Home Blog Page 147

पाचोरा शहरात मर्यादित दिवसासाठी भव्य सेल धमाका: फक्त ५० रुपयांपासून गारमेंट्स उपलब्ध

0

Loading

पाचोरा शहरातील प्रसिद्ध बालाजी कलेक्शनने आपल्या ग्राहकांसाठी एक अभूतपूर्व ऑफर आणली आहे. लहान मुलांचे गारमेंट्स, लेडीज गारमेंट्स तसेच वेस्टर्न पिसेस केवळ ५० रुपयांपासून उपलब्ध करून देत, ग्राहकांसाठी भव्य सेलची घोषणा केली आहे.

बालाजी कलेक्शनची वैशिष्ट्ये:

तब्बल २५,००० वेगवेगळ्या व्हरायटीजमधून निवडीचा आनंद.

आकर्षक आणि दर्जेदार ब्रँडेड कपड्यांची खास खरेदीची संधी.

प्रत्येकासाठी परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक डिझाईन्स.

कोठे उपलब्ध आहे हा सेल?
हा भव्य सेल पाचोरा शहरातील भुयारी पुलाजवळ, हॉटेल भाग्यलक्ष्मीच्या बाजूला असलेल्या बालाजी कलेक्शनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

संपर्कासाठी:
प्रोप्रायटर ऋषिकेश चौधरी
मोबाईल नंबर: 8793846414

सणासुदीच्या खरेदीसाठी तसेच विशेष सेलच्या लाभासाठी आजच भेट द्या आणि आपल्या आवडीचे गारमेंट्स अत्यल्प किमतीत खरेदी करा!

येवला येथील माणुसकीची साक्ष – आदमने परिवाराचे प्रेरणादायी जीवन

0

Loading

पाचोरा -पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे येवला आणि त्याच्या जवळच असलेल्या आडगाव गावात एक आदर्श आणि माणुसकीचा सुगंध असलेला परिवार आहे – आदमने परिवार. या कुटुंबाची ओळख आणि त्यांच्या माणूसकीने भारावून जाण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

ओळख आणि आदरातिथ्याचा अनुभव

येवल्यातील एका कामानिमित्त मला ललिता मॅडम यांच्या माध्यमातून आदमने कुटुंबाच्या रामदास आदमने यांच्याशी ओळख झाली. खरं तर, रामदास आदमने आणि ललिता मॅडम हे महाविद्यालयीन काळात क्लासमेट्स होते. जुन्या परिचयावरून रामदास आदमने यांनी आपुलकीने मला त्यांच्या घरी आमंत्रित केले. त्यांच्या घरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच मला आदरातिथ्याचा खरा अर्थ कळला. घरातील सदस्यांनी थोड्याच वेळात मला आपुलकीने आपल्यासारखं केलं.

प्रगतिशील शेतकऱ्याची ओळख

रामदास आदमने हे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या 50 एकर बागायती शेतीतून मिळणारा विकास त्यांचा जिद्द आणि श्रम यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी शेतीतील पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची शेती हा केवळ अर्थार्जनाचा स्रोत नसून गावासाठी प्रेरणास्थान आहे.

परिवाराचा एकोप्याचा मंत्र

माधवराव आणि शांताबाई आदमने यांच्या संस्कारातून घडलेल्या रामदास आदमने यांचा परिवार हा एकात्मतेचे प्रतीक आहे. परिवारातील सदस्यांची संख्या मोठी असूनही घरातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव लाघवी आणि आपुलकीने भरलेला आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नात्यांचे आणि परंपरेचे जतन करत आधुनिकतेचा स्वीकार कसा करावा, याचे उदाहरण आहे.

आदमने परिवाराबद्दल अधिक सांगायचे झाले तर, हा परिवार केवळ शेती किंवा सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध नाही, तर त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही ओळखला जातो. आदमने कुटुंबाने एकत्र कुटुंब पद्धतीचे मूल्य कायम ठेवत एकजुटीचे उदाहरण निर्माण केले आहे. वडील माधवराव आणि मातोश्री शांताबाई यांच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली रामदास आदमने, त्यांची पत्नी अनिता, लहान भाऊ संजय माधवराव आणि त्यांची पत्नी भारती या सर्वांनी घराचा एकोपाही जपला आहे.

