Home Blog Page 128

विजय भोई यांचा पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार: एक क्रांतिकारी उपक्रम

0

Loading

पाचोरा: आजच्या काळात, पर्यावरण रक्षणासाठी विविध पद्धती स्वीकारल्या जात आहेत. त्याचाच एक सुंदर भाग म्हणजे “जय म्हसोबा महाराज गवरी सेवा, विजय भोई पाचोरा” यांच्याकडून सुरू करण्यात आलेला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा उपक्रम. देशी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचा वापर करून पारंपरिक धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्काराची ही पद्धत राबवली जाते.
पर्यावरण पूरकता आणि परंपरेचा संगम:
परंपरेला सन्मान देत पर्यावरणपूरक साधनांचा उपयोग करणे, ही काळाची गरज ओळखून या संस्थेने पुढाकार घेतला आहे. गोवऱ्या, कापूर, आणि देशी गायीचे तूप यांच्या वापरामुळे अंत्यसंस्कार प्रक्रिया पर्यावरणास हानी पोहोचविण्याऐवजी त्याचे रक्षण करते.
धार्मिक विधींसाठी विशेषत्व:-
धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी या संस्थेने खास गोवऱ्या आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यामुळे लोकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता येतात. शिवाय, गोमातांच्या संरक्षणासाठीही या उपक्रमातून मदत केली जाते.
गायींच्या संवर्धनाला चालना:-
या उपक्रमामुळे गोशाळांना आर्थिक सहाय्य मिळते. गायींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी:-
या प्रक्रियेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते, प्लास्टिक किंवा इतर प्रदूषक घटकांचा वापर होत नाही, आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो.
समाजात जागरूकता निर्माण:-
विजय भोई संचलित “जय म्हसोबा महाराज गवरी सेवा” ही संस्था लोकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करत आहे. धार्मिकता, परंपरा आणि आधुनिक गरजा यांचा समतोल साधत, ही संस्था समाजासाठी एक आदर्श निर्माण करत आहे.
संपर्क माहिती:-
या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधा:विजय भोई: 9766836299, 9975444232
विजय भोई यांच्या “जय म्हसोबा महाराज गवरी सेवा, पाचोरा” यांनी सुरू केलेला पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा उपक्रम केवळ धार्मिक विधींनाच सन्मान देत नाही तर पर्यावरण संवर्धनातही मोलाची भर घालतो. हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल असून भविष्यात अधिकाधिक लोकांनी याचा स्वीकार करावा, अशी अपेक्षा विजय भोई यांनी याप्रसंगी माहिती देताना व्यक्त केली

9 फेब्रूवारी रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित ‘शाहिरी बाणा’ कार्यक्रम ( पहा बातमी मध्ये VDO ची एक झलक )

0

Loading

पाचोरा – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने, संस्थेच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात, दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता “शाहिरी बाणा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. संस्थेच्या

विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. द. मो. परांजपे
कै. बाबूभाई रावल
कै. सुपडूअण्णा पाटील
कै. के. एम. बापू पाटील
कै. आप्पासाहेब ओंकार वाघ
कै. दादासाहेब आर. एस. थेपडे
कै. भाईसो वाय. बी. शर्मा
कै. अण्णासाहेब एस. आर. देशमुख या सर्व मान्यवरांनी संस्थेच्या उभारणीत आणि विकासात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात पुणे येथील युवा शाहीर चंद्रकांत माने आणि युवा शाहिरी ऋतुजा माने व त्यांच्या सहकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित “शाहिरी बाणा” हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाद्वारे शिवरायांच्या पराक्रमांची गाथा, त्यांचे शौर्य, आणि राज्यकारभारातील त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली जाईल.
“शाहिरी बाणा” हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या समृद्ध शाहिरी परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. शाहिरी ही महाराष्ट्राची एक पारंपारिक लोककला असून, तिच्या माध्यमातून समाजप्रबोधन, इतिहासाची जाणीव, आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन केले जाते. या कार्यक्रमात पोवाडे, लावणी, भारूड यांसारख्या विविध लोककला सादर केल्या जातात. शाहीर चंद्रकांत माने आणि ऋतुजा माने हे या क्षेत्रातील युवा कलाकार असून, त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे.
या कार्यक्रमास पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ उपस्थित राहणार आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव ॲडव्होकेट दादासाहेब महेश देशमुख, वाईस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून, त्यामध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्ये अंतर्भूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शाहिरी सादरीकरणामुळे उपस्थितांना त्यांच्या पराक्रमांची आणि कार्याची सखोल माहिती मिळेल. तसेच, दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याची ही एक संधी आहे.
पाचोरा तालुका आणि परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार दिलीपभाऊ वाघ चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव ॲडव्होकेट दादासाहेब महेश देशमुख, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी संस्थेचे सर्व संचालक आणि पदाधिकारी यांनी केले आहे.

जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य वार्षिक स्नेहसंमेलन

0

Loading

पाचोरा: जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा येत्या ८ फेब्रुवारी २०२५ रोजी, शनिवार, सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कला, प्रतिभा आणि सृजनशीलतेला वाव देणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याची भव्यता अधिकच वाढणार आहे.
     या स्नेहसंमेलनात मा. खासदार स्मिताताई वाघ, आमदार मा. किशोरआप्पा पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. मधुकरभाऊ काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालक यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
     संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी आणि स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
       या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पथनाट्य, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य, तसेच “मोबाईल: शाप की वरदान?” या विषयावर प्रभावी नाटिका सादर करण्याचे नियोजन केले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाट्य, नृत्य, संवाद कौशल्ये आणि सृजनशीलता विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये सौ. निर्मला पाटील, सौ. प्रतिभा मोरे, सौ. रूपाली जाधव, सौ. प्रीती शर्मा, सौ. शीतल तिवारी, सौ. योगिता शेंडे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग आहे.
      शाळेच्या वतीने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

कामगार नेते आमदार सचिन अहिर यांच्याद्वारेही केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :५ फेब्रुवारी रोजी इंटकच्या नेतृत्वाखालील मुंबईसह राज्यातील कारखान्यांमधील कामगारांनी कामाचा हक्क बजावताना काळ्या फिती लावून, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध केला आणि या वर्षातील आंदोलनाची‌ पहिली पायरी यशस्वी केली आहे. या आंदोलनाचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन‌ अहिर यांनी स्वागत करुन, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा जोरदार निषेध केला आहे.                                    .     महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी इंटक नेतृत्वाखालील कारखान्यामधील कामगारांना या निषेध आंदोलनाचे आवाहन केलेहोते.                                                 ६ जानेवारी २०२५ रोजी केंद्र सरकार विरुद्ध लढा देण्याचा दिल्ली मधील सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या एका बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी इंटक नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सर्व इंटक प्रणित कारखान्यामधील कामगारांनी‌ काळ्या फिती लावून आंदोलन छेडले.                       मुंबईतील टाटा, पोद्दार, इंदू क्र.५ आणि दिग्विजय या एनटीसीच्या बंद गिरण्यांच्या गेटवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगारांच्या सभा आयोजित करुन केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध करण्यात ‌आला. या निषेध सभेत खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर आदींची भाषणे झाली. भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर येताच कामगारांच्या खच्चीकरणाचे उचललेले पाऊल गेल्या १२ वर्षात मागे घेतलेले नाही. या विरूध्द सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येऊन, कामगार संघटना संयुक्त कृती समितीची स्थापन केली आणि ही समिती गेली १२ वर्षे केंद्राच्या कामगार विरोधी धोरणा विरुद्ध लढत आहे.त्याप्रमाणे ६ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा केंद्र सरकार विरुद्ध लढा देण्याचा दिल्ली मधील कृती समितीच्या एका बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी इंटक नेतृत्वाखालील कारखान्यांमधील कामगारांनी कामाचा हक्क बजावताना काळ्या फिती लावून, केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला.केंद्र सरकारने भारतीय रेल्वे, संरक्षण, कोळसा खाणी, पोलाद, बंदरे, विमानतळ, रस्ते, वीज, दूरसंचार, बँका इत्यादी सार्वजनिक उद्योगात खाजगीकरण अवलंबून सार्वजनिक उद्योगाच्या तत्वालाच मूठमाती देऊन, कामगारांना रस्त्यावर आणले. जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्याचे तयारी केंद्र सरकारने अद्याप तरी दाखविलेली नाही, तसेच दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने कोरोना काळातील लॉकडाऊनची संधी साधून, लोकसभेतील पाशवी सदस्य संख्येच्या (खासदारांच्या) बळावर २९ कायदे मोडीत काढून ४ कामगार संहितेत रुपांतर केले. केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून “फोर कोड बिल” संमत करून कामगारांचे खच्चीकरण केले आहे, तसेच कामगार संघटनाचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे, या विरुद्ध (काल) ५ रोजी इंटक नेतृत्वाखाली सर्वच उद्योगातील कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन यशस्वी केले आहे. महाराष्ट्र इंटेकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते तसेच उपाध्यक्ष दिवाकर दळवी, सेक्रेटरी मुकेश तिगोटे आदी पदाधिकार्‍यांनी सर्व कामगार वर्गाचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध इंटक, आयटक, एच. एम.एस, सिटू‌ इत्यादी १२ केंद्रीय कामगार संघटना एकत्र येऊन लढत आहेत. या संघटनांच्या नेतृत्वाखाली‌ राज्यातील कारखाने, आस्थापनेतील कामगारांनी केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाचा तिव्र निषेध केला आहे. देशातील शेतकरी‌‌वर्ग‌ तर शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी पंजाब सीमा रेषेवर आंदोलनाद्रारे लढत आहे. आतापर्यंत केंद्र सरकार कडून देशात कामगार विषयक धोरण आखताना सर्व कामगार संघटनांना विश्वासात घेतले जात होते. पण नरेंद्र मोदी सरकारने या तत्त्वाची पायमल्ली करून ‘हम करो से कायदा’ हे एकतर्फी धोरण अवलंबिले आहे. या विरुद्धचे‌ आंदोलन यशस्वी करून सर्व कामगार संघटना, बीजेपी सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे महाराष्ट्र इंटक नेतृत्वाने म्हटले आहे. केंद्रीय इंटकचे अध्यक्ष जी. संजीवा रेड्डी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सर्व शक्तिनीशी लढत राहील आणि यश मिळवील असा महाराष्ट्र इंटक नेतृत्वाने विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे.

