Home Blog Page 102

औंधकर साहेबांचा निरोप सोहळा पाचोऱ्यात वकील संघाच्या गौरवमय उपस्थितीत संपन्न

0

Loading

पाचोरा – निःपक्षपाती न्यायदान, संयमी व समन्वयपूर्ण कार्यपद्धती, न्यायालयीन कार्यवाहीतील सौम्यता आणि व्यवहार्य दृष्टिकोन यामुळे संपूर्ण पाचोरा न्यायालय परिसरात लोकप्रिय ठरलेले दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मा. जी. बी. औंधकर साहेब यांची पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ पाचोरा वकील संघातर्फे आयोजित करण्यात आलेला सत्कार व निरोप समारंभ अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याप्रसंगी पाचोरा न्यायालयाचे संपूर्ण विधिज्ञ समुदाय, न्यायालयीन कर्मचारीवर्ग आणि मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश मा. बोरा मॅडम यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मा. हिवराळे मॅडम यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी ठरली. तसेच पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. कविता मासरे रायसाकडा, सचिव ॲड. निलेश सुर्यवंशी, सहसचिव ॲड. अंबादास गोसावी यांच्यासह सर्व सन्माननीय वरिष्ठ विधिज्ञ, कनिष्ठ वकील, महिला वकील भगिनी आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात पाचोरा वकील संघाचे सचिव ॲड. निलेश सुर्यवंशी यांच्या मनपूर्वक स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यांनी औंधकर साहेबांच्या न्यायालयीन सेवाभावाचे आणि त्यांच्या सहकार्यशील दृष्टिकोनाचे कौतुक करत संपूर्ण वकिली समुदायाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या प्रस्ताविकेतून औंधकर साहेबांची कार्यशैली, त्यांची वेळेची शिस्त, प्रामाणिकपणा आणि कायद्याच्या प्रत्येक बाबतीत असलेली सखोल जाण याचे सविस्तर दर्शन घडले.
यानंतर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील यांनी औंधकर साहेबांच्या पाचोरा कार्यकाळातील अनेक संस्मरणीय क्षण उलगडले. त्यांनी सांगितले की, औंधकर साहेब हे न्यायालयीन कार्यकाळात केवळ न्यायाधीश म्हणून नव्हे तर मार्गदर्शक आणि मार्गचिन्ह म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार केला आणि निर्णय घेताना सामाजिक न्यायाचे भान ठेवले. त्यांच्या न्यायदानाच्या प्रक्रियेमुळे अनेकांना न्याय मिळविण्याचा आत्मविश्वास मिळाला.
सत्कार समारंभाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ वकिलांनी आपले अनुभव कथन केले. काहींनी औंधकर साहेबांच्या कठोर पण निष्पक्ष भूमिका कशा न्यायालयीन सुसूत्रतेसाठी महत्वाच्या ठरल्या, याबद्दल सांगितले. त्यांच्या नेतृत्वात कोर्टाची शिस्त, वेळेचे पालन आणि सुनावणीस आलेल्या प्रत्येक प्रकरणावरील समजूतदार विचारशक्तीची उदाहरणे दिली गेली. वकिलांनी त्यांच्या सहकार्य, सहिष्णुता आणि न्यायप्रियतेचा गौरव करत त्यांच्याविषयीचा आपुलकीचा भाव व्यक्त केला.
औंधकर साहेबांनी आपल्या निरोपाच्या भाषणात अत्यंत नम्रपणे आणि विनम्र शब्दांत पाचोरा येथील न्यायालयीन सेवेत दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, पाचोरा येथे काम करताना त्यांनी फक्त न्यायदानाचा दृष्टीकोन ठेवला नाही, तर प्रत्येक व्यक्तीशी समरसतेने वागण्याचा प्रयत्न केला. येथील वकील, कर्मचारी आणि सर्वच घटकांमधून मिळालेला प्रेम, आदर आणि विश्वास हेच त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे बक्षीस आहे असे सांगत त्यांनी सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले. कार्यक्रमात उपस्थित विधिज्ञ आणि मान्यवरांनी औंधकर साहेबांच्या कार्यशैलीबाबत विशेष गौरवोद्गार व्यक्त केले. काहींनी सांगितले की, औंधकर साहेबांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन कार्यवाहीत नित्य एक सकारात्मक ऊर्जा जाणवत असे. एखाद्या वकिलाच्या युक्तिवादाला ते समजून घेत, प्रतिप्रश्न करत, न्या. प्रक्रिया अधिक पारदर्शक करत. ते नेहमीच म्हणत – “न्याय मिळावा, आणि तो वेळेत मिळावा, हा प्रत्येकाचा अधिकार आहे.” त्यांच्या या विचारसरणीमुळे अनेक वकील त्यांच्या निर्णयशक्तीने प्रभावित झाले.कार्यक्रमात औंधकर साहेबांचा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सभागृहात एक शांत, पण भावनिक वातावरण तयार झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत नेटकेपणाने व उत्साहात पाचोरा वकील संघाचे सहसचिव ॲड. अंबादास गोसावी यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, वकिल, कर्मचारी, तसेच अतिथींशी संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर आभार प्रदर्शन पाचोरा वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲड. कविता मासरे रायसाकडा यांनी अत्यंत समर्पक शब्दांत करत सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. कविता मासरे रायसाकडा, सचिव ॲड. निलेश सुर्यवंशी, सहसचिव ॲड. अंबादास गोसावी तसेच सर्व सन्माननीय ज्येष्ठ विधिज्ञ, कनिष्ठ वकील, महिला वकिल भगिनी, l वाट सर्वांना पुढे चालण्यासाठी प्रेरणा देणारी ठरेल. त्यांच्या पुढील न्यायिक प्रवासासाठी संपूर्ण पाचोरा न्यायालयीन कुटुंबाने शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

पत्रकारांवरील हल्ल्याला न्यायाची झुंज : संदीप महाजन यांच्या संघर्षाला न्यायालयीन मान्यता, जिल्ह्यातील पहिल्या प्रकरणाची नोंद