परिवारातील पुढील पिढी शैक्षणिकदृष्ट्या उत्तम यश मिळवत आहे. रामदास आदमने यांची मुलगी श्वेता ही आयटी इंजिनियर असून साक्षीही B E असुन पुढील शिक्षणात प्रगती करत आहे. संकेतने B B I BlA शिक्षण घेतले आहे. हा परिवार फक्त आर्थिक प्रगतीसाठीच नव्हे, तर ज्ञान आणि कुटुंबातील मूल्यांसाठीही ओळखला जातो.

माणुसकीचे दर्शन

आदमने परिवार हे केवळ आपलेपणाचे आदर्श उदाहरण नाही, तर त्यांच्या माणुसकीच्या वागणुकीतून इतरांना प्रेरणा मिळते. घरातील कुठल्याही पाहुण्यांशी संवाद साधताना त्यांच्या वागणुकीत अभिजात प्रेम, आदर आणि आपुलकी जाणवते. त्यांच्या सहवासात काही तासही पुरेसे असतात, माणुसकीची खरी ओळख पटवण्यासाठी.

परिवाराचे योगदान

आदमने परिवार फक्त शेतीपुरता मर्यादित नाही. समाजहितासाठी आणि गावाच्या विकासासाठीही त्यांचे योगदान मोठे आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होताना, इतरांना मदतीचा हात देताना त्यांच्या कार्यातून सेवा आणि निस्वार्थतेचा वारसा जपला जातो.

प्रेरणादायी जीवनमूल्ये

आदमने परिवाराकडे पाहताना, जीवनात साधेपणा, कष्टाळूपणा आणि आत्मीयतेच्या भावनेने जीवन कसे समृद्ध करता येते, याची प्रेरणा मिळते. त्यांच्या कुटुंबाचा एकत्रितपणा आणि माणसांशी जोडलेला आत्मीय भाव समाजासाठी एक संदेश आहे की नात्यांमध्ये आपुलकी आणि विश्वास असेल तर कोणत्याही अडचणींवर सहज मात करता येते.

एक आदर्श कुटुंब

आडगाव येथील आदमने परिवार हा केवळ एक कुटुंब नाही, तर गावासाठी एक प्रेरणास्थान आहे. प्रगतिशील शेती, माणुसकीची भावना, कुटुंबाचा एकोप्याचा आदर्श आणि समाजसेवेतील सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कडून शिकण्यासारखे अनेक पैलू आहेत.

आदमने परिवाराची भेट माझ्या स्मरणात कायमची राहील. माणुसकीचे जिवंत दर्शन, कुटुंबीयांचा आदर, आपुलकीचा वसा आणि प्रगतिशील विचार यामुळे त्यांच्या जीवनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे आदर्श कुटुंब म्हणजे माणुसकीच्या प्रवाहातील दीपस्तंभच म्हणावे लागेल.

विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर सेवा समिती स्थापन; विधीज्ञ व समांतर विधी सहायकांना प्रशिक्षण

0

Loading

जळगाव – राज्य विधी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तसेच मुलांसाठी विशेष कायदेशीर सेवा समिती स्थापन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांचे हक्क आणि अधिकार यांची जाणीव करून देणे तसेच त्यांना कायदेशीर सल्ला देणे हा आहे. या योजनेतर्गत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने विधीज्ञ आणि समांतर विधी सहायकांची एक विशेष समिती गठित केली असून त्यांच्यासाठी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाचे ठिकाण व उपस्थित मान्यवर

जिल्हा सत्र न्यायालय येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २रे सह. न्यायाधीश कनिष्ठ स्तराचे एस.पी. जसवंत, बाल न्याय मंडळाच्या सदस्य डॉ. शैलजा चव्हाण, मुख्य लोक अभिरक्षक अब्दुल कादीर अब्दुल शेख, उप मुख्य लोक अभिरक्षक मंजुळा मुंदडा, सहायक लोक अभिरक्षक शिल्पा रावेरकर, सागर पी. जोशी आणि हर्षल आर. शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश

प्रशिक्षणादरम्यान उपस्थित विधीज्ञ आणि समांतर विधी सहाय्यक यांना मुलांचे अधिकार आणि हक्क, त्यांना आवश्यक असलेली कायदेशीर मदत, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये २ रे सह. न्यायाधीश एस.पी. जसवंत यांनी मुलांच्या संरक्षण आणि हक्कांसंदर्भातील महत्त्वाचे कायदे उलगडून सांगितले. डॉ. शैलजा चव्हाण यांनी बाल न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांसाठी न्यायदान प्रक्रियेत असलेली संवेदनशीलता अधोरेखित केली.

मुख्य लोक अभिरक्षक अब्दुल कादीर अब्दुल शेख यांनी न्यायालयीन प्रक्रियेतील स्थानिक लोकांच्या सहभागाचे महत्त्व पटवून दिले. उप मुख्य लोक अभिरक्षक मंजुळा मुंदडा यांनी मुलांच्या शिक्षणाशी निगडित कायद्यांवर चर्चा केली, तर सहायक लोक अभिरक्षक शिल्पा रावेरकर यांनी विद्यार्थी व लहान मुलांच्या बाबतीत कायदे कसे प्रभावीपणे अंमलात आणावेत, यावर लक्ष केंद्रित केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा सक्रिय सहभाग

या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रभारी अधीक्षक बी.के. मोरे यांच्यासह कनिष्ठ लिपिक आर.के. पाटील, प्रमोद ठाकरे, शिपाई पी.बी. काजळे, जावेद पटेल, सचिन पाटील आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी विधीज्ञ आणि समांतर विधी सहाय्यक यांना त्यांच्या कामकाजाशी संबंधित व्यावहारिक माहिती देण्यात आली आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपयुक्त उपायही सुचवण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर सेवांचे स्वरूप

या नव्याने स्थापन झालेल्या कायदेशीर सेवा युनिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जातील. उदाहरणार्थ:

कायदेविषयक सल्ला: विद्यार्थ्यांच्या हक्क व जबाबदाऱ्यांविषयी माहिती देणे.

कायदेशीर मदत: गरजूंना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करणे.

जागरूकता शिबिरे: विद्यार्थ्यांसाठी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे.

मानसिक व कायदेशीर आधार: मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कौटुंबिक, सामाजिक व शैक्षणिक समस्यांवर उपाय सुचवणे.


प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील विधीज्ञ आणि समांतर विधी सहाय्यक यांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून मुलांशी संबंधित असलेल्या न्यायालयीन प्रकरणे अधिक जलद व संवेदनशीलतेने हाताळली जातील. याशिवाय, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची जाण वाढून त्यांच्यात स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण होईल.

कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या पुढाकारामुळे कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. यामुळे, विधीज्ञ व समांतर विधी सहाय्यक यांना मुलांचे हक्क व अधिकार यांसंदर्भात अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी एक पायाभूत व्यवस्था उभारण्यात येत आहे, जी भविष्यात मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोलाची ठरणार आहे.

९ डिसेंबर पासून श्रमिक क्रीडा मैदानावर गं. द. आंबेकर चषक भव्य कबड्डी महोत्सव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृती प्रित्यर्थ ९ डिसेंबर पासून व्यवसायिक पुरुष अ गट, स्थानिक पुरुष अ  गट आणि महिला गटाच्या स्पर्धांना, संध्याकाळी ६ वाजल्यापासून आरंभ होत आहे.
   
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या कबड्डीच्या तीन विभागात खेळविल्या जाणार्‍या सामान्यांमध्ये सुमारे ४८ नामवंत संघ खेळणार आहेत. क्रीडा महोत्सवात रसिकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रो-कबड्डीतील डावखुर्‍या खेळाडूंचा रंजक खेळ पाहावयाला मिळणार आहे. क्रीडा सामने ९,१०,११ डिसेंबर तर अंतिम सामने त्याच क्रीडांगणावर १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडतील.