अभिनेते रविंद्र शंकर पाटील यांचा अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मान

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नासीक साहित्य रंग साहित्य मंच आयोजित नारायण सुर्वे ग्रंथालय येथे एका भव्य समारंभात, अभिनेते रविंद्र शंकर पाटील यांना साहित्यातील, अभिनय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित अभिनय सम्राट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक रविकांत शार्दुल, कवी सुभाष उमरकर, हर्षवर्धन जाधव, इंदिरा जाधव आणि अश्विनी सांगळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा पाटील यांच्या कलेच्या समर्पणाचा पुरावा होता.
    लेखक, कवी, दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावलेले बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले रविंद्र शंकर पाटील २००४ पासून नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी छबिलदास महाविद्यालयातून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांनी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, एकपात्री प्रयोग स्पर्धा आणि द्विपात्री स्पर्धा यासह विविध स्पर्धांमध्ये असंख्य पुरस्कार जिंकले आहेत.
     पाटील यांचा व्यावसायिक रंगभूमीवरील प्रवास सुनीता थिएटरच्या माध्यमातून झाला आहे, जिथे त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या प्रभावी कामामुळे त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत आणि व्यावसायिक, प्रायोगिक आणि राज्यस्तरीय नाटकांमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मान्यता मिळाली आहे.
     पाटील यांच्या कामगिरीची ओळख पटवून देण्यात आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुशीलकुमार शिंदे आणि डॉ. विजयकुमार शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
     अभिनय सम्राट पुरस्कार हा पाटील यांच्या कला आणि साहित्यातील अभिनय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ओळख आहे. हे त्यांच्या कठोर परिश्रम, आवड आणि त्यांच्या कलेप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रमाण आहे, जे नवोदित अभिनेते आणि लेखकांना प्रेरणा म्हणून काम करते. अभिनय सम्राट पुरस्कार सोहळा खूप यशस्वी झाला आणि तो रविंद्र शंकर पाटील यांच्या साहित्यातील, अभिनय क्षेत्रातील पुरावा ठरला.  
      रविंद्र शंकर पाटील हे एक अभिनेते, लेखक, कवी, दिग्दर्शक आणि गीतकार आहेत जे २००४ पासून नाट्य क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि सुनीता थिएटर संस्थेसोबत अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. पाटील हे अंधेरी, मुंबई येथील रहिवासी आहेत आणि व्यावसायिक, प्रायोगिक आणि राज्यस्तरीय नाटकांमधील योगदानाबद्दल त्यांना ओळखले जाते.