0

Loading

भडगाव – तालुक्यातील गोंडगाव घेथे येथील एका निरागस बालिकेच्या अत्याचारानंतर निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या प्रकरणात आरोपीवर जलद आणि कठोर कारवाई व्हावी म्हणून सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने 4 ऑगस्ट 2024 रोजी भडगाव तहसील कार्यालयावर भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची प्रमुख मागणी होती की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि सरकार पक्षातर्फे सुप्रसिद्ध फौजदारी वकील अँड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. मात्र या आंदोलनानंतरही कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. याबाबत झुंज वृत्तपत्राचे व ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप महाजन यांनी बातमी प्रकाशित करत बातमीच्या शीर्षकात वापरलेल्या ‘मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी’ या शब्दामुळे विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी चिडून त्या रात्री 8.30 वाजता संदीप महाजन यांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः ही शिवीगाळ केल्याचे नंतर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर मान्य केले आणि “होय, रेकॉर्डिंग माझेच आहे” असे जाहीर वक्तव्य दिले.
संदीप महाजन यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या ‘कै. स्वातंत्र्यसैनिक आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन चौकात’ त्यांच्यावर 9 ऑगस्ट 2024 रोजी हल्ला करण्यात आला. तोंडावर रूमाल टाकून त्यांना गाडीवरून खाली पाडण्यात आले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याचा थरकापजनक व्हिडीओ काही वेळातच अजय जैस्वाल (कुरंगी) या व्यक्तीने स्वतःच्या वॉट्सऍप ग्रुपवर प्रसारित केला. व चॅटींग या मारहाणीची तक्रार दिल्यानंतरसुद्धा पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल न करता केवळ एनसी (नॉन कॉग्निझेबल) दाखल केली व आरोपींना भादंवि कलम 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून मुक्त केले.
विशेष बाब म्हणजे या हल्ल्यातील आरोपी शरद युवराज पाटील व सुमित रविंद्र सावंत यांच्या विरोधात आधीपासूनच पाचोरा आणि जळगाव न्यायालयांमध्ये गुन्ह्यांसंदर्भातील एनबीडब्ल्यू म्हणजेच नॉन बॅलेबल वॉरंट्स प्रलंबित होते. परंतु तरीही पोलिसांनी दुर्लक्ष केले. अखेर संदीप महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर (औरंगाबाद ) खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन क्रमांक 1422/2023 दाखल केली. यात संदीप महाजन यांना मा. उच्च न्यायालयाने दिलासा देत यासंबंधी नोटीस काढली. तर दुसऱ्या मुद्द्यावर “कलम 156 (3) अन्वये कनिष्ठ न्यायालयात संधी उपलब्ध आहे” असा निर्देश दिला.
यास अनुसरून संदीप महाजन यांनी भारतीय दंड संहिता कलम 156 (3) नुसार पाचोरा न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज नामंजूर करण्यात आला. तरीही त्यांनी हार न मानता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात क्रि. रे. अपील क्रमांक 31/2024 या क्रमांकाने अपील दाखल केला. सदर अपील प्रकरण सत्र न्यायाधीश आर. एस. पवार यांच्या समोर सुनावणीस आले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून 14 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल देण्यात आला. या निकालात मा. सत्र न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की विद्यमान आमदार किशोर धनसिंग पाटील, अजयकुमार देविदास जैस्वाल (कुरंगी), शरद युवराज पाटील, शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख सुमित रविंद्र सावंत आणि चरणसिंग प्रेमसिंग पाटील (वडगाव सती, ता. भडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 323 (मारहाण), 504 (उत्तेजक व अपमानकारक शब्द), 506 (जीव घेण्याची धमकी), 120 (ब) (कट रचणे), 34 (सामूहिक हेतू) आणि “प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध)” अधिनियम 2017 चे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
या निर्णयाच्या आधारे पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन सदरचा तपास डीवायएसपी धनंजय वेरूळे यांनी पूर्ण करून अजय जैस्वाल, शरद पाटील, सुमित सावंत आणि चरणसिंग पाटील यांच्या विरोधात आरोपपत्र ठेवत मा. न्यायालयात चार्जशीट दाखल केले. मात्र आमदार किशोरआप्पा पाटील यांचा अर्ज सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर (औरंगाबाद ) खंडपीठात प्रलंबित असल्यामुळे त्यांची चौकशी थांबवण्यात आली आहे. अन्य आरोपींविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल झाले. ही जळगाव जिल्ह्यातील पहिली केस आहे जी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एवढेच नव्हे तर ‘चार्जशीट’सुद्धा सरकारच्या नवीन तपास यंत्रणेनुसार करण्यात आलेली ही पहिली घटना ठरली आहे. या संपूर्ण लढ्यात अर्जदार संदीप महाजन यांच्यावतीने विविध न्यायालयीन स्तरांवर प्रतिष्ठित वकिलांनी काम पाहिले. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. परेश आर. पाटील (मो. 8625034444) यांनी प्रभावी कामगिरी बजावली, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. मंगला वाघे (मुंबई) आणि अॅड. हर्षल रणधिर (मो. 9766399885) यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पत्रकार महाजन यांच्या न्याय हक्कासाठी ठोस पावले उचलली. याशिवाय, या प्रकरणात मुंबई प्रेस क्लब तर्फेही महाजन यांना विनामूल्य न्यायालयीन सहकार्य करण्यात आले. या सहकार्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार व अॅड. ए. के. जैन, ज्येष्ठ पत्रकार गीता मॅडम , आणि अॅड. मंगला वाघे यांनी कायदेशीर मार्गदर्शन करून या लढ्यात खंबीर पाठबळ दिले. ही संपूर्ण घटना केवळ एका पत्रकारावर झालेला हल्ला नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. या लढ्याने केवळ पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून दिला नाही, तर महाराष्ट्रातील पत्रकार क्षेत्रात एक ऐतिहासिक आदर्श निर्माण केला. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या पत्रकारांसाठी ही घटना एक प्रेरणास्त्रोत ठरणारी आहे. यासाठी मुंबई सह देशभरातील तब्बल 16 स्वाभिमानी व खुद्दार पत्रकार संघटना एकत्रित येऊन पाठीशी उभ्या राहिल्या.
पत्रकार संदीप महाजन यांची प्रतिक्रिया :
“मी पत्रकार म्हणून गेल्या 35 वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याचे कार्य करत आलो आहे. गोंडगाव येथे घडलेल्या बालिकेवरील अमानुष अत्याचारानंतर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षावर मी बातमी प्रकाशित केली, यामुळेच माझ्यावर राजकीय पातळीवर संताप व्यक्त करत अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला आणि नंतर माझ्यावर शारीरिक हल्ला देखील झाला. हा केवळ माझ्यावरचा नाही, तर संपूर्ण पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला होता.
माझा उद्देश कुणावरही व्यक्तिगत टीका करणे नव्हता, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे समाजाचे लक्ष वेधणे हा होता. पण जेव्हा सत्तेच्या बळावर विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा न्यायालय हा शेवटचा आणि सर्वोच्च आधार उरतो. मी न्यायसंस्थेवर विश्वास ठेवून लढा दिला आणि आज मला समाधान वाटते की माझ्या संघर्षाला न्यायालयीन आधार मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण कायद्यानुसार नोंदवलेला हा पहिलाच गुन्हा असून, यामुळे इतर पत्रकार बांधवांनाही दिशा मिळेल अशी आशा आहे. हा लढा वैयक्तिक नव्हता, तर हा संघर्ष होता पत्रकारांच्या हक्कांचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा.
या लढ्यात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या राज्यातील आणि जिल्ह्यातील तब्बल १६ पत्रकार संघटनांप्रती तसेच मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि माझ्या कायदेशीर लढ्यात साथ देणाऱ्या अॅड. परेश आर. पाटील (मो. 8625034444), अॅड. मंगला वाघे (मुंबई), अॅड. हर्षल रणधिर (मो. 9766399885), अॅड. ए. के. जैन आणि अॅड. गीता मॅडम यांच्यासह ज्या ज्ञात – अज्ञात व्यक्तींनी मला प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
या निकालामुळे कुठलाही पत्रकार दबाव, धमकी वा हल्ल्यांमुळे गप्प बसणार नाही, हे ठामपणे सिद्ध झाले आहे. यापुढेही मी अन्यायाविरुद्ध आणि सत्यासाठी निःपक्षपाती पत्रकारिता करत राहीन. हा विजय केवळ माझा नाही, तर संपूर्ण चौथा स्तंभ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे.”

