Home Blog Page 108

शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलनाची घोषणा – काव्यरूपात होणार शिवचरित्राचा जागर

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “मराठी साहित्य व कला सेवा”, “राष्ट्रकुट”, “अखिल आगरी साहित्य विकास मंडळ, शाखा – भिवंडी” आणि “शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट” यांच्या संयुक्त विद्यमाने “पहिल्या शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलनाचे” आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारलेल्या मंदिराच्या पवित्र परिसरात अंतिम सादरीकरण होणार आहे.

या कविसंमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्यस्थापना, युद्धनीती, राज्यकारभार व प्रेरणादायी घटनांवर आधारित स्वरचित काव्यरचना सादर केल्या जाणार आहेत. स्पर्धात्मक स्वरूपाच्या या संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींनी १५ एप्रिल २०२५ पर्यंत आपली कविता टंकलिखित आणि ध्वनीमुद्रित स्वरूपात फक्त व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने होणार असून २० एप्रिल रोजी निकाल अधिकृत समूहावर जाहीर केला जाईल. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कवींना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निमंत्रण देण्यात येईल. कवितेचे स्वरूप मुक्तछंद, छंदबद्ध, गझल, अभंग, पोवाडा किंवा गीत असे काहीही असू शकते, मात्र ती मराठीतच असावी आणि शिवचरित्राशी स्पष्ट संबंध असावा अशी अट आहे.

या स्पर्धेसाठी विनामूल्य सहभाग तसेच सर्व सहभागी कवींना आकर्षक ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाणार असून, अंतिम फेरीतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम अशी पारितोषिके मिळणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही, मात्र मराठी भाषेचे प्रभुत्व आवश्यक आहे.

या ऐतिहासिक उपक्रमाच्या आयोजनासाठी निर्मला मच्छिंद्र पाटील (समन्वयक), गुरुदत्त वाकदेकर (संस्थापक अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा), प्रकाश ओहळे (संपादक – राष्ट्रकुट), सुनील पाटील (अखिल आगरी साहित्य विकास मंडळ) आणि डॉ. राजूभाऊ चौधरी (संस्थापक अध्यक्ष – शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट) ह्यांनी पुढाकार घेतला आहे.

स्पर्धेशी संबंधित अधिक माहितीसाठी व कविता पाठवण्यासाठी गुरुदत्त वाकदेकर – ९९८७७४६७७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रामाणिक पत्रकारितेचा आदर्श :प्रशांत येवले (Mo. 9764885884 ) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

0

Loading

पाचोरा – पत्रकारिता क्षेत्र हे जनतेच्या हितासाठी निःस्वार्थपणे काम करणारे व्यासपीठ असून या क्षेत्रात केवळ प्रसिद्धी, पैसा किंवा प्रतिष्ठेसाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याच्या ध्येयाने काम करणारे काही दुर्मीळ व्यक्तिमत्वे आहेत.सतत कष्ट करणारे आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून कामाशी काम असणाऱ्या वाणी समाजातील एक नाव म्हणजे दैनिक पुण्यप्रतापचे पाचोरा तालुका प्रतिनिधी तसेच स्वतःचे “मी माझा न्युज चॅनल” चे संपादक श्री. प्रशांत येवले (Mo. 9764885884 )आर्थिकदृष्ट्या मागास असतानाही प्रामाणिकपणा, कष्ट, आणि निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी पत्रकारितेतील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांच्या या विशेष दिनानिमित्त संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रातून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत.
प्रशांत येवले (Mo. 9764885884 ) हे पत्रकारितेत नवा मार्ग दाखवणारे, कोणालाही दुखावून न बोलता आपली मते स्पष्ट शब्दांत मांडणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विशिष्ट स्वाभिमान, साधेपणा आणि प्रामाणिकपणा दडलेला आहे. त्यांनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, परंतु कधीच कोणाकडे हात पसरण्याची गरज वाटू दिली नाही. कोणाकडे न बोलता व निमंत्रण नसताना गर्दीत तुकडे मोडायला जाणे, केवळ स्वार्थासाठी राजकीय नेत्यांच्या मागे धावणे हे त्यांच्या स्वभावात नाही. उलट प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्यांशी त्यांनी प्रामाणिक आणि समतोल संबंध ठेवत पत्रकारितेचा सन्मान कायम जपला आहे.
त्यांचा हा प्रवास नगरसेवक वासुआण्णा महाजन यांच्या स्वीय सहाय्यक आणि अत्यंत विश्वासू पत्रकार मिलिंद भाऊ सोनवणे यांच्या विचारधारेवर चालणारा आहे. मिलिंद भाऊंसारखे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रशांत येवले (Mo. 9764885884 ) यांनी आपले पाऊल पुढे टाकले. यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता, कुटुंबासाठी कठोर परिश्रम करत, समाजासमोर एक स्वच्छ प्रतिमेचा पत्रकार निर्माण केला आहे. स्वतःच्या अडचणींना कधीही वाचा न फोडता, इतरांच्या समस्यांवर ठामपणे आवाज उठवणाऱ्या पत्रकारांपैकी प्रशांत येवले हे एक नाव आहे.
अनेकदा पत्रकार हे सत्ता, संपत्तीच्या आकर्षणात येऊन आपल्या विचारधारेपासून दूर जातात. मात्र प्रशांत येवले (Mo. 9764885884 ) यांनी या सर्व गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवले. त्यांनी पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नव्हे, तर एक जबाबदारी म्हणून घेतली. त्यांच्या बातम्यांमध्ये वस्तुनिष्ठता, नेमकेपणा आणि कोणतीही पक्षपाती भूमिका नसते. त्यामुळेच त्यांच्या बातम्यांना समाजातील सर्व स्तरातील लोकांचा विश्वास मिळतो.
प्रशांत येवले हे केवळ पत्रकार नव्हे, तर सामाजिक भान जपणारे एक जागरूक नागरिक आहेत. कोणताही राजकीय कार्यक्रम असो की सामाजिक आंदोलन, किंवा स्वतःच्या समस्त वाणी समाजाचे कार्यक्रम असो त्यांनी नेहमी वस्तुनिष्ठ बातमीद्वारे समाजासमोर खरी माहिती पोहोचवली आहे. यामुळेच आज ते स्वतःच्या बिना तोडी- पाणी चे दैनिक पुण्य प्रताप चे पाचोरा तालुका प्रतिनिधी व स्वतःच्या “मी माझा चॅनल न्युज” या माध्यमाचे खरे चिफब्युरो ठरले आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवत भुरट्या व पोट भरू पत्रकारांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
त्यांच्या स्वभावात असलेली स्पष्टवक्ता वृत्ती, कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता, ज्याची गोष्ट त्याच्याजवळ ठेवण्याची सवय, हा गुण पत्रकारितेत खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच अनेक राजकीय, सामाजिक व शासकीय क्षेत्रातील लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. ते कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता आपले काम करत राहतात.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सहकारी, वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि सर्वसामान्य लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत.( या शुभेच्छा देण्यामध्ये कोणत्याही हायवेचा क्लब वाला नाही किंवा अवैध धंदेवाला नाही हे विशेष ) त्यांचा हा साधा, सरळ आणि कष्टमय प्रवास पुढील काळात आणखी यशस्वी आणि प्रभावी ठरावा, अशी सदिच्छा सर्वत्र व्यक्त होत आहे.
त्यांच्याप्रमाणेच समाजातील अनेक पत्रकारांनी प्रामाणिक आणि जनतेच्या हितासाठी काम करणारी पत्रकारिता स्वीकारावी, हीच खरी त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा ठरेल. पत्रकार प्रशांत येवले  (Mo. 9764885884 ) यांना या खास दिवशी उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, यश आणि कुटुंबासमवेत सुख, समाधान लाभो, हीच प्रार्थना.पुनश्च प्रशांत येवले (Mo. 9764885884 ) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

“गुन्हा झाला दुपारी अवघ्या 24 तासात आरोपपत्र न्यायालयात!”कासोदा पोलीस ठरले जनतेचे खरे रक्षक!”