युवा सांस्कृतिक कला महोत्सवात इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूल चमकले; दुसरे पारितोषिक पटकावले

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवधनुष्य मित्र मंडळ (माघी गणेशोत्सव) आणि आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी आयोजित केलेल्या प्रतिष्ठित युवा सांस्कृतिक कला महोत्सवात इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रदर्शन करत आपला ठसा उमटवला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका एल वॉर्डच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा २०२४-२०२५ मध्ये शाळेच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या संघाला दुसरे पारितोषिक देण्यात आले आहे.                         पौर्णिमा काळोखे, योग्या सूर्यवंशी, वंशिका गोठणकर, मोईन खान, आरुषी पवार, इरम शेख, आयशा नाथ आणि अंशिका महली या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या विजेत्या संघाचे मार्गदर्शन सक्षम आणि अनुभवी सलोनी कुडाळकर (सुभेदार) यांनी केले आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक संतोष आनंद गायकवाड यांनी दिग्दर्शन केले. संघाचे सहाय्यक सदस्य गोरख माने, पूर्वा सागवेकर, दुर्वा राऊत आणि सुश्रुती पाटील यांनी संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.                                विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल आमदार दिलीप मामा लांडे यांनी घेतली, ज्यांनी संघाला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित केले. ही कामगिरी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेला वाव देण्याच्या आणि त्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.     इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूलचा विजय हा कला आणि संस्कृतीसह शिक्षणाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टतेसाठी शाळेच्या समर्पणाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. शाळेचे प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले आहे.                              विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा समुदाय या कामगिरीने खूप आनंदित झाला आहे. कलात्मक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून शाळेची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे. संघाचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांची कामगिरी निःसंशयपणे इतरांना कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अशाच उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करेल.                 युवा सांस्कृतिक कला महोत्सवात इमेज मेकर्स ट्यूलिप इंग्लिश स्कूलने पटकावलेले दुसरे पारितोषिक हे एक उल्लेखनीय यश आहे जे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेला वाव देण्याच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते. शाळेचे प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणासाठी कौतुकास पात्र आहेत आणि त्यांची कामगिरी येणाऱ्या काळात दीर्घकाळ स्मरणात ठेवली जाईल.

जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाचे यंदा २२ वे वर्ष

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादरमधील अमर हिंद मंडळ, रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांच्या सहकार्याने, पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५ च्या २२ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे. हा महोत्सव रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दादर येथील अमर हिंद मंडळ सभागृहात सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० वाजेपर्यंत होणार आहे.                      गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यासाठी एक आदर्श मानदंड असलेला हा प्रतिष्ठित महोत्सव प्रसिद्ध लेखक, कवी आणि साहित्यिकांना मराठी साहित्याची समृद्धता आणि विविधता साजरी करण्यासाठी एकत्र आणेल. हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी एक मेजवानी ठरेल. मराठी साहित्यातील सर्वोत्तम कलाकृतींचे प्रदर्शन करतील.                               मराठी साहित्याच्या जगात महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रसिद्ध मराठी लेखक आणि साहित्यिक समीक्षक पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट मराठी साहित्याला प्रोत्साहन देणे आणि लेखक, कवी आणि साहित्यिकांना एकत्र येऊन भाषेचा उत्सव साजरा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे.                       साहित्यप्रेमी अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणी करण्यासाठी समीर चव्हाण (९८२१८१२३३८), राजेंद्र कर्णिक (९८२०५८४५८९), किंवा रवींद्र ढवळे (९९२०५७२९७४) यांच्याशी संपर्क साधू शकतात.                                           पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५ हा एक संस्मरणीय कार्यक्रम ठरेल जो मराठी साहित्यातील सर्वोत्तम साहित्याचा उत्सव साजरा करेल आणि साहित्यिक रसिकांना एकत्र घेऊन भाषेची प्रशंसा तसेच गौरव करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.