*आंबेकर शुटिंग बॉल स्पर्धा*
  
गं. द. आंबेकर राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धा श्रमिक जिमखाना येथे ८ डिसेंबर पासून दिवसभर होतील. जवळपास २४ नामवंत संघ या क्रीडा महोत्सवात उतरतील आणि सर्व सामने बाद‌ पध्दतीने खेळविले जातील. मुंबई शुटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत, संघटक अशोक चव्हाण या स्पर्धांचे व्यवस्थापन पहाणार आहेत. क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्पर्धा पार पडत आहेत. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे‌ आणि सर्व संघटन‌ सेक्रेटरी तसेच प्रकाश भोसले, अनिल पाटील आदी हा क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी मेहनत घेत आहेत.
   
येत्या ७ डिसेंबर पासून  राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ येथे शालेय १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी, आयडियल स्पोर्ट क्लब अकादमीच्या सहकार्याने लिलाधर चव्हाण यांच्या व्यवस्थापनाखाली भव्य बुध्दिबळ स्पर्धा पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बुध्दिबळ स्पर्धा या क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे, असे प्रसिध्दी प्रमुख काशिनाथ माटल यांनी कळवले आहे.

गोशाला महासंघ जलगाव जिल्हा अध्यक्ष व सचिवांची निवड: गोसेवा क्षेत्रात नवा अध्याय

0

Loading

जळगाव, कुसुंबा – श्री रतनलाल सी. बाफना गौसेवा अनुसंधान केंद्र, कुसुंबा येथे जलगाव जिल्ह्यातील गोशाला महासंघाच्या संचालक, ट्रस्टी, गोप्रेमी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जलगाव जिल्हा गोशाला महासंघाचे नवे अध्यक्ष व सचिव यांची निवड जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी गोशाला महासंघ जलगाव जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा-कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफना गोशालेचे संचालक व वरिष्ठ पंचगव्य चिकित्सक डॉ. बंसीलाल जैन यांची, तर सचिवपदी दीपक पाटील यांची निवड महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनिलजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक गोशालेचे संचालक, ट्रस्टी व गोप्रेमी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व निर्णय

बैठकीत जिल्ह्यातील गोशाळांच्या कार्यपद्धतींवर चर्चा करण्यात आली. गोवंश रक्षण, संगोपन, तसेच पंचगव्य उत्पादनाचा प्रचार-प्रसार यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोशाळांच्या व्यवस्थापनात सुधारणा आणि गोवंश सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईचे जयेशभाई शाह व निलेशभाई शाह यांनी आपले विचार मांडले. त्यांनी गोशाळांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपयुक्त उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे सदस्य डॉ. उद्धवजी नेरकर यांनी पंचगव्य उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित करत गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा यावर माहिती दिली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

बैठकीत गोसेवा क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती हजर होत्या. कोल्हे गोशालेचे चेअरमन श्री रमेशजी बाफना, महावीर गोशाला वरखेडीचे चेअरमन व प्रसिद्ध व्यापारी श्री विजयजी बडोला, तसेच आर. सी. बाफना गोशालेचे संचालक यांची उपस्थिती विशेषत्वाने नोंद घेण्यासारखी होती.

याशिवाय अकोला व वाशिम येथून आलेले गोप्रेमी व कार्यकर्तेही या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वांनी एकमुखाने गोवंश रक्षणासाठी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

गोशाळा महासंघाची नवीन दिशा

गोशाला महासंघाच्या नव्या नेतृत्वाच्या निवडीनंतर जलगाव जिल्ह्यातील गोशाळांची कार्यप्रणाली अधिक व्यापक व प्रभावी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवीन अध्यक्ष डॉ. बंसीलाल जैन व सचिव दीपक पाटील यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

डॉ. बंसीलाल जैन यांनी सांगितले की, “गोवंश रक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यायला हवे. पंचगव्य उत्पादनांच्या माध्यमातून गोशाळा स्वावलंबी बनवण्यावर आम्ही भर देणार आहोत.” सचिव दीपक पाटील यांनीही आपल्या भाषणात गोसेवेचे महत्त्व अधोरेखित करत, जिल्ह्यातील प्रत्येक गोशाळेला आर्थिक व व्यवस्थापनात आधार देण्याचा मानस व्यक्त केला.