0

Loading

पाचोरा – पोलिस दलाचे कार्य हे फक्त कायदा-सुव्यवस्था राखण्यात नसून, समाजात सुरक्षा आणि न्यायाचे भान निर्माण करणे हेदेखील त्यांचे कर्तव्य असते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या १०० कलमी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलीस दलाकडून वेगवान व कार्यक्षम तपासास अधिक प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक उज्वल आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे कासोदा पोलीस स्टेशनच्या कार्यशैलीने जळगाव जिल्ह्यात घडवलेला एक अभूतपूर्व विक्रम.दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा एका पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (B.N.S.) २०२३ अंतर्गत कलम ७४, ३३३, ११५(२), ३५२, ३५१ (२)(३), ३ (५) नुसार नोंदविण्यात आला. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, आणि कासोदा पोलीस स्टेशनने याचे ज्वलंत उदाहरण घालून दिले.
फिर्याद दाखल होताच तपास अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल ब. नं. ६९८ राकेश निर्मला दत्तात्रय खोंडे यांनी विलक्षण तत्परतेने आणि जबाबदारीने तपासकार्य सुरू केले. केवळ २४ तासांच्या आत, गुन्ह्यातील चारही आरोपींना शोधून काढण्यात आले. आरोपींच्या विरोधात योग्य पुरावे गोळा करण्यात आले आणि तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर कायद्याचे भान ठेवून सुसूत्रता राखण्यात आली. त्यानंतर दोषारोपपत्र थेट मा. न्यायालयात दाखल करण्यात आले. या कार्यपद्धतीमुळे कासोदा पोलीस स्टेशन हे जळगाव जिल्ह्यातील पहिलं पोलिस ठाणं ठरलं ज्यांनी दाखल गुन्ह्याचा तपास केवळ २४ तासांत पूर्ण करून न्यायालयात चार्जशीट दाखल केली.
तपासाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जळगाव जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डीसाहेब , अपर पोलीस अधीक्षक मा कविता नेरकर , चाळीसगाव विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंग चंदेल तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तपासामध्ये दाखल अमलदार नरेंद्र पाटील, तपास अमलदार पो.हे.कॉ. राकेश खोंडे, कासोदा टाऊनचे पो.हे.कॉ. ब.नं. ३१६१ श्रीकांत गायकवाड, तसेच टाऊन हद्दीतील पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नामुळे गुन्ह्याचा तपास अत्यंत प्रभावी आणि जलदगतीने पूर्ण करण्यात आला.
या संपूर्ण तपास कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य फक्त नियमांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रकरणाकडे पाहिले. कोणताही वेळ न दवडता साक्षीदारांचे जबाब, पुरावे, आरोपींची उपस्थिती, घटनास्थळी तपास, वैद्यकीय अहवाल आदी सर्व बाबी तात्काळ पूर्ण केल्या गेल्या. या वेगवान तपासाची माहिती प्राप्त होताच संपूर्ण जिल्ह्यातून पोलीस विभागाच्या या कृतीचे कौतुक होऊ लागले आहे.
पो.हे.कॉ. राकेश खोंडे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या अचूक तपास कौशल्यामुळे गुन्ह्यातील आरोपींना सापडून त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्यात आले. त्यांच्या कठोर कर्तव्यदक्षतेमुळे समाजात असा संदेश गेला आहे की, पोलिस दल केवळ घटनांनंतर कारवाई करणारे यंत्र नाही, तर तत्काळ न्यायासाठी सजग असलेली यंत्रणा आहे. त्यांच्या कार्यामुळे पोलिस दलाविषयी विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी पोलीस कर्मचारी, तसेच सामाजिक स्तरावरून भरभरून अभिनंदन होत आहे.
कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस टीमने कायद्याचे पालन करीत, कोणताही दबाव न स्वीकारता फक्त न्यायासाठी ही लढाई लढली. आज समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, अशा घटना रोखण्यासाठी आणि पिडीतांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी ही कार्यपद्धती प्रेरणादायक ठरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाच्या उद्दिष्टांना पूर्तता करताना केवळ आकड्यापुरते नाही, तर खऱ्या अर्थाने अंमलबजावणी कशी करावी याचे उदाहरण कासोदा पोलिसांनी सिध्द केले आहे.
अशा प्रकरणांमध्ये अनेकदा तपासकामी दिरंगाई होते, आरोपी फरार होतात, पुरावे नष्ट होतात आणि पीडितेला न्याय मिळण्यास अनेक महिने, कधी कधी वर्षही लागतात. मात्र कासोदा पोलीस स्टेशनने या साऱ्या पारंपरिक मर्यादांना छेद देत, वेळेच्या मर्यादेत न्यायप्रक्रियेला गतिमान केले. ही कार्यशैली संपूर्ण जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यभरातील पोलीस ठाण्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.
या संपूर्ण यशस्वी तपासामध्ये पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुसंगत समन्वय, अचूक नियोजन, आणि काटेकोर अंमलबजावणी यामुळेच हे शक्य झाले. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर विधी सल्लागारांशी सल्लामसलत करण्यात आली. कोणतीही कार्यवाही ही न्यायव्यवस्थेच्या चौकटीत राहून केली गेली. अशा प्रकारच्या पद्धतशीर आणि कायदेशीर तपासामुळेच चार्जशीटमध्ये कोणतीही त्रुटी राहिली नाही. त्याचबरोबर आरोपींवर कठोर कारवाईला मजबूत आधार मिळाला.
पो.हे.कॉ. राकेश खोंडे यांच्यासह सर्व सहभागी अमलदारांनी जी तत्परता, चिकाटी, आणि निःस्वार्थ सेवाभाव दाखवला, त्यातून एक बाब स्पष्टपणे अधोरेखित होते की, पोलिस दलात आजही प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारी माणसं आहेत. अशा कर्मचाऱ्यांचे सन्मान, प्रोत्साहन, आणि प्रचार हे शासनाने वेळोवेळी करणे आवश्यक आहे, जेणेकरून इतर पोलीस कर्मचाऱ्यांना देखील उत्तम कार्यप्रेरणा मिळेल.
सामाजिक न्यायाच्या दृष्टीने, विशेषतः महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणेचा वेग आणि तत्परता हीच मुख्य भूमिका बजावते. कासोदा पोलीस स्टेशनच्या यशस्वी कार्यवाहीने केवळ गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही, तर इतर गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील एक स्पष्ट इशारा मिळाला आहे की, कायद्यापासून कोणीही दूर नाही.
या घटनेनंतर जिल्हाभरातून पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे कौतुक सुरू झाले असून, या पद्धतीचा अभ्यास करून इतर पोलीस स्टेशनमध्येही तशीच कार्यपद्धती राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. गुन्हा घडल्यानंतर केवळ तक्रार घेणे आणि कारवाईचे प्रतीक्षा करणे इतकेच काम नसून, ते तातडीने तपास पूर्ण करून न्यायप्रक्रियेला गती देणे हेच खरे पोलीस कर्तृत्व असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
एकूणच, कासोदा पोलीस स्टेशनच्या या यशस्वी आणि आदर्शवत कारवाईमुळे समाजात पोलिस दलाविषयी विश्वास वाढीस लागेल, आणि पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. महाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाची ही कृती परिपूर्ती आहे आणि यामुळे प्रशासनाचे उद्दिष्ट अधिक दृढतेने पुढे जाणार आहे. कासोदा पोलिसांच्या या यशस्वी प्रयत्नाला केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्यभरातून दाद मिळावी आणि हा आदर्श इतर पोलीस ठाण्यांनीही अंगीकारावा, हीच अपेक्षा समाजाला आहे.