साहित्यक्षेत्रात सर्वांनी प्रामाणिकपणे काम करूया – विक्रांत लाळे

1

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “साहीत्यक्षेत्रात आपण सर्वांनी  प्रामाणिकपणे कार्य करूया. आणि प्रामाणिकपणे कार्य करणार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. यश आज ना उद्या मिळणार हे नक्की. तसेच योग्यवेळी योग्य सत्कार देखील होणार हे ही नक्कीच. फक्त सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा, जोवर तुमच्या मनाला खात्री होत नाही तोवर चांगलं नि छान असे लिहिण्याचा प्रयत्न करत रहा, विहिरीत उडी मारल्याशिवाय जसे पोहता येत नाही, तसेच संमेलनाला कार्यक्रमाला गेल्याशिवाय, इतर कवींच्या कवयित्रींच्या कविता नि सादरीकरणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला छानसे लिखाण आणि नीटनेटके सादरीकरण करता येणार नाही.” अशा भावना आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विक्रांत मारुती लाळे यांनी व्यक्त केल्या. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११व्या कविसंमेलनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सारस्वतांनी तयार केलेल्या उत्तम रचनांचा आस्वाद घेत, एकमेकांना दाद देत तर वेळप्रसंगी हास्याचे फवारे उडवत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्या संकुलात उत्तमोत्तम रचनांचा नजराना सादर केला.
      “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी विक्रांत लाळे यांचे ज्येष्ठ कवी प्रफुल अनंत साने यांच्या हस्ते तसेच ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन सुखदरे आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह, मानाची शाल आणि ग्रंथभेट प्रदान करून स्वागत करण्यात आले.
      कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल धोंडीराम थोरात, गौरवी प्रकाश राऊत, आश्विनी सोपान म्हात्रे, नमिता नितीन आफळे, विकास दादाजी पाटील, प्रफुल अनंत साने, पल्लवी परब, रविंद्र शंकर पाटील, मेघना दीपक सावंत, नंदा कोकाटे, संतोष कसवणकर, कल्पना दिलीप मापूसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे, अशोक (भाई) नार्वेकर, गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक, विलास सूर्यवंशी, सीमा विश्वास मळेकर, वैभवी विनीत गावडे, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नितीन अनंत सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. पहिल्या सत्राची शेवटची रचना कविसंमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
     मध्यंतरामध्ये विलास सूर्यवंशी यांनी आणलेल्या अल्पोपहारासोबत वैभवी गावडे यांनी आणलेल्या तिळगुळाचा आस्वाद सर्वांनी घेतला. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या स्वरचित विषय विरहित रचना सुंदररीत्या सादर केल्या.
      संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी सादर केलेल्या कवितेला सर्वांनी मनमुराद दाद दिली. मनोगत व्यक्त करताना अध्यक्षांनी उपरोक्त विचार मांडले. नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम देखील दर्जेदार झाला. सर्वांच्या कविता नावीन्यपूर्ण व आशयायुक्त अशा होत्या. त्यामुळे दोन्ही ही सत्रे अगदी श्रवणीय आणि सुखदायक ठरली. नियोजन, आयोजन सर्व अगदी छान होते. आपण करत असलेली साहित्य सेवा अशीच अखंडित चालू राहो व मराठी भाषेची साहित्य संपदा वाढत राहू दे अशा शुभेच्छाही त्यांनी आयोजकांना दिल्या.
     कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या दीपक सावंत, सूरज राय, सारिका अनुप कापले तसेच मुक्त व्यासपीठचे सर्वेसर्वा पंकज के. ह्यांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना मोकळ्या केल्या. सर्वांनी कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तर संपूर्ण कार्यक्रमाचं ध्वनीचित्रमुद्रण आणि छायांकन रविंद्र पाटील यांनी केले.
     कार्यक्रमाची सांगता करताना “शोध आनंदाचा फाऊंडेशन” चे अध्यक्ष नितीन सुखदरे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र तसेच संमेलनाध्यक्ष विक्रांत लाळे यांनी आणलेली भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
       १२वे मासिक अर्थात वर्षपूर्ती कविसंमेलन रविवार ९ फेब्रुवारी २०२५ होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सकस लेखणीचा वरदहस्त लाभलेल्या नंदा कोकाटे असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.
      कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नीच श्रेष्ठ – आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे म्हणतात, तेच खरे आहे, कारण ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर रामचंद्र साळवी यांचा मरणोत्तर गुणगौरव त्यांच्या पत्नीच्या जन्मदिनी होत आहे, हा अलौकिक आणि अपूर्व योग आहे. शाहीर प्रभाकर साळवी यांच्या पश्चात श्रीमती शारदा साळवी यांनी अनेक कौटुंबिक अडचणी झेलत परिवाराला सुखाचे जीवन प्राप्त करुन दिले. सामाजिक जडणघडणीत दिव्याप्रमाणे त्या अहोरात्र जळत राहिल्या, अशा‌ शब्दांत आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी श्रीमती शारदा यांचा ८० व्या‌ जन्मदिनी गुणगौरव केला.शाहीर साबळे, अमरशेख‌ आणि शाहीर खामकर यांच्या पिढीतील ख्रिस्तीवासी‌ शाहीर प्रभाकर साळवी यांनी लोककला जोपासताना सामाजसेवेचे व्रत पूर्ण केले, म्हणूनच त्यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तो मानाचा पुरस्कार त्यांच्या पत्नी शारदा प्रभाकर यांच्या ८०‌ व्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शारदा प्रभाकर साळवी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
‌‌आमदार‌ डॉ. ज्योती गायकवाड ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांच्या स्मृतींना उजाळा देताना म्हणाल्या, शाहीर प्रभाकर साळवी यांनी शाहिरी लोककले बरोबर माणूसपण जपले, म्हणूनच त्यांचे मोठेपण समाजात कायम राहीले.कार्यक्रमाला‌ शाहिरी‌ लोककला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, कोषाध्यक्ष ज्येष्ठ संगीतकार महादेव खैरमोडे, ज्येष्ठ लेखक, पत्रकार काशिनाथ माटल‌ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर सॅमसन‌‌ बळीद होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेंजामिन काकडे‌ यांनी केले. सुधीर‌ प्रभाकर साळवी यांनी उपस्थितांचे‌‌ आभार मानले. विल्सन शिंदे, संदेश उन्हावणे, संदेश सांगळे, अरुण थोरात‌, सुमित पटेकर, फिलिप बळीद, अनुश थोरात आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरद्वारे प्रचार-प्रसार अभियान – जम्मू येथे भव्य आयोजन