‘आरंभ’ कला-साहित्य मंचाचा बहारदार रंगारंग शुभारंभ

0

Loading

मिरा-भाईंदर (गुरुदत्त वाकदेकर) : अमिता जोशी आणि कल्पना दिलीप मापूसकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘आरंभ’ या कला-साहित्य मंचाचा पहिला रंगारंग कार्यक्रम शनिवार १९ एप्रिल, २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्था, भाईंदर येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष शंकर जंगम यांनी पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर अमिता जोशी यांच्या सुमधूर स्वरात सादर झालेल्या ‘ओंकार’ या गणेश वंदनेने वातावरण मंगलमय केले.

ध्वनी शाह यांच्या पुष्पांजलीने आणि ऋतूल पारेख, मृदुला विश्वास, शिखा शाह यांच्या ‘त्रिश्लोकम’ नृत्य सादरीकरणाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

‘देवता’ ही लेखिका विजया वाड यांची कथा सरोज गाजरे यांनी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

भूपाल चव्हाण या जातिवंत गझलकारांनी ‘चूक होती का खरी’ ही भावस्पर्शी गझल सादर करत रसिकांच्या मनात घर केले.

अरविंद देशपांडे यांची ‘लावण्य’ ही कविता स्त्रीच्या तारुण्यसौंदर्याचे प्रत्ययकारी चित्र उभे करत असतानाच, कल्पना दिलीप मापूसकर यांनी ‘संध्याछाया’ ही कविता सादर करत उतारवयातील स्त्रीसौंदर्याचे समर्पक चित्रण केले. ‘तरीही म्हणता राव, देखणं आहे तुमचं लावण्य’ या धृपदाने उपस्थितांची मने जिंकली.

जगदीश अबगुल यांनी ‘स्वर गंगेच्या काठावरती’ हे गीत सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सरोज गाजरे यांनी स्त्रीवर लादलेल्या सामाजिक बंधनांवर भाष्य करणारी ‘चौकट’ ही कविता सादर केली.

लावणी सम्राट विलास कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘अँटी’ या ठसकेबाज लावणीने रंगत आणली –
“सपनात सुदिक मला असं कुणी बोललं न्हाई,
ह्यो ह्यो टकल्या मेला, मला अँटी बोलला बाई…”
या धृपदाने वातावरणात हास्याची लहर उसळली.

त्यानंतर अमिता जोशी यांनी ‘रेशमाच्या रेघांनी’ ही लावणी सादर करत कार्यक्रमात अधिक रंग भरला. वन्समोअरचा आवाज प्रेक्षकांतून पुनः एकवार दुमदुमला.

होडवेकर यांनी आपला दमदार आवाज लाभलेल्या कविता सादर करत श्रोत्यांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाच्या अखेरीस अमिता जोशी यांनी पुन्हा आपल्या कोकीळ कंठातून ‘कोकीळ कुहू… कुहू… बोले’ हे गीत सादर करत मन जिंकले.

सांस्कृतिक कला मंचच्या समूहाने सादर केलेले ‘माऊली… माऊली…’ हे सामूहिक नृत्य विशेष दाद मिळवत लक्ष वेधून गेले.

कार्यक्रमातील सहभागी सर्व कलाकारांचा विरंगुळा केंद्रातर्फे फुलांच्या गुच्छांनी मन:पूर्वक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ आणि ‘राष्ट्रगीत’ याच्या सामूहिक सादरीकरणाने अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता जोशी यांनी अतिशय ओघवत्या, रसाळ शैलीत करत रसिकांना क्षणभरही दुरावू दिलं नाही. त्यांच्या शैलीदार निवेदनाने कार्यक्रमाची एकसंध गुंफण साधली.

‘आरंभ’ चा हा पहिला कार्यक्रम आपल्या नावाप्रमाणेच कलारसिकांच्या मनात संस्मरणीय ठसा उमटवत, एक नवे दालन खुले करून गेला.

वृद्धाश्रमाच्या वात्सल्यसेवेचा गौरव : पाचोऱ्याची डॉ. अपर्णा देशमुख यांना राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्काराने सन्मान