पाचोरा चक्री चालक व अवैध व्यवसाईकांना नम्र आवाहन

0

Loading

पाचोरा : शहर व परिसरात सुरू असलेल्या चक्री, सट्टा, व अन्य अवैध धंद्यांमध्ये काही व्यक्तींनी माझ्यासह ठराविक पत्रकारांचे नाव वापरून गैरसमज पसरवत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘झुंज’ वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’चे संपादक यांनी एक जाहीर निवेदन देत स्पष्ट भूमिका आहे.
‘झुंज’ वृत्तपत्र व ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप महाजन (अधिकृत पत्रकार ) स्पष्टपणे नमूद करतो की “मी कधीच कोणत्याही अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केलेली नाही आणि ना मला अशा धंद्यांशी काही संबंध आहे. आजवर मी अशा कोणत्याही व्यवसायकाकडे व व्यक्तीकडे चहाही प्यायला गेलो नाही.” किंबहुना वाढदिवस साजरे करायचे देखील सांगितले नाही & व्यक्तिशः मला जर अशी अवैध धंदे बंद करायचे असेल किंवा जर का मला कोणताही लढा उभारायचा असेल तर याच्या त्याच्या कुबड्या न घेता मी वैयक्तिक एकटा समर्थ आहे आणि जे पण करेल ते सांगून करेल फोटो काढून व्हिडिओ काढून करेल यासाठी कोणतीही परिणामाची चिंता देखील करणार नाही जे पण करेल सांगुन करेल & खुलेआम करेल परंतु जे बोगस भुरटे गैरसमज पसरवत असतील अशावर विश्वास ठेवू नका
काही लोकांनी स्वतः अवैध धंदे बंद करण्याचे नाटक करून, निवेदन देऊन तेच धंदे पुन्हा सुरू करून देण्याच्या नावाखाली तडजोडी केल्या एवढेच नव्हे तर पत्रकार या नात्याने पोलिस व राजकीय मान्यवरांशी आमचे चांगले संबंध आहे आम्ही त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत सांगून तुमचे व्यवसाय चालू करून देतो असे सांगितले सोबतच बोगस पत्रकार संघटनांचे नाव पुढे करून मासिक हप्ते मागत आहे. हे प्रकार थेट फसवणुकीचे असून पत्रकारितेचा अपमान करणारे आहेत. झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज पत्रकार या नात्याने “तुमच्या व्यवसायाला मी कधीही विरोध केला नाही आणि काहीही विरोधात बोलत नाही, पण पत्रकारितेच्या नावाखाली कोणी हप्ता मागत असेल, तर त्याला थेट नकार द्या. बोगस संघटना तिमाही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या नावाने पैसे गोळा करतात, यालाही मी विरोध करतो.”
कोणी माझे नाव घेऊन गैरसमज पसरवत असेल, तर त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज संपादक संपादक म्हणून मी स्पष्ट करतो की पत्रकारितेचा गैरवापर थांबवावा आणि खऱ्या पत्रकारांचे नाव बदनाम होणार नाही यासाठी अवैध धंदेवाल्यांनी देखील सहकार्य करा
शेवटी पुनश्च सांगतो तुम्ही तुमचे व्यवसाय काय आणि कोणाच्या आशीर्वादाने करावे हा तुमच्या प्रश्न परंतु तुमच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास काढून कुत्र्यांना खाऊ घालू नका स्वतःच्या पोरांना महिन्याचा हजार रुपयाचा ड्रेस घेत नसाल पण अशा बोगस पत्रकार व त्यांच्या संघटनेला प्रत्येकी हजार रुपये देण्याचा चुकीचा पायंडा पाडू नका आज अवैध धंदेवाल्यांना त्रास आहे उद्या वैध धंदे करताना सुद्धा अनेक त्रुटी ठेवून कामे करावे लागतात त्यांना देखील हा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही अर्थात होतच आहे म्हणून वेळीच अशा चुकीच्या प्रवृत्तीला लगाम घाला