शेवटी एकजुटीचा संदेश

बैठकीचा समारोप सर्वांनी एकत्र येऊन गोसेवा व गोसंवर्धनासाठी काम करण्याच्या संकल्पाने झाला. जिल्ह्यातील सर्व गोशाळांनी एकत्रितपणे काम केल्यास गोवंश संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
  गोशाळा महासंघाच्या या बैठकीने जलगाव जिल्ह्यातील गोसेवेच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पाचोऱ्यातून जवळपास 65 कोटींची फसवणूक करून राहुल फरार, दुबईतील गुंतवणुक खरच आहे का?

0

Loading

पाचोऱ्यातून सुमारे 60 ते 65 कोटी रुपये जमा करून फरार झालेला राहुल नावाचा इसम सध्या नाशिकमध्ये असल्याची सुत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, तो फक्त व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधत असल्याचे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी

आणखी एक महत्त्वाचा तपशील पुढे आला आहे – राहुलने पळवलेली संपूर्ण रक्कम दुबईमध्ये हलवली असल्याची माहीती प्राप्त असुन तेथे त्याने एका आलिशान फ्लॅटमध्ये गुंतवणूक केल्याचेही समजते

फसवणुकीची पद्धत आणि नागरिकांची अडचण

राहुलने पाचोऱ्यात विविध लोकांना 5% & 10%  मासिक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीच्या काही महिने त्याने ठरलेला परतावा नियमित दिला. त्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास बसला. मात्र, अचानक सुमारे कोटीची रुपये गोळा करून तो बेपत्ता झाला. नागरिकांनी व्यवहार करताना गुप्तता पाळली असल्याने आणि कोणतेही दस्तऐवज नसल्याने आता त्यांच्या हाती “ठणठण गोपाळा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसांची तातडीची कारवाई

सळाळी ध्येय न्युजने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस यंत्रणांनी राहुलला नासीक येथुन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तातडीने हालचाली करून त्याला पकडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि राहुलकडून जमा रक्कम परत मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या भुमिकेवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे. आणि यासाठी पोलीसच मायबाप ठरू शकतात

मंत्री, खासदार, आमदार, आणि पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा

या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मंत्री, खासदार, आमदार, आणि अन्य लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक नागरिक आता राजकीय प्रतिनिधी, पोलीस प्रशासन, आणि माध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली असली, तरी नागरिकांच्या तक्रारींचा वेगाने पाठपुरावा करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे यासाठी स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अंदाजे 60-65 कोटीचा आकडा चर्चेत असला तरी फसवणूक झालेल्या लोकांची जी काही असेल ती रक्कम परत मिळवणे आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देणे ही सर्वांची प्राथमिकता असायला हवी.

फसवणूकग्रस्तांनी काय करावे?

या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी संघटित होऊन त्वरित कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. त्यांनी पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदवून सहकार्य करावे तसेच आपल्या हक्काच्या रकमेचा दावा करण्यासाठी पुरावे सादर करणे अत्यावश्यक आहे. मंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे मदतीसाठी विनंती करून गुन्ह्याच्या चौकशीला वेग देण्याचा प्रयत्न करावा.

सावधानतेचा इशारा

या घटनेवरून धडा घेताना भविष्यात कोणत्याही वित्तीय व्यवहारात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना सर्व कायदेशीर बाबी तपासणे आणि विश्वासार्हतेचा पूर्णपणे अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.

राहुलचा फोटो शोधणे गरजेचे

जर कोणा व्यक्तीकडे राहुलचे फोटो असतील, तर ते तत्काळ ध्येय न्युज & झुंज कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा फोटो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 7385108510 पाठवता येतील.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वारंवार उघडतील येतात परंतु पैसा जास्त मिळेण्याच्या अपेक्षेने सुज्ञ नागरी देखील वारंवार या चक्रव्युहा मध्ये लालचे पोटी अडकतात असो फसवणूक झालेल्या नागरिकांनी धीर न गमावता एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. मंत्री, खासदार, पोलीस प्रशासन, आणि प्रसार माध्यमांच्या सहकार्याने या प्रकरणाला न्याय मिळवून दिला जाईल असा विश्वास व्यक्त होत आहे. शेवटी कोणीही काहीही केले तरी पाचोरा पोलीसांची भुमीकाच महत्वपुर्ण आहे

सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप: १ डिसेंबर २०२४ पासून शेतकऱ्यांसाठी नवे युग

0

Loading

पाचोरा ( बातमी शेतकरी हिताची आहे कॉपी पेस्ट करण्यास हरकत नाही ) रब्बी हंगामाच्या प्रारंभासह, १ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हे नवे ॲप कार्यान्वित केले आहे. या सुधारणेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद स्वतः आणि सहजगत्या करण्याची सुविधा मिळणार आहे.
सुधारित ई-पीक पाहणीचा संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार
यापूर्वी ई-पीक पाहणीसाठी जुने मोबाईल ॲप वापरले जात होते. मात्र, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता हे ॲप ‘ई-पीक पाहणी DCS’ या नव्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. यामुळे १००% पीक पाहणी हे नव्या सुधारणांसह मोबाईल ॲपद्वारेच केली जाणार आहे.
सुधारित प्रक्रियेची वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांना आधी त्यांच्या पिकांची नोंद मोबाईल ॲपवर करण्याची सुविधा होती, तर उर्वरित पीक पाहणी तलाठी यांच्यामार्फत केली जात होती. मात्र, नव्या सुधारित प्रक्रियेनुसार प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक नेमण्यात आला आहे.
सहाय्यकाची भूमिका:
हंगामाच्या पहिल्या दिवसापासून सहाय्यक शेतकऱ्यांसोबत राहील.
शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्यात सहाय्यक मदत करेल.
पीक पाहणी संबंधित तांत्रिक किंवा अन्य समस्यांचे समाधान देखील त्वरित केले जाईल.
ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपची आवश्यकता
शेतकऱ्यांसाठी पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, आणि किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत पिकांची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकांची वेळेत नोंद होणे अत्यावश्यक आहे.
मोबाईल ॲपचे नवे नियम आणि वैशिष्ट्ये

  1. फोटो अपलोडिंग:
    शेतकऱ्यांना निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत पिकांचे फोटो घेणे अनिवार्य आहे.

प्रत्येक पिकासाठी दोन फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.

  1. पारदर्शकता:

यामुळे नोंदी अधिक प्रामाणिक आणि पारदर्शक राहतील.

शेतकऱ्यांच्या नावावरच पिकांची नोंद राहील.
सुधारित ॲपच्या फायद्यांविषयी महत्त्वाची माहिती
सुलभ नोंदणी: शेतकऱ्यांना आपापल्या मोबाईलवरून नोंदणी करता येईल.
तांत्रिक सहाय्य: अडचणींवर उपाय शोधण्यासाठी सहाय्यकांची नियुक्ती.
सक्षमता: नोंदीतील अचूकता वाढून शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल.
वेळेची बचत: शेतकऱ्यांचा वेळ वाचेल व प्रक्रिया गतिमान होईल.
शेतकऱ्यांसाठी सूचना
सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली पीक पाहणी हंगाम सुरू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी. निश्चित वेळेत पीक नोंदणी न केल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
शासकीय योजनांचा लाभ कसा होईल?
पीक पाहणीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यास शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळतील:

  1. नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईसाठी सरळ आणि जलद प्रक्रिया.
  2. पीक कर्जासाठी बँकांची तत्काळ मंजुरी.
  3. पीक विम्याचा लाभ वेळेत मिळणे.
    • MSP अंतर्गत शासकीय खरेदीसाठी पात्रता.
      शेतकऱ्यांसाठी नव्या ॲपच्या वापराचे महत्त्व
      सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे अधिक सोपे होणार आहे. पीक पाहणी प्रक्रिया पारदर्शक व तांत्रिकदृष्ट्या प्रगत होणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होईल.
      शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची सक्षमता वाढेल आणि महाराष्ट्र राज्याच्या कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हंगाम सुरू होताच सुधारित ॲपचा वापर करून पिकांची वेळेत नोंदणी करावी असे आवाहन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी पत्रकाव्दारे केले आहे