0

Loading

मुंबई – (झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज मंत्रालय प्रतिनिधी ) पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल या शिक्षणाच्या पवित्र भूमीतून निघून पुण्यासारख्या महानगरात आपली सेवा वृत्ती आणि संवेदनशीलता जपत अनेक गरजू, निराधार, वृद्धांसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉ. अपर्णा देशमुख यांना नुकताच राज्यस्तरीय ‘गिरजाई सेवाव्रती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला असून, पाचोरा येथील श्री गो.से.हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनीचा या कार्याचा सन्मान म्हणजे पाचोऱ्यासाठीही गौरवाची बाब ठरली आहे.
सध्या पुणे येथील सिंहगड रोड परिसरात वास्तव्य असलेल्या डॉ. अपर्णा देशमुख या गेली तब्बल १५ वर्षे “आभाळमाया वृद्धाश्रम” या संस्थेच्या माध्यमातून निराधार, एकटे पडलेले, उपेक्षित आणि आजारी वृद्धांना मायेची सावली देण्याचे काम करीत आहेत. त्यांचे हे कार्य केवळ समाजकारण नव्हे, तर एक भावनिक, आध्यात्मिक आणि मानवतेच्या पातळीवरील समर्पण आहे. त्यांच्या वृद्धाश्रमात सध्या ८१ ज्येष्ठ नागरिक सन्मानपूर्वक आणि मायेच्या छायेखाली राहत आहेत.
डॉ. अपर्णा देशमुख या मूळच्या चाळीसगाव तालुक्यातील असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण भारती विद्यापीठ, पुणे येथे पूर्ण झाले. त्या पाचोरा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. अनिल देशमुख आणि सौ. निर्मला देशमुख यांची कन्या आहेत. डॉ. अनिल देशमुख हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत अशासकीय सदस्य, तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोगात मध्यस्थ पॅनल सदस्य (धुळे) अशा विविध जबाबदारीच्या भूमिका पार पाडत आहेत. अपर्णा यांचे सामाजिक भान आणि मूल्यनिष्ठ वृत्ती यांचा पाया याच घरातील संस्कारांतून घडलेला आहे.
डॉ. अपर्णा देशमुख यांनी आजवर सुमारे ५००० वृद्धांना सुसंस्कारी, मायेचा आणि सेवाभावाचा सहवास दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून जवळपास ४००० हून अधिक गरजू वृद्ध रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हे सारे कार्य त्या कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय, पूर्णपणे आपल्या कुटुंबाच्या पाठबळावर आणि आपल्याच मेहनतीवर करत आहेत. हे कार्य म्हणजे केवळ आरोग्य सेवा नव्हे, तर एक सामाजिक क्रांती आहे.
या असामान्य, अद्वितीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत ठाणे येथील “गिरजाई प्रतिष्ठान” या सेवाभावी संस्थेने मातोश्री स्व. गिरजाई ठुसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय “गिरजाई सेवाव्रती पुरस्कार” यावर्षी डॉ. अपर्णा देशमुख यांना जाहीर केला. हा पुरस्कार “आनंद दिघे विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय”, ठाणे येथे एका भव्य आणि गरिमामय सोहळ्यात डॉ. अपर्णा देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याला उपस्थित असलेले मान्यवर हे देखील समाजात प्रतिष्ठा लाभलेले, सेवाभावाने ओतप्रोत भरलेले होते. प्रमुख अतिथी म्हणून स्व. कॅप्टन विनायक गोरे यांची वीरमाता, लेखिका आणि व्याख्यात्या अनुराधा गोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास ठुसे, मानद सचिव सौ. विदुला ठुसे, संपदा वागळे, प्रदीप धवल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा वागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. विदुला ठुसे यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खुद्द प्रदीप धवल होते.या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रु.२५,०००/- चा धनादेश देऊन डॉ. अपर्णा देशमुख यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संपदा वागळे यांनी डॉ. अपर्णा देशमुख यांच्या कार्याचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष गौरवोद्गार काढत, “असे सुसंस्कारित कार्यकर्ते समाजाला लाभणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते”, असे भावनिक उद्गार काढले. डॉ. अपर्णा देशमुख यांना यापूर्वीही विविध मान्यवर संस्था, प्रतिष्ठान व राष्ट्रीय स्तरावरील संघटनांनी गौरविले आहे. यामध्ये सन २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताच्या वतीने “श्रीस्वामी विवेकानंद युवा पुरस्कार”, सद्गुरु सांगवडेकर रुकडीकर महाराज यांचा “माऊली आनंदी पुरस्कार”, मदर तेरेसा पुरस्कार, दैनिक लोकसत्ता समूहाचा “नवदुर्गा पुरस्कार”, रोटरी इंटरनॅशनलचा “व्होकेशनल सेवा पुरस्कार”, जर्नलिस्ट असोसिएशनचा “नवदुर्गा पुरस्कार”, एनआरआय पॅरेंट्स असोसिएशनचा सन्मानपत्र, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय नारीशक्ती गौरव पुरस्कार आदींचा समावेश होतो. या सर्व पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची व्यापक दखल घेतली आहे.आजवर त्यांना अनेक मान्यवर व्यक्तींचे शुभाशीर्वाद लाभले आहेत. त्यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहली, कमेंटेटर सुनंदन लेले, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तबलावादक स्व. झाकिर हुसेन, अभिनेता नाना पाटेकर, ग्राहक संरक्षण मंत्री स्व. नामदार गिरीश बापट, माजी आमदार दादासाहेब पवार, आमदार शिवाजीराव कोंडे, प्रसिद्ध वकील ॲड. उज्ज्वल निकम, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, माजी अन्न सुरक्षा आयोग महाराष्ट्राचे महेश ढवळे, केंद्रीय प्रतिनिधी विजय सागर, प्रांत प्रतिनिधी शुभदा नागपूरकर, किसान सेवा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कपिला मुठे, माजी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, माजी विक्रीकर आयुक्त कृष्णराव शेलार, इस्रो आणि नासाचे शास्त्रज्ञ अविनाश शिरोडे, पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉ. प्रदीप घळसासी, हिसार विद्यापीठाचे डॉ. विवेक कुलकर्णी, मंत्री दत्ताजी सावंत यांचे विशेष अधिकारी डॉ. जगन्नाथ सोनवणे, डॉ. वाय.डी. पाटील, डॉ. सुधाकर निर्मल यांचा विशेष उल्लेख करता येईल.
पुरस्कार स्वीकृती वेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. अपर्णा देशमुख म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या मातापित्याच्या संस्कारांचा आणि त्यांच्याच प्रेरणेचा सन्मान आहे. मी सौभाग्यशाली आहे की माझ्या आदर्श वडिलांच्या सान्निध्यात, त्यांच्या उपस्थितीत मी हा सन्मान स्वीकारला. ही केवळ माझीच नव्हे तर आभाळमायेतील सर्व वृद्धांची सेवा, त्यांच्यावर असलेले प्रेम आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारा विश्वास यांची पावती आहे.”
या सन्मान सोहळ्याला विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्य, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, वृद्धाश्रमाचे हितचिंतक आणि पुणे तसेच ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साऱ्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला अधिक भारदस्त आणि भावनिक वातावरण लाभले.
डॉ. अपर्णा देशमुख यांचे हे सेवाभावाचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श आहे. स्वतःच्या वैद्यकीय शिक्षणाचा लाभ केवळ आर्थिक उन्नतीसाठी न घेता, समाजासाठी, गरजूंसाठी वापरण्याचे त्यांनी दाखवलेले उदाहरण हे समाजात सकारात्मक बदल घडविणारे आहे. त्यांच्या कार्यातून समाजात एक नवा आदर्श निर्माण होत असून, ‘नवा भारत घडवायचा असेल तर अशा सेवाव्रतींची संख्या वाढवावी लागेल’, हे स्पष्ट होते.या संपूर्ण गौरव सोहळ्याचा शेवट समाधानकारक, प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा ठरला. डॉ. अपर्णा देशमुख यांना मिळालेला हा सेवाव्रती पुरस्कार हे केवळ एक सन्मानपत्र नाही, तर एका व्यापक सामाजिक क्रांतीचा गौरव आहे – जी माणुसकीच्या मूळ गाभ्याशी जोडलेली आहे.