ब्लॅक पेनमध्ये साकारला गणरायाचा देखणा अवतार: वैष्णवी पाटीलचा राज्यस्तरीय गौरव

0

Loading

पाचोरा – ‘कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लासेस’ची विद्यार्थिनी वैष्णवी पांडूरंग पाटील हिने ब्लॅक पेनच्या साहाय्याने साकारलेले गणपती बाप्पाचे देखणे चित्र सध्या पाचोरा व परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. केवळ चित्र नाही, तर तिच्या कलाकृतीतून व्यक्त होणारी भक्ती, बारकावे आणि सर्जनशीलता अनेकांचे मन जिंकत आहे. विशेष म्हणजे या चित्राच्या निमित्ताने तिच्या आतापर्यंतच्या चित्रकलेतील वाटचालीला आणि यशस्वी प्रवासालाही प्रकाश मिळत आहे.
वैष्णवी पाटील हिचा कलात्मक प्रवास काही वर्षांपूर्वी सुरू झाला, जेव्हा तिने ‘कला छंद ड्रॉइंग क्लासेस पाचोरा’ येथे निसर्गचित्रण कोर्ससाठी प्रवेश घेतला. सुरुवातीपासूनच तिच्यात असलेली चिकाटी, बारकावे टिपण्याची नजर, रंगसंगतीची जाण आणि विविध माध्यमांची प्रयोगशीलता यामुळे ती लवकरच इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी ठरली. निसर्गचित्रानंतर तिने व्यक्तिचित्र कोर्स पूर्ण केला आणि सध्या ती रांगोळी व्यक्तिचित्र शिकत आहे. प्रत्येक टप्प्यावर तिने वेगवेगळ्या शैली आणि तंत्रांचा अभ्यास करत आपल्या कलेला अधिक समृद्ध केलं.
वैष्णवीचे वडील पांडूरंग पाटील हे भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले असून सध्या राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत आहेत. देशसेवा करणाऱ्या वडिलांची शिस्त आणि समर्पण वैष्णवीच्या स्वभावातही दिसून येते. चित्रकलेतील निष्ठा, सातत्याने मेहनत घेण्याची वृत्ती आणि आपले कौशल्य सतत सुधारत राहण्याची तिची तयारी याचे मूळ तिच्या कुटुंबात आहे.
चित्रकलेप्रती असणारी तिची नितांत आवडच तिची ओळख ठरत चालली आहे. पेन्सिल रंग हे तिचं अत्यंत आवडतं माध्यम असलं तरी ती अक्रिलिक, पेन, वॉटरकलर, चारकोल अशा विविध माध्यमांमध्येही काम करण्यास सदैव उत्सुक असते. हेच कारण आहे की तिच्या प्रत्येक चित्रात एक वेगळी जाणीव, एक वेगळं अस्तित्व जाणवतं. नुकतेच तिने साकारलेले ब्लॅक पेनमधील गणेशचित्र हे त्याचं जिवंत उदाहरण ठरत आहे. एकसंध काळ्या शाईतून उभा राहिलेला हा गणपती भक्ती, बारकावे आणि भावनांची सरमिसळ असलेला आहे. या चित्रानेच अनेकांची मने जिंकली आहेत.
केवळ शालेय व वर्गातच नव्हे तर जिल्हा आणि राज्यस्तरावरही वैष्णवीने आपली छाप पाडली आहे. नुकत्याच झालेल्या भारतीय पोस्ट विभाग आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत वैष्णवीने प्रथम क्रमांक मिळवला. या विजयानंतर तिच्या कलाकृतीची निवड मुंबई येथे झालेल्या पोस्ट ऑफिसच्या राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनासाठी करण्यात आली. हे तिच्या कलेचे आणि सातत्याने केलेल्या परिश्रमाचे मोठे यश आहे. या गौरवाने तिचा आत्मविश्वास वाढवला असून तिच्या भविष्यातील कलाकलांच्या प्रवासाला एक नवी दिशा मिळाली आहे.
याआधीही वैष्णवीने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवनीत कंपनीच्या आयोजित चित्रकला स्पर्धेतही तिला पुरस्कार मिळाला होता. या व्यतिरिक्त सारंगखेडा येथील राष्ट्रीय व चित्र प्रदर्शनात तिच्या चित्रांची निवड होणे हे तिच्या कौशल्याला मिळालेली मोठी पावती होती. या सर्व यशांमध्ये केवळ वैष्णवीची मेहनत नव्हे, तर तिला वेळोवेळी दिलेलं योग्य मार्गदर्शन हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
वैष्णवीच्या या यशामागे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी Mo.8446932849 यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ‘कला छंद आर्ट ड्रॉइंग क्लासेस’ या संस्थेच्या माध्यमातून शैलेश सर गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयक जाण निर्माण करत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलात्मक प्रवृत्तीला समजून घेत, त्यांच्या क्षमतांना चालना देत, योग्य दिशा दाखवत ते कार्यरत आहेत. वैष्णवीसारख्या विद्यार्थिनीला केवळ चित्रकलेचे प्रशिक्षणच नव्हे तर आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सादरीकरणाचे धडेही त्यांनी दिले आहेत.
शैलेश सर Mo.8446932849  यांनी झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांच्याशी बोलताना सांगितले “वैष्णवी ही अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती विद्यार्थिनी आहे. ती प्रत्येक चित्रामागे अभ्यास करते, वेळ देते आणि ते अधिकाधिक चांगले व्हावे यासाठी परिश्रम करते. तिची कल्पकता आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी हे तिचे खरे बळ आहे.”
या सर्व प्रवासात वैष्णवीच्या पालकांचेही योगदान उल्लेखनीय आहे. मुलीच्या आवडीला पाठिंबा देणं, वेळेवर प्रोत्साहन देणं, गरज लागेल तेव्हा योग्य निर्णय घेणं – यामुळे वैष्णवी आपली कला खुलवू शकली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय पातळीपर्यंत पोहोचली हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
आज जेव्हा तिच्या ब्लॅक पेनमधून साकारलेल्या गणरायाकडे पाहिलं जातं, तेव्हा त्यात केवळ एक चित्र नसतं – त्यात तिची मेहनत, तिचा प्रवास, तिचं स्वप्न आणि तिचे गुरु दिसतात. तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांच्या शुभेच्छा आहेत आणि तिच्या यशाचा प्रवास अजून दूरवर जाणार हे निश्चित आहे.

६१ हजारांचा पगार मुख्यमंत्री फेलोशिप २०२५-२६साठी अर्ज प्रक्रिया सुरु”

0

Loading

राज्यातील लाखो तरुणांना प्रशासकीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्या कल्पकतेला, नवविचारांना आणि तांत्रिक कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांची वैयक्तिक व व्यावसायिक वाटचाल अधिक सशक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६” जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील हुशार, उत्साही आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद असलेल्या तरुणांना शासनाच्या विविध विभागांमध्ये थेट सहभागी होण्याची आणि प्रत्यक्ष काम करण्याची नामी संधी मिळणार आहे.
या फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना दरमहा तब्बल ६१ हजार रुपयांचे मानधन मिळणार असून, प्रशासकीय निर्णय प्रक्रियेचा अनुभव, धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभाग, आणि जिल्हा तसेच विभागीय स्तरावर अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत समन्वय साधून काम करण्याची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. केवळ आर्थिक फायदाच नाही, तर भविष्यातील प्रशासन, राजकारण, सामाजिक काम किंवा धोरण रचना यामध्ये स्वारस्य असणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारे प्रात्यक्षिक प्रशिक्षणच ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात, २०१५ साली या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाला सुरुवातीपासूनच समाजाच्या विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद लाभला. तरुणांच्या नवविचारांचा आणि तांत्रिक कौशल्यांचा उपयोग प्रशासनात करून निर्णय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि पारदर्शक बनविण्याचा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. त्यामुळेच या उपक्रमाला शासनात तसेच नागरिकांमध्येही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
२०२३-२४ या कालावधीत फेलोशिपचा शेवटचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा एकदा २०२५-२६ साठी नवीन टप्प्यातील फेलोंच्या निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ६० फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड प्रक्रियेतील पारदर्शकता, गुणवत्ता व प्रामाणिकतेस प्राधान्य देण्यात येणार आहे. या फेलोंना प्रशासकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, विविध योजना, धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी यामध्ये थेट सहभाग घेता येणार आहे.
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांनी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असलेला उमेदवार या योजनेसाठी पात्र आहे. मात्र, केवळ पदवी असणे पुरेसे नाही. त्याचबरोबर किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. हा अनुभव कॉर्पोरेट क्षेत्रातील, स्वयंरोजगारातील, स्टार्टअप्समधील अथवा सामाजिक उपक्रमांतील असू शकतो. शासनाने व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली एक वर्षाची पूर्णवेळ इंटर्नशिप, आर्टिकलशिप अथवा अप्रेंटीसशिप याचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे.
याशिवाय स्वतःचा व्यवसाय करणारे, सामाजिक उपक्रम राबवणारे, स्वयंरोजगार करणारे तरुणही या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात, कारण शासनाने अनुभवाच्या व्याख्येमध्ये लवचिकता दाखवत विविध स्वरूपाच्या कामकाजाच्या अनुभवाला मान्यता दिली आहे. ही बाब ग्रामीण, आदिवासी, तसेच लहान शहरांतील तरुणांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे.
या फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत केली जाणार आहे. प्रत्येक फेलोची नियुक्ती एका विशिष्ट जिल्हा, तालुका अथवा विभागीय कार्यालयात केली जाईल. त्यांना संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, किंवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी दिली जाईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फेलो विविध शासकीय योजना, नागरी सेवांचे डिजिटायझेशन, विकासकामांची अंमलबजावणी, माहिती संकलन, विश्लेषण आणि नवे उपाय सुचवणे यामध्ये सहभाग घेतील.
फेलोंनी दिलेले अभिप्राय, निरीक्षणे आणि उपाय सुचवणे यांचा वापर प्रशासन आपल्या धोरण रचनेत करू शकते. त्यामुळे तरुणांचा दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर राज्य शासनाच्या कार्यपद्धतीत समाविष्ट होऊ शकतो. याचा परिणाम म्हणून कार्यक्षमतेत वाढ, लोकाभिमुखता, आणि नागरिकांचा विश्वास यामध्ये वृद्धी होईल.
या कार्यक्रमाअंतर्गत केवळ क्षेत्रीय अनुभवच दिला जाणार नाही, तर निवड झालेल्या फेलोंसाठी विशेष शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जाणार आहेत. या प्रशिक्षणांमध्ये सार्वजनिक धोरण, प्रशासनशास्त्र, माहिती-तंत्रज्ञान, संवाद कौशल्य, डेटा विश्लेषण, समस्या सोडवण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे. यामुळे फेलोंचा सर्वांगीण विकास होईल आणि भविष्यातील त्यांच्या व्यावसायिक प्रवासात हाच अनुभव अमूल्य ठरेल.
फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahades.maharashtra.gov.in सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांनी दिलेल्या निकषांनुसार आपले प्रमाणपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, ऑनलाइन मूल्यांकन, आणि मुलाखत अशा टप्प्यांचा समावेश असेल.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांची तयारी ठेवून, वेळेवर अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जांची अंतिम मुदत, परीक्षा दिनांक आणि निवड प्रक्रियेचे इतर संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत.
तरुणांसाठी भविष्य घडविण्याची सुवर्णसंधी
आजच्या युगात सरकारी क्षेत्रात, विशेषतः प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही एक मोठी गोष्ट मानली जाते. केवळ परीक्षा देऊन अधिकारी होणे ही एकच वाट नसून, अशा फेलोशिप कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट प्रशासनाच्या हृदयात काम करण्याची संधी मिळणे, हे एक प्रकारे नव्या पिढीच्या नेतृत्वविकासाचे लक्षण आहे. ही संधी वापरून अनेक तरुणांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.
राज्य सरकारकडून या फेलोशिपसाठी दरमहा ६१ हजार रुपयांचे मानधन दिले जात असून, यामध्ये प्रत्येक फेलोच्या कामाच्या स्वरूपावर आधारित प्रशिक्षण, नियोजन, विश्लेषण व प्रकल्प व्यवस्थापन यांसारखी जबाबदारी सोपवली जाणार आहे. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता, प्रत्यक्ष प्रकल्प कार्यान्वयन, संवाद कौशल्ये, आणि नेतृत्वगुण यात कमालीची वाढ होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने सुरू करण्यात आलेला “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” ही एक दूरगामी विचारसरणी असलेली योजना आहे. आजच्या तरुणांमध्ये देशासाठी काहीतरी करण्याची उमेद आहे, त्यांच्याकडे नवविचार आहेत, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून त्यांना केवळ एक व्यासपीठच मिळणार नाही, तर शासनाच्या धोरणांमध्ये थेट भागीदारी मिळेल.तरुणांनो, ही संधी गमावू नका! तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि उत्साहाचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिपसाठी आजच अर्ज करा. प्रशासनात काम करताना तुम्हाला समाजाच्या विकासात हातभार लावण्याची संधी मिळेल आणि तुमच्या भविष्याचे दालनही खुल्या आकाशासारखे उघडे होईल.