0

Loading

पाचोरा – त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने ‘देश विदेश अभियान’ अंतर्गत मोठ्या उत्साहात जम्मू येथे प्रचार-प्रसार अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश स्वामी समर्थांची शिकवण आणि अध्यात्मिक संदेश घराघरांत पोहोचवणे आहे. दि. १२ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे.                 या अभियानांतर्गत विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या माध्यमातून स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली लोकांपर्यंत अध्यात्माचा प्रसार व मानसिक शांतीचा संदेश पोहोचवण्याचा उद्देश आहे. श्री वैष्णो देवी मातेच्या पवित्र स्थानाजवळ होत असलेल्या या अभियानाचे स्थानिक स्तरावर विशेष महत्त्व आहे.                  अभियानाच्या तयारीत स्थानिक कार्यकर्त्यांनी तसेच गुरुपीठाच्या प्रमुखांनी मोठी मेहनत घेतली आहे. श्री स्वामी समर्थ गुरुपीठाने या अभियानासाठी एक खास समिती गठित केली आहे. या समितीत गुरुपीठाशी संबंधित अधिकारी, साधक, आणि प्रचारक यांचा समावेश आहे. त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधून कार्यक्रमाचे आयोजन सुनिश्चित केले आहे.                 अभियानाच्या दरम्यान विविध ठिकाणी स्वामी समर्थांचे प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत, ज्यामुळे लोकांना त्यांचा आध्यात्मिक मार्ग समजेल.                      श्री वैष्णो देवी मंदिर परिसरातील विशेष पूजन: जय माता दी आणि श्री वैष्णो देवी मातेच्या नावाने भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.                                                 या अभियानासाठी प्रमुख साधक, गुरुपीठाचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी स्थानिक आध्यात्मिक नेते आणि भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.                                     संपूर्ण भारतातून भक्तांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. Contact Numbers: +917720010073, +917709107339, +919226046180 तसेच ईमेलद्वारे deshvidesh@gurupeeth.in येथे अधिक माहिती मिळू शकते.         इंस्टाग्रामवर @deshvideshabhiyan या हॅंडलद्वारे प्रचार अभियानाची सर्व माहिती आणि अपडेट्स शेअर केली जात आहेत. या माध्यमातून जागतिक स्तरावर भक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे.     ‘देश विदेश अभियान’ हे श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून फक्त अध्यात्माचा प्रचार नव्हे तर सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करण्याचा उद्देश साध्य होईल.      जय माता दी… श्री वैष्णो देवी मातेच्या आशीर्वादाने हे अभियान यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. या अभियानाच्या निमित्ताने जम्मू येथे एक अध्यात्मिक चैतन्य निर्माण होणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे अभियान एका ऐतिहासिक सोहळ्याचे रूप धारण करेल.


ताज्या बातम्या

error: Content is protected !!