सेवानिवृत्त शिक्षक के सम्मान में होने वाला भव्य आयोजन — मनियार बिरादरी की जानिब से मो. ईद्रीस मनियार साहब का इस्तक़बाल 21 अप्रैल को पाचोरा में

0

Loading

पाचोरा – तालीम के मैदान में तक़रीबन चालीस साल तक बड़ी ही ख़ुलूस और ईमानदारी के साथ ख़िदमत अंजाम देने वाले न्यू उर्दू हाईस्कूल और जूनियर कॉलेज, पाचोरा के उप-अध्यापक मो. ईद्रीस अमानुल हक़ मनियार साहब की सेवानिवृत्ति के मौक़े पर पाचोरा मनियार बिरादरी की तरफ़ से एक पुर-वक़ार इज़्ज़त अफ़ज़ाई और तौसीफ़ी तक़रीब का एहतमाम सोमवार, 21 अप्रैल 2025 को सुबह 11 बजे किया गया है। यह प्रोग्राम न्यू उर्दू हाईस्कूल के ए-वन हॉल के पीछे मुनअक़िद होने जा रहा है जिसमें शहर और इलाक़े की नामवर शख़्सियतें शिरकत फरमाने जा रही हैं।
इस मुहतरम और मुबारक तक़रीब की सदारत जिला जळगांव मनियार बिरादरी के सदर फारुख़ शेख़ अब्दुल्ला साहब फरमाएंगे, जबके बतौर मेहमान-ए-ख़ुसूसी माननीय आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील साहब (विधायक, पाचोरा-भडगांव) की आमद भी तय है। इनके अलावा SDO भुषण आहीरे, तहसीलदार विजय बनसोडे, DYSP धनंजय येरुळे, पुलिस निरीक्षक अशोक पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, गट शिक्षण अधिकारी समाधान पाटील, तालुका कांग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, जकेरिया एजुकेशन सोसायटी के सदर शेख़ खलील नूर मोहम्मद, भडगांव तालुका उर्दू एजुकेशन सोसायटी के खाज़िंदार मुख्तार मोहम्मद शाह, पाचोरा मनियार बिरादरी के सदर शेख़ इकबाल शेख़ ईसा मनियार, और जळगांव के समाजसेवी डॉ. शेख़ अताउर रहमान अमानुल हक़ साहब की भी शिरकत इस तक़रीब में होने जा रही है।
यह तक़रीब एक मामूली सत्कार नहीं बल्कि तालीम, अदब, अख़लाक़ और समाजी ख़िदमत का एक शानदार इज़हार होगा। मो. ईद्रीस मनियार साहब ने अपने करियर में सिर्फ़ पढ़ाने का काम नहीं किया बल्कि तलबा की शख्सियत संवारने, उन्हें समाज का मोहतरम और जिम्मेदार नागरिक बनाने की पूरी कोशिश की। उनका तरीका-ए-तदरीस, उनकी शख्सियत और उनका सुलूक आज भी तलबा के दिलों में बसा हुआ है।
इस प्रोग्राम का एहतमाम शेख़ इरफान मनियार साहब कर रहे हैं, जो कि जिल्हा कांग्रेस कमेटी जळगांव के सेक्रेटरी भी हैं। इस तक़रीब में स्कूल के पुराने तलबा, असातिज़ा, अवाम और समाजी ख़िदमतगुज़ार बड़ी तादाद में शिरकत करने वाले हैं।
मो. ईद्रीस साहब का ताल्लुक़ एक ऐसे उस्ताद से है जिनके अंदर तालीमी उसूल, शराफ़त, सादगी और इख़लास का बेहतरीन संगम था। उन्होंने हमेशां इख़लाक़ियात और तालीम को साथ लेकर काम किया। उन्होंने गरीब, पसमांदा और जरूरतमंद तबक़े के बच्चों को मुकम्मल तवज्जो और रहनुमाई दी। स्पर्धात्मक इम्तिहान, अदबी मुकाबले, तक़रीरी और तहरीरी मुशायरे हो या सांस्कृतिक प्रोग्राम — उन्होंने हर मंच से बच्चों की काबिलियत को निखारने का काम किया।
तक़रीब के दौरान मो. ईद्रीस साहब को शाल, फूलों का हार और तौसीफी स्मृति चिन्ह पेश कर के सम्मानित किया जाएगा। इस मौके पर मौजूद तमाम मेहमान-ए-गिरामी उनकी तालीमी ख़िदमात पर रौशनी डालते हुए उनके बारे में अपने तास्सुरात पेश करेंगे।
इस पूरे प्रोग्राम को लेकर पाचोरा शहर में एक अलग ही रौनक और मुसर्रत का माहौल है। हर तबक़े के लोग इस सत्कार प्रोग्राम का हिस्सा बनने जा रहे हैं। मनियार बिरादरी के इस पहल की चारों तरफ़ सराहना हो रही है, और यह साबित हो रहा है कि उस्ताद का अदब करना हमारी तहज़ीब का हिस्सा है।
इस तक़रीब के बाद मेहमानों के लिए तक्रिबन ज़रियत-ए-ज़ियाफ़त (अल्पोपहार) का भी एहतमाम किया गया है। इस पूरे कार्यक्रम की मंसूबाबंदी और तंज़ीम बहुत ही मुंतज़म तरीके से की गई है जिसमें मुन्तज़मींन, स्कूल का अमला, समाजी इदारे, अवाम और मनियार समाज की पुरजोश भागीदारी नुमायां होगी।
यह प्रोग्राम दरअस्ल एक उस्ताद के इल्मी सफर का जश्न होगा — जहां तालीम, तज़्किया, तहज़ीब और तक़्दीर सब एक साथ जुड़कर एक आदर्श मिसाल पेश करेंगे। यकीनन ये तक़रीब तालीम से जुड़े हर शख़्स के लिए एक मुसबत और रौशन पैग़ाम साबित होगी।

पाचोरा येथून गेल्या १८ वर्षापासून सतत प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे  शासकीय जाहिरात यादीत समावेश असलेले साप्ता.झुंज चा वर्ष 18 आज अंक क्र. 03 दि.19 एप्रील 2025
आपणास सस्नेह सादर करीत आहे
Dhyeya News & सा. झुंज संपादक.. संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
M0. 94222 75807/ 7588645907 /73 8510 8510

“गुटखाचा गजरा – चार हत्ती, एक किंग आणि मर्यादा तोडणारा व्यापार!”