पाचोऱ्यातील चक्री व्यवसाय बंदीनंतर ‘राजकीय आशीर्वाद’ मिळवण्याच्या नावाखाली बोगस पत्रकारांवर पैशांची उकळपट्टी

0

Loading

पाचोरा शहरात पोलीस प्रशासनाने नुकत्याच घेतलेल्या कठोर कारवाईतून चक्री व्यवसायावर पूर्णतः बंदी आणण्यात आली आहे. शहरातील अनेक भागांत सायंकाळी व रात्रीच्या वेळी बिनधास्त सुरु असलेल्या चक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत साहित्य जप्त केले आणि असंख्य चक्रीचालकांना तंबी दिली. या कारवाईचे शहरवासीयांनी स्वागत केले असले तरी, बंद झालेला हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी एक नवीनच आणि धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विश्वसनीय माहितीनुसार, पाचोरा शहरातीलच एका बोगस पत्रकाराने आणि त्याच्या हॉटेल टेबलावर जन्मलेल्या एका बनावट पत्रकार स्वयंघोषित संघटनेच्या पाच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुन्हा चक्री व्यवसाय सुरू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या कथित पत्रकाराकडून असं सांगितलं जात आहे की, “मी तुमच्या वतीने मी आपल्या व्यवसायाला राजकीय आशीर्वाद मिळवून देतो, तुम्ही फक्त ठराविक रक्कम भरा.” अशा प्रकारे प्रत्येक चक्री व्यवसायिकाकडून दरमहा १००० रुपये मागितले जात आहेत. यामागील कल्पना अशी आहे की, जर चक्री पुन्हा सुरू झाली, तर हे पैसे त्या बोगस पत्रकारला लाकूड व्यवसायाचे जसे दिले जातात तसे द्यायचे आहेत.
यामुळे शहरात पुन्हा एकदा अशांतता आणि चिंता वाढली आहे. पोलीस प्रशासनाने जे कठोर निर्णय घेऊन चक्री व्यवसाय मोडीत काढला, त्याला बोगस पत्रकार व राजकीय हस्तक्षेपाच्या नावाखाली सुरु झालेली ही खेळी खोळंबा आणू शकते. नागरिकांमध्ये असे बोलले जात आहे की, अशा प्रकारे पैशांची उकळपट्टी ही फक्त बेकायदेशीरच नव्हे, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही थेट आघात करणारी आहे.
हॉटेलच्या टेबलावरच उभ्या राहिलेल्या या तथाकथित पत्रकार संघटनेच्या नावावरून लोकांची दिशाभूल केली जात आहे. या संघटनेला कोणतीही अधिकृत नोंदणी नाही, त्याचे कुठलेही ठोस उद्दिष्ट नाही आणि त्यात असलेले पदाधिकारी हे केवळ ‘पत्रकार’ या ओळखीचा गैरवापर करणारे आहेत. ते ना कुठल्या अधिकृत प्रसारमाध्यमाशी संबंधित आहेत, ना त्यांच्याकडे कोणतेही अधिस्वीकृत ओळखपत्र आहे. यामुळे ही संपूर्ण संघटना केवळ चक्री व अवैध व्यवसायाच्या पुनरुज्जीवनासाठी वापरले जाणारे एक मुखवटे आहे, हे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, या बोगस संघटनेच्या बॅनरवर पाचोरा येथील काही अधिकृत वृत्तपत्रांचे प्रतिनिधी अथवा वार्ताहर यांचे फोटो झळकताना दिसतात. त्यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो – एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या, व्यवसायाच्या व हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी जाहिरात अधिकृत वृत्तपत्रांना न देता, त्या बदल्यात या बोगस संघटनेच्या अध्यक्षामार्फत मागच्या दाराने पैसे घेतले जात नाहीत ना? किंवा ज्यांच्या नावाखाली जाहिरात मागितली गेली, तेच प्रतिनिधी त्या भामट्या संघटनेच्या नावाखाली स्वतःसाठी पैसे उकळत नाहीत ना? याची सखोल चौकशी संबंधित वृत्तपत्र संस्थांनी वरिष्ठ पातळीवरून स्वतःहून करणे ही काळाची गरज ठरते. कारण जर आपल्या अधिकृत प्रतिनिधीचे नाव, फोटो आणि ओळख या अशा बोगस संघटनांच्या फायद्यासाठी वापरले जात असेल, तर संपूर्ण पत्रकारिता व्यवसायावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.
या बोगस पत्रकाराकडून शहरात याआधीही वर्षातून किमान चार ते पाच वेळा विविध कार्यक्रमांतून डॉक्टर, व्यावसायिक, आणि सामाजिक संस्थांकडून पैसे उकळले गेल्याचे आरोप आहेत. नुकतेच एका हॉस्पिटल उद्घाटनप्रसंगीही मध्यस्थी व्यक्तीद्वारे १५००० रुपये उकळल्याचा प्रकार चर्चेत आहे. यावेळी जाहिरातीची मोठे रक्कम अधिकृत वृत्तपत्रांना न देता, फक्त काही पोर्टल्सवर बातम्या लावून उर्वरित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अशा प्रकारच्या बनावट पत्रकार व संघटनांकडून शहरातील सामान्य व्यावसायिकांची फसवणूक केली जात आहे. विशेषतः चक्रीच्या माध्यमातून आधीच समाजाला लागलेली कीड, पोलिसांच्या मेहनतीने काही प्रमाणात आटोक्यात आली होती. परंतु अशा गैरप्रकारांना वेळीच अटकाव न झाल्यास पुन्हा एकदा चक्री व्यवसायाला ऊत येईल आणि त्यातून मुलांचे भविष्य, स्थानिक शांती आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.
पोलीस प्रशासनाने यावेळी फक्त चक्रीचालकांवरच नव्हे, तर बोगस पत्रकार व त्याच्या फसवणूक करणाऱ्या संघटनेवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे. प्रत्येक पत्रकार संघटनेची पार्श्वभूमी तपासून, त्यांची नोंदणी, सदस्य संख्या, आणि वास्तव पत्रकारिता कारभाराची माहिती घेणे आवश्यक आहे. बनावट पत्रकारांच्या नावावर उघडलेली ही दहशत आता चक्री व्यवसायाला नवा चेहरा देत आहे, जो पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
शहरातील नागरिकांमध्ये या पार्श्वभूमीवर संतापाची भावना आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बेकायदेशीर व्यवसाय बंद करून जनतेला दिलासा देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीवर असा राजकीय-प्रेरित घाला घालण्याचा प्रयत्न हा पूर्णतः अमान्य आहे. नागरिक आता पोलिसांकडून अपेक्षा करत आहेत की, त्यांनी केवळ चक्रीवरच नाही, तर अशा बनावट पत्रकारांवरही कारवाई करून समाजात विश्वास निर्माण करावा.
शेवटी, ‘पत्रकार’ हा सन्मानाचा दर्जा आहे, तो असंवेदनशील, लोभी आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या हातात गेल्यास संपूर्ण चौथा स्तंभ ढासळू शकतो. त्यामुळे नागरिकांनीही सजग राहून कोणत्या पत्रकार संघटना खरी आहेत आणि कोणत्या केवळ पैसा कमवण्यासाठी उभ्या केल्या आहेत, याचा तपास स्वतःही घेतला पाहिजे. प्रशासनाने मात्र याला प्राधान्य देऊन, चक्री व्यवसायाच्या पुनश्च सुरुवातीसाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारावर त्वरित लगाम घालावा, हीच अपेक्षा आहे.

लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी केला पराभव; हार्दिक पांड्ता, सूर्यकुमारचे प्रयत्न व्यर्थ

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेके) : लखनौ सुपर जायंट्स गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत नाहीये, पण पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हा संघ दुःस्वप्नासारखा आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शुक्रवारी लखनौने त्यांच्या घरच्या मैदानावर आयपीएल-२०२५ मध्ये मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईवर लखनौचा हा सहावा विजय आहे. मुंबईने फक्त एकदाच लखनौला हरवले आहे.
प्रथम फलंदाजी करताना लखनौने मिचेल मार्शच्या ६० आणि एडेन मार्करामच्या ५३ धावांच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून २०३ धावा केल्या. मुंबई संघाने खूप प्रयत्न केले पण पूर्ण षटके खेळल्यानंतर त्यांना पाच विकेट गमावून फक्त १९२ धावा करता आल्या. त्यासाठी सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. हा सूर्यकुमारचा मुंबईसाठी १०० वा आयपीएल सामना होता. सूर्यकुमारने ४३ चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकारासह ६७ धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 
दुखापतीमुळे रोहित शर्मा या सामन्यात खेळत नव्हता. अशा परिस्थितीत, विल जॅक्सला रायन रिकलटनसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाश दीपने त्याला रवी बिश्नोईकडे झेलबाद केले. जॅकला सात चेंडूत फक्त पाच धावा करता आल्या. यानंतर, शार्दुल ठाकूरने रिकलटनला तंबूचा रस्ता दाखवला. तो पाच चेंडूत फक्त १० धावा करू शकला.
सुरुवातीच्या अपयशानंतर, नमन धीर आणि सूर्यकुमार यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनीही जलद धावा काढल्या. दोघांनीही ३५ चेंडूत ६९ धावा केल्या. या दोघांमधील भागीदारी चांगली चालली होती. मग स्ट्रॅटेजिक टाइम आउट आला. यानंतर, पुढच्याच चेंडूवर दिग्वेश राठीने नमनला बाद केले आणि मुंबईला तिसरा धक्का दिला. त्याने २४ चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या.
त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांच्यावर आशा होत्या आणि ते वेगाने धावा करत होते. त्याने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जेव्हा असे वाटत होते की सूर्यकुमार संघाला विजयाकडे नेईल, तेव्हा आवेश खानने त्याला बाद केले. १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अब्दुल समदने त्याचा झेल घेतला.
आता सर्व आशा पंड्या आणि तिलक वर्मा यांच्यावर होत्या, पण नंतर मुंबईने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि तिलकला परत बोलावले आणि त्यांना निवृत्त घोषित करण्यात आले. त्याच्या जागी मिचेल सँटनर आला, पण कोणताही चमत्कार घडला नाही. शेवटच्या षटकात मुंबईलाही फायदा झाला कारण लखनौला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आणि त्यांना फक्त चार क्षेत्ररक्षकांना वर्तुळाबाहेर ठेवण्याची परवानगी देण्यात आली. 
तत्पूर्वी, अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याला काळ्या मातीचा खेळपट्टी नीट समजली नाही. घरच्या मैदानावर पंजाबविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागलेल्या लखनौ संघाने या सामन्यात दमदार सुरुवात केली. मार्शसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी एडेन मार्कराम मैदानात आला.
विशेषतः, मार्शच्या स्फोटक फलंदाजीमुळे, लखनौने चालू हंगामात पहिल्यांदाच पॉवर प्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही आणि ११ पेक्षा जास्त धावांच्या सरासरीने ६९ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतकांसह हंगामाची चांगली सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने येथे फक्त २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने आपले तिसरे अर्धशतक पूर्ण केले.
मुंबईसाठी धोकादायक ठरत असलेल्या मार्शचा डाव विघ्नेश पुथूरने त्याच्याच चेंडूवर एक शानदार झेल घेऊन संपवला. मार्शने आपल्या ६० धावांच्या खेळीत ३१ चेंडूंचा सामना केला आणि नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. दुसऱ्या टोकाला, मार्करामने धावगतीचा वेग वाढवत राहिला. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या कॅरिबियन फलंदाज निकोलस पूरनने लाँग ऑनवर षटकार मारून चांगली सुरुवात केली, पण पुढच्याच षटकात तो हार्दिक पंड्याचा उसळणारा चेंडू वाचू शकला नाही आणि शेवटच्या टप्प्यात दीपक चहरने पूरनचा सोपा झेल घेतला.
तथापि, यानंतर, मधल्या फळीत, आयुष बदोनीने १९ चेंडूत ३० धावांची आणि डेव्हिड मिलरने १४ चेंडूत २७ धावांची महत्त्वाची खेळी खेळली आणि संघाचा धावसंख्या २०० धावांपर्यंत पोहोचवली. शेवटच्या षटकात एलएसजीने लवकर विकेट गमावल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने पाच विकेट घेतल्या.
आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आणि एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. हार्दिक पंड्याच्या चेंडूवर एक विचित्र शॉट खेळल्यानंतर तो झेलबाद झाला. चालू हंगामातील सलग चौथ्या सामन्यात पंतची बॅट शांत राहिली. तो क्रीजवर वेळ घालवू शकत नाही.
गेल्या चार डावांमध्ये पंतचे धावसंख्या दोन, १५, शून्य आणि दोन आहेत. निश्चितच, कर्णधाराच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढत आहे. पंत बाद झाल्यानंतर संघाचे मालक संजीव गोयंका यांचा चेहरा फिका पडला. गेल्या सामन्यात, कर्णधार आणि गोयंका यांच्यात मैदानावर झालेल्या दीर्घ संभाषणाचा फोटो इंटरनेट मीडियावर व्हायरल झाला होता.

