन यावर भर द्यावा लागेल. आरोग्याशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. ताण कमी ठेवा.
शुभ अंक: 4 | शुभ रंग: गडद निळा

तुला-आज नातेसंबंधात स्पष्टता ठेवल्यास गैरसमज टळतील. आर्थिक बाबतीत समतोल राखा. सर्जनशील कामात समाधान मिळेल. मन स्थिर राहील.
शुभ अंक: 7 | शुभ रंग: फिकट गुलाबी

वृश्चिक-आज आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. गुप्त योजना योग्य ठरतील. वादविवाद टाळल्यास लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक: 8 | शुभ रंग: मरून

धनु-आज उत्साह आणि आशावाद वाढलेला राहील. शिक्षण किंवा प्रवासाशी संबंधित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन संधी मिळू शकतात.
शुभ अंक: 3 | शुभ रंग: गडद पिवळा

मकर-आज मेहनत आणि जबाबदारी यांचा योग्य परिणाम दिसेल. वरिष्ठांकडून विश्वास मिळेल. आर्थिक स्थैर्य राहील. कुटुंबात समाधानकारक वातावरण असेल.
शुभ अंक: 10 | शुभ रंग: राखाडी

कुंभ -आज नवीन विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणता येतील. मित्रांकडून मदत मिळेल. खर्चाचे नियोजन करा. मानसिक समाधान लाभेल.
शुभ अंक: 11 | शुभ रंग: निळसर आकाशी

मीन-आज अंतःप्रेरणा योग्य दिशा दाखवेल. सर्जनशील कामात प्रगती होईल. भावनिक स्थैर्य राखल्यास दिवस चांगला जाईल. आरोग्य ठीक राहील.
शुभ अंक: 12 | शुभ रंग: जांभळट निळा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

अभ्यासक्रमाशी जोडलेले नाविन्यपूर्ण उपक्रम; गो. से. हायस्कूलमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पाची शैक्षणिक क्षेत्रभेट

0

Loading

पाचोरा –  येथील गो. से. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ वर्गातील अध्यापनावर भर न देता अभ्यासक्रमाशी निगडित असे नाविन्यपूर्ण, उपयुक्त व अनुभवाधारित शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच परंपरेत नुकतेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. “परिसर अभ्यास” या विषयातील “पाणी” या प्रकरणाचा आशय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावा, या उद्देशाने पाचोरा नगर परिषदेच्या गणेश कॉलनी परिसरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाला ही भेट देण्यात आली. आजच्या दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र घराघरात पोहोचणारे शुद्ध पाणी कोणत्या प्रक्रियेतून तयार होते, याची माहिती बहुतांश वेळा विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांपुरतीच मर्यादित राहते. हीच मर्यादा दूर करण्यासाठी या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रत्यक्ष जाऊन पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रत्येक पायरी बारकाईने पाहिली. या वेळी प्रकल्प अधिकारी समीर पिंजारी, संजय बागुल आणि एकनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना जलशुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली. पाणी साठवण, गाळणी प्रक्रिया, रासायनिक प्रक्रिया, निर्जंतुकीकरण तसेच शुद्ध पाण्याचे वितरण कसे केले जाते, याबाबत त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. कच्चे पाणी प्रकल्पात आल्यानंतर ते पिण्यायोग्य होईपर्यंत कोणकोणत्या टप्प्यांतून जाते, हे प्रत्यक्ष दाखवून समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी या माहितीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक प्रश्न विचारले. पाण्यातील अशुद्ध घटक कसे काढले जातात, पाणी शुद्ध नसेल तर आरोग्यावर काय परिणाम होतात, शहराला दररोज किती पाणी पुरवले जाते, अशा प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा व अभ्यासातील उत्सुकता दिसून आली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांना संयमाने उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घातली. या शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध, सुरक्षित आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रकल्पाची माहिती घ्यावी, याकडे विशेष लक्ष देण्यात आले. पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक आर. बी. तडवी आणि पर्यवेक्षक राजेश बांठिया यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा अनुभवाधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विषयाची सखोल समज मिळते आणि शिकण्याची आवड वाढते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या क्षेत्रभेटीच्या यशस्वी आयोजनासाठी विजय पाटील, सागर पाटील, संदीप चौधरी, मयुरेश देवरे, रुपेश पाटील, चंद्रकांत पाटील, विशाल बागुल, सागर थोरात, चंदा चौधरी आणि संगीता लासुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, वेळेचे नियोजन आणि संपूर्ण उपक्रमाची शिस्तबद्ध अंमलबजावणी यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी जलशुद्धीकरण प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार रुपेश पाटील यांनी मानले. त्यांनी सांगितले की, अशा क्षेत्रभेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. एकूणच गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे अभ्यासक्रमाशी जोडलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम नियमितपणे राबवले जात असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे हा शाळेचा ठाम प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक आणि वैचारिक विकास होत असून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक भक्कम होत आहे, असे चित्र या क्षेत्रभेटीतून स्पष्टपणे दिसून आले.

ऐनपूर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी तंबाखूमुक्त भारताचा संकल्प

0

Loading

ऐनपूर: – येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व सामाजिक भान जपणाऱ्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी केवळ राष्ट्रीय सणाचा गौरव करण्यात आला नाही, तर “तंबाखू मुक्त भारत अभियान” या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाशी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना जोडून आरोग्यदायी भारताचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी राष्ट्रगीताने वातावरण भारावून टाकले. त्यानंतर अक्षय पाटील यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे प्रभावी वाचन केले. संविधान उद्देशिकेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांची आठवण करून देत प्रजासत्ताक दिनाचे खरे महत्त्व उपस्थितांच्या मनात अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष रामदास महाजन, चेअरमन श्रीराम पाटील, सचीव संजय पाटील, संचालक विकास महाजन, प्रल्हाद पाटील, हरी भिका पाटील, डॉ. सतिश पाटील, कैलाश पाटील, आर. एस. पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पांडुरंग पाटील, दिलीप पाटील, रविन्द्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर “तंबाखू मुक्त भारत अभियान” अंतर्गत उपस्थितांना शपथ देण्यात आली. या शपथेमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वतः दूर राहण्याचा, इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्याचा तसेच आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला. विशेषतः विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व गांभीर्याने ही शपथ घेतल्याने महाविद्यालयात आरोग्यजागरूकतेची सकारात्मक चळवळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकत तरुण पिढीने व्यसनमुक्त राहून शिक्षण, संशोधन व राष्ट्रउभारणीसाठी आपली ऊर्जा वापरावी, असे आवाहन केले. प्रजासत्ताक दिन हा केवळ शासकीय सोहळा नसून संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे, याची आठवण करून देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी शिक्षणसंस्था केवळ शैक्षणिक ज्ञान देणारी नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, आरोग्यजागरूकता व नैतिक मूल्ये रुजविण्याचेही कार्य करते, असे प्रतिपादन केले. तंबाखू मुक्त भारत अभियानासारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, प्राध्यापकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रप्रेम, सामाजिक भान आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अधिक अर्थपूर्ण ठरला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!