0

Loading

पाचोरा(झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज ) गुटखा किंग दिलीप तारखडेकरचा अर्धा खान्देश व मराठवाडा गिळंकृत करण्याचा डाव; ४ छोटे हत्ती गुटखा मध्यप्रदेशातून मलकापूर-मुक्ताईनगर मार्गे आणण्यासाठी प्रयत्नशील
अर्धा खान्देश व मराठवाडा या भागात आपल्या गुटखा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या गुटखा किंग दिलीप तारखडेकर याने पुन्हा एकदा काळा धंदा फोफावण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशातून गुटख्याचा मोठा साठा घेऊन येणाऱ्या चार छोट्या हत्ती वाहनांच्या मदतीने मलकापूर–मुक्ताईनगर–बोदवड मार्गावरून गुटखा पुरवठा करण्याचा डाव आखण्यात आला आहे
दिलीप तारखडेकर याच्या गुटखा नेटवर्कचे मूळ मध्यप्रदेशात असून तेथून रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर गुटखा उत्पादन व पुरवठा होतो. हा गुटखा महाराष्ट्रात प्रतिबंधित असूनही विशेषतः खान्देश व मराठवाडा भागात तो मोठ्या प्रमाणावर विकला जात आहे. यामागे स्थानिक यंत्रणांचे दुर्लक्ष आणि आर्थिक फायद्यांचे आकर्षण यामुळे हा व्यवसाय जोमात सुरु असल्याचे बोलले जाते.
सदर प्रकरणात ४ छोटे हत्ती (वाहने) अत्यंत कुशलतेने मलकापूर मार्गे मुक्ताईनगर व बोदवडकडे वळवले जात होते. या मार्गाचा वापर पूर्वीपासून गुटखा वाहतुकीसाठी होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या वाहतूक मार्गावर सतत नजर ठेवूनही संबंधित गुटख्याचा साठा वाचवण्याचा कट पुन्हा एकदा केल्याचे संकेत आहेत.
यामुळे राज्यातील गुटखा माफियांच्या हालचालींवर सतर्क झाले असून, स्थानिक पोलीस यंत्रणा व प्रशासन यांची भूमिका देखील तपासणीच्या कक्षेत आली आहे. गुटख्यासारखा आरोग्यविघातक पदार्थ जनतेपर्यंत पोहचवणाऱ्या या गुटखा माफीयावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. दिलीप तारखडेकर याच्या गुटखा नेटवर्कविरोधात यापूर्वी अनेकवेळा तक्रारी दाखल झाल्या असूनही त्यावर मोक्का सारखी कारवाई का होत नाही, हा प्रश्न आहे.
गुटख्याचा हल्ला हे केवळ आरोग्यावरच नाही तर कायद्याच्या शासनावर देखील मोठे आव्हान आहे. त्यामुळे या गुटखा साम्राज्यावर लगाम घालण्यासाठी राज्य सरकार, अन्न व औषध प्रशासन, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तपणे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा खान्देश व मराठवाड्याचा हा भूभाग ‘गुटखामुक्त’ होण्याऐवजी ‘गुटखाग्रस्त’ होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

भाषिक अस्मितेच्या रक्षणासाठी ‘हिंदी सक्ती’ला ठाम विरोध – गुरुदत्त दिनकर वाकदेकर

0

Loading

महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे – इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी विषय ‘तृतीय भाषा’ म्हणून अनिवार्य करण्याचा! राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असला, तरी तो महाराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वास्तवाशी पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळेच राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्था, शिक्षक संघटना, पालक संघ, आणि भाषाप्रेमी नागरिकांनी याला ठाम विरोध नोंदवला आहे. हा विरोध केवळ भावनिक नाही, तर अभ्यासपूर्ण आणि तर्कसंगत आहे.महाराष्ट्र ही भाषिक अस्मितेची जपणूक करणारी भूमी आहे. इथे भाषा म्हणजे फक्त संवादाचे साधन नाही, तर ती संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे अधिष्ठान आहे. गेल्या काही दशकांत हिंदीचे आक्रमण मराठी भाषेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. रेल्वे स्थानकांपासून शासकीय फलकांपर्यंत, चित्रपटगृहांपासून दैनंदिन व्यवहारांपर्यंत – मराठीच्या जागी हिंदीने अतिक्रमण केले आहे. अशा परिस्थितीत शालेय शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच हिंदी भाषा लादणे हे भाषिक व सांस्कृतिक आत्महत्येचेच संकेत आहेत.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘त्रिभाषा सूत्र’ दिले असले, तरी त्यात कोणतीही भाषा अनिवार्य करण्याचे निर्देश नाहीत. उलट, तेथील मार्गदर्शक तत्वांनुसार, विद्यार्थी कोणती तिसरी भाषा शिकायची हे राज्य शासन किंवा शाळा स्वेच्छेने ठरवू शकतात. त्यात हिंदीची सक्ती कुठेही नाही. तरीही, राज्य शासनाने हिंदी विषय सक्तीचा केल्याचे कारण न समजणारे आहे.आता प्रश्न असा पडतो की, हिंदी अनिवार्य करून नेमका कोणाचा फायदा होतो? महाराष्ट्रात स्थलांतरित होणाऱ्या हिंदी भाषिकांना? की शैक्षणिक संस्थांवर नियंत्रण असलेल्या केंद्रीय यंत्रणांना?महाराष्ट्रात सध्या अंदाजे १.५ कोटी पेक्षा अधिक लोक अन्य राज्यांतून स्थलांतरित झालेले आहेत, यापैकी बऱ्याच जणांची मातृभाषा हिंदी आहे. अशा स्थितीत त्यांनी मराठी शिकण्याऐवजी स्थानिकांना हिंदी शिकवण्याचा अट्टहास हा स्थानिक भाषेच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. नागपूर, पुणे, मुंबई यांसारख्या शहरी भागांमध्ये अनेक शाळांमध्ये मराठी ऐवजी हिंदीतून संवाद सुरू झाला आहे. ही स्थिती आणखी गंभीर करण्यासाठीच हा निर्णय घेतल्यासारखा भासतो.शालेय अभ्यासक्रमावर परिणाम करणारे निर्णय घेताना विद्यार्थ्याच्या वयानुरूप मानसिकतेचा विचार व्हायला हवा. पहिली ते पाचवी या वयोगटात मूल मातृभाषा व एकच परकीय भाषा समजून घेण्याच्या प्रक्रियेत असते. त्यात आणखी एक भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय हा बालमानसशास्त्राच्या दृष्टीनेही अयोग्य आहे. जागतिक संशोधन असे सूचित करते की, लवकर अनेक भाषा शिकविल्यास मूल गोंधळलेले राहते आणि कोणतीच भाषा प्रावीण्याने आत्मसात करत नाही.याउलट, दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्याने त्रिभाषा सूत्र नाकारून फक्त दोन भाषांचे धोरण राबवले आहे – मातृभाषा व इंग्रजी. यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक व शैक्षणिक प्रगतीमध्ये कोणताही अडथळा आलेला नाही. मग महाराष्ट्राने हा दबाव का स्वीकारावा?हा निर्णय मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी शिक्षणव्यवस्था यांच्यावर घाला घालणारा आहे. शासन जर खरोखर भाषिक समरसतेच्या बाजूने असते, तर त्यांनी उत्तर भारतातील राज्यांमध्ये मराठीची सक्ती केली असती. पण तसे घडत नाही. तिथे स्थानिक भाषेच्या संदर्भात कोणतीही लवचिकता ठेवली जात नाही. मग हा अन्याय महाराष्ट्रावरच का?शिवाय, शासनाने ज्या पद्धतीने ‘आदेश काढला’ तो लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. पालक, शिक्षक, अभ्यासक, साहित्यिक – कोणाच्याही सल्ल्याशिवाय, चर्चा व सहमतीशिवाय घेतलेला निर्णय म्हणजे लोकशाहीतील एकतर्फी अधिकारशाही नाही काय?अशा निर्णयांमुळे मराठी माध्यमातील शाळा अधिक संकटात सापडतील. आधीच कमी विद्यार्थीसंख्या, त्यात इंग्रजी शाळांची वाढती लोकप्रियता (की ओंगळवाणी स्पर्धा), आणि आता हिंदीची सक्ती – यामुळे अनेक मराठी शाळा बंद पडण्याची भीती आहे. त्यातून निर्माण होणारी भाषिक दारिद्र्याची साखळी ही राज्याच्या शैक्षणिक विकासात अडथळा ठरेल.शासनाला हिंदीची सक्ती करून काय मिळवायचं आहे? शिक्षणाचा दर्जा? रोजगाराच्या संधी? की केवळ एक राजकीय अजेंडा? राज्य शासन ह्याचं उत्तर देणार काय?पर्यायी उपाय काय असू शकतात? तिसरी भाषा ऐच्छिक ठेवावी, ज्या शाळांना गरज वाटेल त्यांनी शिकवावी.मराठी विषयाचे शिक्षण अधिक सखोल व उपयुक्त बनवावे.स्थलांतरितांना मराठी शिकण्यासाठी विशेष अभ्यासक्रम राबवावेत.भाषा शिकवण्यासाठी स्थानिक गरजांचा आणि मातृभाषेच्या संवर्धनाचा विचार केंद्रस्थानी ठेवावा.महाराष्ट्राने नेहमीच भाषिक समरसता आणि बहुभाषिकतेचा सन्मान केला आहे. पण तो सन्मान ‘सक्ती’ने नाही, तर सहमतीने मिळाला आहे. त्यामुळेच आज हा ‘हिंदी सक्ती’चा निर्णय संपूर्ण राज्यासाठी धोकादायक आहे. शासनाने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा हा निर्णय केवळ भाषेवरचा नव्हे, तर संविधानाच्या मूलभूत हक्कांवरचा आघात मानला जाईल.                   ©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २०/०४/२०२५ वेळ : ०२:५६