“पत्रकारिता ही वृत्ती आहे, पोस्ट नव्हे – संघटनेच्या नावावर बिनदिक्कत खेळणाऱ्यांचा खरा चेहरा”

0

Loading

आजकाल स्पेशली पाचोरा शहरात पत्रकारितेच्या नावावर खोटं बोटं प्रस्थापित करत कोणालाही न विचारता त्यांचे स्वखर्चाने समाजासमोर देखावा करण्यासाठी बॅनर लावणे स्वतःला मोठं भासवणाऱ्यांची संख्या वाढतेय. समाजातील एका महत्त्वाच्या चौथ्या स्तंभावर – म्हणजेच पत्रकारितेवर – विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. लेखणीचा आवाज आता हॉटेलमधल्या बाकांवर नुस्तं ओरडून दाखवणाऱ्यांच्या तोंडात अडकतोय. जुनी रेकॉर्डिंग्ज ऐकवून “बायल्याचं” स्वप्न उराशी बाळगणारे आता फक्त “ब्रेकिंग न्यूज”च्या नावाखाली स्वतःचं पोट भरतात.
ज्या पत्रकार संघटनेचं अस्थीत्व नाही ज्या पत्रकार संघटेनेचे घटना व नियमा नुसार राज्य, विभाग, जिंल्हातर सोडाच परंतु तालुका आणि शहराची कार्यकारीणी नाही अशा हॉटेलच्या टेबलावर जन्म झालेल्या पत्रकार संघटनेत पदं पत्रकार नसलेल्या ना घेण्याची व वाटपाची चढाओढ आज समाजात स्पेशली पाचोऱ्यात प्रतिष्ठेचा भाग बनली आहे, पण त्यामागची खरी जबाबदारी, नैतिकता आणि पात्रता कुठे हरवली आहे हे विचारण्याची वेळ आता आली आहे. एखाद्या व्यक्तीला पत्रकार म्हणवून घेण्यासाठी फक्त आयडी कार्ड, माईक आणि ग्रुप फोटो पुरेसं ठरत नसेल – त्यासाठी आवश्यक आहे ती चोख लेखणी, प्रगल्भ वाचन, सखोल अभ्यास आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन. असे गुण नसलेले पत्रकार कधीही समाजाचा आवाज बनू शकत नाहीत.
पत्रकारिता म्हणजे हॉटेलच्या टेबलावर बसून & पोलीस स्टेशनला चकरा मारून 25% वर  शिकारचा शोध घेणे नव्हे, तर जमिनीवर उतरून वास्तव समजून घेणं. ती खरी पत्रकारीता
आज पाचोर्‍यात वर्षातून तीन चार वेळा कार्यक्रम घेतात पत्रकार असल्याचं भासवतात “पत्रकारांचा विमा काढायचा”, “डोनेशन द्या”, “पत्रकार सुरक्षा निधी” ज्या पुरस्काराचे स्वतःच्या तोंडून नाव घेण्याची लायकी नाही अशा नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करतात. पण जेव्हा खरंच एखादा पत्रकार आपल्या कर्तव्यात जीव गमावतो, त्याच्या कुटुंबाकडे मदतीचा हात पुढं करायची वेळ येते – तेव्हा फक्त ढंडोरा वाजवतात आम्ही विम्याचा चेक देणार आहोत नंतर हेच मंडळी गायब होतात. एवढेच काय संकलित केलेल्या निधीतून त्या मृत पत्रकाराच्या कुटुंबाला ‘विमा कंपनीचा अधिकृत धनादेश’ द्यायची साधी नैतिकता दाखवली असती, तरी कदाचित त्या दिवंगत पत्रकाराच्या आत्म्याला शांती मिळाली असती.
अशा परिस्थितीत, जेव्हा कोणी स्वतःला पत्रकार म्हणून मिरवतो, तेव्हा त्याच्या लेखणीवर, कर्तृत्वावर आणि सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्न विचारणं ही लोकांची जबाबदारी आहे. “कोणतंही मोठं नाव हे विश्वासार्हतेचं प्रतीक नसतं.” आज हे प्रकर्षाने समजून घ्यायची गरज आहे.
समोरासमोर बोलणं हेच खरं पत्रकारितेचं लक्षण
जे खरे पत्रकार असतात, जे एका “बापाचे” असतात – ते नेहमी स्पष्ट, थेट आणि निर्भीड असतात. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात कोणतीही दुटप्पी भूमिका नसते. ते समोरासमोर मुद्दे मांडतात, संवाद साधतात आणि निर्माण झालेली प्रत्येक गोंधळाची स्थिती मोकळेपणाने स्पष्ट करतात.
पण जे लोक सतत मागे बोलतात, गैरसमज पेरतात, चिखलफेक करतात – तेच खरे कधीच नसतात. ते नेहमी ‘पाठीमागून वार’ करण्याच्या नादात असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवण्या आधी, त्यांना डोक्यावर उचलण्याआधी, लोकांनी स्वतः विचार करून प्रश्न विचारायला शिकायला हवं.
पत्रकार संघटना म्हणजे लुटारूंचा गट नव्हे किंवा विनोद नव्हे, ती जबाबदारी आहे
पत्रकार संघटना म्हणजे केवळ इव्हेंट घेणं, फोटोचे बॅनर लावणे , पैसे घेऊन पुरस्कारासाठी व्यासपीठावर बोलावणं नव्हे. ती संघटना म्हणजे पत्रकारांच्या हक्कांचं रक्षण करणं, त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं, आणि एखाद्या पत्रकारावर अन्याय झाला तर त्याच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं.
पण सध्याच्या तथाकथित पाचोरा येथील पत्रकार संघटनांमध्ये हेच मूळ मूल्य हरवत चाललं आहे. काही व्यक्ती या संघटनांचा वापर फक्त स्वतःचा आर्थिक खिचा भरण्यासाठी किंवा सामाजिक ब्रँड तयार करण्यासाठी करतात. त्यांच्या लेखणीच्या ताकदीपेक्षा बॅनर वर फोटो झळकायचं वेड जास्त असतं. आणि जेव्हा खरे प्रश्न उभे राहतात – पत्रकार भवनाचे ,पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचे ,पत्रकारांच्या सुरक्षेचे, मोबदल्याचे, किंवा विम्याचे पैसे देण्याची वेळ येते तेव्हा ह्याच मंडळींची “गायब” होणारी भूमिका सर्वांना ज्ञात आहे.
माध्यमांचा वापर नव्हे, दुरुपयोग सुरु आहे
आज सोशल मिडिया, न्यूज पोर्टल्स आणि मोबाईल पत्रकारितेने प्रत्येकाला आवाज दिला आहे. पण काही लोक या तंत्रज्ञानाचा योग्य वापर न करता, त्याचा दुरुपयोग करत आहेत. लोकांची दिशाभूल करणं, खोटी माहिती पसरवणं, आणि व्यक्तिगत आकसातून बातम्या बनवणं – या गोष्टी पत्रकारितेचं शस्त्र नव्हे, तर तिचं अपमान करणं आहे.पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील आणि माझा वाद जेव्हा झाला तेव्हा याच स्थानिक पोटभरु पत्रकारांनी आमदारांचे कार्यालय जणू आपले पोट भरण्याचे कार्यालय समजून तेथे बस्थान माडले होते आणि दिवसभर गैरसमज कसे होतील व वाढतील यासाठी पूर्ण शक्ती खर्च करीत होते
“ब्रेकिंग टाकून पोट भरतो” हा आरोप अनेकांवर लागू होतो – कारण त्यांनी पत्रकारितेला व्यवसाय नव्हे तर धंदा बनवलं आहे. अशी मंडळी कोणत्याही सन्मानाच्या पात्र नाहीत.
पत्रकार होणं म्हणजे स्वतःला “माध्यम” म्हणवून घेणं नव्हे, तर खर्‍या अर्थाने माध्यम बनणं. लोक आणि प्रशासन, शासन यांच्यातील विश्वासाचं पुलं बनणं. पण जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या पदाचा, नावाचा, किंवा ओळखीचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करते – तेव्हा ती फक्त स्वतःला नाही, तर संपूर्ण पत्रकार समाजाला बदनाम करते.
आज आपण जागरूक होण्याची वेळ आली आहे. जे स्वतःच्या नावापुढे तालुका जिल्हा विभाग राज्य अशी पत्रकारितेची मोठी मोठी पदे लावतात इतर सहकाऱ्यांसाठी सोडा पण स्वतःकडे किंवा स्वतःसाठी अधिकृत शासनमान्य अधिस्विकृतीचे कार्ड देखील घेण्याची लायकी नसते मोठ्या पदाच्या ,नावाच्या आड पत्रकारितेचं खोटं नाटक करणाऱ्यांपासून सावध राहण्याची वेळ आहे. कारण लोकशाही टिकवण्यासाठी स्वच्छ पत्रकारिताचं अस्तित्व गरजेचं आहे. आणि ती स्वच्छता हेवेदावे, डावपेच, आणि स्वार्थापेक्षा जास्त महत्त्वाची असते.
म्हणूनच स्नेहलचं हे नम्र आवाहन आहे – कोणताही मोठा चेहरा बघून त्याच्या मागे न लागता, थेट प्रश्न विचारा, समोरासमोर संवाद साधा. जो खरा पत्रकार असेल, तो उत्तर द्यायला कधीच मागेपुढे पाहणार नाही. कारण ज्याचं मन साफ असतं, त्याला पारदर्शकतेची भीती नसते. आणि तोच एका बापाचा असतो- तुर्त एवढेच

पाचोरा येथून सतत प्रत्येक शनिवारी प्रकाशित होणारे & शासकीय मान्यता प्राप्त ( अदाता नोंदणी क्र. 5301000145000179 & अदाता क्र. 53010010490 ) जाहीरात यादीत समावेश साप्ता.झुंज या वृत्तपत्राचा वर्ष 18 अंक क्र. 01 दि. 5 एप्रील 2025
आपणास सस्नेह सादर करीत आहे
Dhyeya News & सा. झुंज संपादक..  संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
M0. 73 8510 8510 7588645907 /94222 75807

मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये ऐतिहासिक वाढ: निवासी व कार्यालयीन व्यवहारांत विक्रमी नोंद

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नाइट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या तिमाहीत मुंबईने निवासी आणि कार्यालयीन रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये ऐतिहासिक वाढ नोंदवली आहे. देशातील सर्वात मोठी निवासी बाजारपेठ म्हणून मुंबईने २४,९३० प्रायमरी सदनिकांच्या विक्रीची नोंद करत वार्षिक ५% वाढ दर्शवली. डेव्हलपर्सनीही या गतीचा लाभ घेत २५,७०६ नवीन सदनिका लाँच केल्या, ज्यामध्ये २% वाढ झाली.मुंबईने देशभरातील एकूण निवासी विक्रीत २८% योगदान दिले. सरासरी निवासी किमतीत ६% वाढ झाली असून, प्रति चौरस फूट किंमत ८,३६० रुपयांवर पोहोचली. विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या १६६,९१५ वरून १६६,४५४ पर्यंत घटली. “क्वॉर्टर्स टू सेल” मेट्रिक ७.७ वरून ७.१ पर्यंत सुधारला, ज्यामुळे बाजारातील स्थिरता आणि ग्राहकांचा विश्वास अधोरेखित झाला.मुंबईतील निवासी विक्रीत प्रीमियम सेगमेंटचा हिस्सा वाढताना दिसतो. २० दशलक्ष ते ५० दशलक्ष रुपयांच्या सदनिकांची मागणी ९% वरून १२% पर्यंत वाढली, तर २०० दशलक्ष ते ५०० दशलक्ष श्रेणीत विक्री तब्बल १०८% वाढली.मुंबईतील कार्यालयीन बाजारपेठेनेही विक्रमी वाढ नोंदवली. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत कार्यालयीन व्यवहारांचे एकूण क्षेत्रफळ ३.५ दशलक्ष चौरस फूटांवर पोहोचले, ज्यामध्ये वार्षिक २४% वाढ झाली. नवीन कार्यालयीन जागांचा पुरवठा ४३% वाढून ०.५ दशलक्ष चौरस फूट झाला. सरासरी भाडे प्रतिमहिना प्रति चौरस फूट ११८ रुपये नोंदवले गेले.फ्लेक्स ऑफिस स्पेसेसने कार्यालयीन बाजारपेठेत मोठी मजल मारली आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीतील ०.२५ दशलक्ष चौरस फूटांवरून २०२५ मध्ये १.२४ दशलक्ष चौरस फूटांपर्यंत झेप घेत, ३८४% वाढ दर्शवली.नाइट फ्रँक इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया
म्हणाले, “मुंबईच्या निवासी बाजारपेठेला प्रीमियम घरांसाठी वाढती मागणी, तसेच मुंबई कोस्टल रोड व मेट्रो प्रकल्पांचा मोठा फायदा झाला आहे. या पायाभूत सुविधांमुळे शहराची कनेक्टिव्हिटी सुधारली असून, ग्राहक व डेव्हलपर्स दोघांमध्येही आत्मविश्वास वाढत आहे. तसेच, कार्यालयीन बाजारपेठेत विविध कंपन्यांकडून वाढती मागणी आणि मुंबईच्या दीर्घकालीन विकास क्षमतेवर असलेला विश्वास हा मोठा सकारात्मक संकेत आहे.”मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील ही दमदार कामगिरी पुढील तिमाहीतही कायम राहील, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!