जागतिक जीआय एंडोस्कोपी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नवोदित तज्ञांचा सन्मान

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पचनसंस्थेच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारपद्धतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या २२व्या मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतभरातील उदयोन्मुख जीआय एंडोस्कोपी तज्ञांचा गौरव करण्यात आला. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या या जागतिक परिषदेत १५ देशांतील १२०० हून अधिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सहभागी झाले आहेत.

या प्रसंगी ‘मुंबई लाईव्ह एमराल्ड अवॉर्ड्स’ सोहळ्यात वरिष्ठ तज्ज्ञांच्या समितीने निवडलेल्या उत्कृष्ट नवोदित डॉक्टरांना वैद्यकीय संशोधन, नावीन्यपूर्ण उपचार आणि सामाजिक आरोग्यविषयक योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचा संगम मुंबईत होत असल्याचा अभिमान वाटतो. नवोदित डॉक्टरांनी दाखवलेली गुणवत्ता आणि नवनिर्मितीची जिद्द ही आपल्या देशाच्या आरोग्य क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक आहे.”

एमराल्ड पुरस्कारप्राप्त तज्ज्ञांची यादी पुढीलप्रमाणे:

डॉ. राधिका चव्हाण, पुणे – जीआय एंडोस्कोपीमधील महिला तज्ज्ञ
डॉ. सुरिंदर राणा, चंदीगड – शिक्षण व मार्गदर्शन
डॉ. आशुतोष मोहपात्रा, भुवनेश्वर – टियर २/३ शहरांतील नेतृत्व
डॉ. मुकेश कल्ला, जयपूर – उद्योजकता आणि नेतृत्व
डॉ. जयंत समंता, चंदीगड – प्रभावी प्रकाशन
डॉ. अमोल बापये, पुणे – तांत्रिक कौशल्य
डॉ. मोहन रामचंदानी, हैदराबाद – तांत्रिक कौशल्य
डॉ. प्रवीण सूर्यवंशी – शल्यचिकित्सकांसाठी एंडोस्कोपीमध्ये विशेष योगदान

या भव्य परिषदेस पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांचे संकल्पकत्व लाभले असून, यंदाची संकल्पना – “फायबर ऑप्टिक्सपासून रोबोटिक्सपर्यंतचा प्रवास” – जीआय एंडोस्कोपीच्या सहा दशकांच्या उत्क्रांतीला अभिवादन करणारी आहे.

डॉ. मायदेव म्हणाले, “गेल्या ७० वर्षांत जीआय एंडोस्कोपीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे आज अत्यल्प आक्रमकतेने कॅन्सरसारखे आजारही सुरुवातीच्या टप्प्यात निदान करता येतात. नवोदित तज्ञ या बदलाचे वाहक असून त्यांचा गौरव हा संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायक ठरेल.”

या परिषदेत लाईव्ह एंडोस्कोपी डेमोन्स्ट्रेशन्स, एआय-सहाय्यित कोलोनोस्कोपी, थर्ड-स्पेस एंडोस्कोपी, आणि एंडोहिपॅटोलॉजी यांसारख्या नव्या तंत्रज्ञानावर चर्चा झाली.

डॉ. तरंग गिआनचंदानी, ग्रुप सीईओ, रिलायन्स फाउंडेशन हेल्थकेअर इनिशिएटिव्हज, म्हणाल्या, “मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी हे केवळ वैद्यकीय अधिवेशन नाही, तर शिक्षण, नवकल्पना आणि आरोग्यसेवा यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ आहे. लवकरच ५जी आणि रोबोटिक्सच्या साहाय्याने मुंबईतील तज्ज्ञ ग्रामीण भागातसुद्धा उपचार देऊ शकतील.”

ही परिषद केवळ तांत्रिक प्रगतीचे नव्हे, तर नव्या पिढीच्या डॉक्टरांच्या कार्याची पावती ठरली आहे.

“न्याय दारात नव्हे, दारी” – फिरत्या लोकन्यायालयाचा सुवर्ण प्रयत्न पाचोऱ्यात नागरीकांना कायदेविषयक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

0

Loading

पाचोरा – ग्रामीण व नागरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारात न्याय मिळावा, न्यायालयीन प्रक्रियेत होणारी आर्थिक व मानसिक अडचण टाळावी आणि तडजोडीयोग्य खटले न्यायालयाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन सोडवावेत, या उद्देशाने मा. उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२५ मध्ये जिल्हाभरात फिरत्या लोकन्यायालयांचे (मोबाईल लोक अदालत) आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून पाचोरा तालुक्यात देखील २३ व २४ एप्रिल रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी फिरते लोकन्यायालय पोहोचणार असून, या सुवर्णसंधीचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री. एस. व्ही. निमसे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये नियोजित या उपक्रमाअंतर्गत फिरते लोकन्यायालय कार्यरत असलेली विशेष सुसज्ज व्हॅन दिनांक ०१ एप्रिल २०२५ पासून जिल्हाभर दौऱ्यावर असून, दिनांक २९ एप्रिलपर्यंत विविध ठिकाणी पोहोचून तडजोडीयोग्य खटल्यांचे निपटारे करण्याचा आणि कायदेविषयक जनजागृती करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण स्तरावरील लोकांना न्यायदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची, आपले प्रलंबित खटले विनामूल्य व तडजोडीच्या माध्यमातून सोडवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन परिसरात दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी आणि पाचोरा शहरातील पोलीस स्टेशन आवारात २४ एप्रिल रोजी फिरते लोकन्यायालय व्हॅनचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी सकाळपासून विविध प्रकरणांवर तडजोडीच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात येईल. सदर उपक्रम तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.
सदर उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिवाणी न्यायाधीश पाचोरा श्री एस.व्ही. निमसे, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा, तसेच तालुक्यातील ज्येष्ठ विधीज्ञ, कायदेविषयक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीमध्ये या व्हॅनच्या नियोजनासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती ठरवले गेले की, तालुक्यात प्रलंबित असलेली जी प्रकरणे कायद्याने तडजोडीने निकाली काढता येतील, अशा सर्व प्रकारांमध्ये फिरते लोकन्यायालयामार्फत निपटारा साधण्यावर भर दिला जाईल.
या फिरत्या लोकन्यायालयात खालील प्रकारची प्रकरणे स्वीकारली जातील :
दिवाणी दावे
नियमित वादप्रकरणे
फौजदारी स्वरूपाची प्रकरणे
धनादेश अनादर प्रकरणे (Cheque Bounce)
वैवाहिक व कौटुंबिक वादप्रकरणे
न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीयोग्य गुन्हे व खटले
या संदर्भात बोलताना मा. न्यायाधीश एस.व्ही. निमसे यांनी सांगितले की, “न्याय मिळवण्यासाठी शहरातील न्यायालयात प्रवास करणे, कोर्ट फी भरावी लागणे, वकीलांची फी, वेळ आणि मानसिक तणाव ही सर्व अडचणी ग्रामस्थांच्या आड येतात. परंतु या फिरत्या लोकन्यायालयामुळे, सर्वसामान्य माणसाला आपल्या गावाजवळच न्याय मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही केवळ एक सुविधा नाही, तर एक क्रांतिकारक पाऊल आहे.”
पाचोरा व परिसरातील नागरिकांना केलेल्या आवाहनात त्यांनी पुढे सांगितले की, “आपले कोणतेही प्रलंबित खटले, विशेषतः तडजोडीने सुटू शकतील अशी प्रकरणे, २३ व २४ एप्रिल रोजी आयोजित लोकन्यायालयात ठेवावीत. नागरिकांनी वेळेवर संपर्क साधावा आणि तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयात आपली नोंदणी करावी.”
या वेळी विशेष कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले असून, त्यात नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकार, कायदेशीर प्रक्रिया, मोफत कायदेविषयक मदत, महिला व बालकांचे अधिकार, SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा, पोलीस तपास प्रक्रिया, गुन्हेगारी न्याय प्रक्रिया आदींबाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे. यासाठी विधिज्ञ, मान्यवर सेवानिवृत्त न्यायाधीश, पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
तालुका विधी सेवा समितीचे सहकार्य, स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत, बार असोसिएशनचे सक्रिय योगदान आणि विविध सामाजिक संस्थांचा सहभाग यामुळे या उपक्रमाला व्यापक यश लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल लोकन्यायालय व्हॅन ही संपूर्णपणे सुसज्ज असून, त्यामध्ये न्यायाधीश, लिपिक, वकील, सहाय्यक कर्मचारी यांचा स्वतंत्र स्टाफ असून, मोबाईल कंप्युटर प्रणालीद्वारे ऑन-स्पॉट आदेश, तडजोड दस्तऐवज तयार करण्याची सोय उपलब्ध आहे. हे ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेचे साकार रूप आहे.
गेल्या काही वर्षांपासून अशा फिरत्या लोकन्यायालय उपक्रमामुळे राज्यभर अनेक वादप्रकरणांचे तातडीने व शांतीपूर्ण निपटारे झाले असून, नागरिकांच्या वेळेची, श्रमाची आणि पैशांची बचत झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागात अशा संधी उपलब्ध झाल्यामुळे लोकांचा विश्वास वाढत असून, शासनाच्या लोकाभिमुख न्याय प्रणालीला खऱ्या अर्थाने चालना मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर पाचोरा व परिसरातील नागरिक, वकिल, सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू व सर्वच घटकांनी एकत्र येऊन या महत्त्वपूर्ण उपक्रमाला सहकार्य करावे, हीच काळाची गरज आहे. न्यायालयीन प्रक्रिया ही केवळ न्यायालयाच्या चार भिंतींत मर्यादित नसावी, तर ती समाजाशी, माणसांशी, त्यांच्या दैनंदिन संघर्षांशी जोडलेली असावी, ही कल्पना या उपक्रमातून स्पष्ट होते.
अखेर, हे लक्षात घ्यावे लागेल की ‘लोकन्यायालय’ म्हणजे केवळ एक मंच नाही तर लोकांमध्ये न्यायाच्या मूल्यांची रुजवणूक करणारे एक सशक्त माध्यम आहे. न्यायालय स्वतः पुढे येऊन, लोकांच्या दारी येते, ही गोष्ट आपल्या लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरते. त्यामुळे २३ व २४ एप्रिल रोजी आयोजित फिरत्या लोकन्यायालयात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली प्रकरणे सोडवून घ्यावीत व या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा, असे पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.

साप्ता.झुंज चा आज वर्ष 18 अंक क्र. 03 दि.19 एप्रील 2025 आपणास सस्नेह सादर करीत आहे

0

Loading

ताज्या बातम्या

error: Content is protected !!