१९ वर्षांखालील आशिया कपमध्ये पाकिस्तानची विजयाने सुरुवात, भारताचा ४३ धावांनी केला पराभव

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने स्पर्धेतील प्रबळ दावेदार भारताचा ४३ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ७ विकेट गमावत २८१ धावा केल्या. शाहजेब खानने सर्वाधिक १५९ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात भारतीय क्रिकेट संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि ४७.१ षटकांत २३८ धावांवर सर्वबाद झाला. निखिल कुमारने ६७ धावा केल्या. पाकिस्तानकडून अली रझाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर फहम आणि सुभान यांना प्रत्येकी २ यश मिळाले.

शाहजेबने आपल्या खेळीत १० षटकार आणि ५ चौकार लगावले. शाहजेब आणि सलामीवीर उस्मान खान यांच्यात पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी झाली. उस्मान ९४ चेंडूत ६० धावांची खेळी खेळून बाद झाला. पण, शाहजेब शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला. त्याने मनमोकळेपणाने फलंदाजी करत १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शाहजेबने युवा एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा कामरान गुलाम (७) यांचा विक्रम मोडला. त्याने १० षटकार मारले. 

एकवेळ पाकिस्तानची धावसंख्या ४३.३ षटकांत ३ बाद २४१ धावा होती. असे असतानाही पाकिस्तान संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या ५ षटकांत कसून गोलंदाजी करत पाकिस्तानला २८१ धावांवर रोखले. भारताकडून समर्थ नागराजने ३ आणि आयुष म्हात्रेने २ बळी घेतले. पाकिस्तानने शेवटच्या ५ षटकात ४ गडी गमावून ३३ धावा केल्या. 

१३ वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील भारतासाठी या सामन्यात खेळत होता, त्याला केवळ १ धाव करता आली. ज्याला अलीकडेच आयपीएल २०२५ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले होते. 

टी२० विश्वविक्रम: एकाच संघाच्या ११ जणांनी गोलंदाजी करत रचला विश्वविक्रम,जगात घडले पहिल्यांदाच तर हार्दिक पांड्याच्या ६ चेंडूंत २८ धावा

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० हा फलंदाजांचा खेळ… यामध्ये फक्त चौकार आणि षटकारांचेच विक्रम होतात. अशा स्थितीत कोणत्याही संघाने गोलंदाजीचा विक्रम केला तर नवलच नाही का? दिल्लीने सय्यद मुश्ताक अली टी२० चषक २०२४ मध्ये असाच एक विक्रम केला आहे. मणिपूरविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी करायला संधी दिली. टी२० क्रिकेटमधला हा विक्रम आहे. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मणिपूरविरुद्ध खेळल्या गेलेल्या एसएमएटी टी२० स्पर्धेच्या सामन्यात दिल्लीने मणिपूरला २० षटकांत ८ गडी गमावून १२० धावांवर रोखले. या सामन्यात दिल्लीने यष्टिरक्षकासह सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी केली. याआधी, कोणत्याही संघाने कोणत्याही टी२० सामन्यात गोलंदाज म्हणून वापरलेल्या खेळाडूंची कमाल संख्या ९ होती. 

या सामन्यात मणिपूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनीने सर्वांना चकित केले आणि सामन्यातील सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी दिली. तो स्वतः संघाचा यष्टिरक्षक आहे. त्याने सामन्यात २ षटके टाकली आणि १ बळीही घेतला. बडोनीने एक निर्धाव षटकही टाकले. 

दिल्लीकडून दिग्वेश (२/८) आणि हर्ष त्यागी (२/११) यांनी चेंडूसह चांगली कामगिरी केली, तर प्रियांश आर्य (१/२) आणि आयुष सिंग (१/७) यांनीही विकेट घेतल्या. सर्व संसाधने वापरूनही दिल्लीला मणिपूरला सर्वबाद करता आले नाही. कसोटीतही असे एकदा घडले आहे. २००२ मध्ये भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्व ११ खेळाडूंना गोलंदाजी दिली होती. 

स्पर्धेच्या अन्य एका सामन्यात हार्दिक पांड्याने त्रिपुराविरुद्ध चांगली कामगिरी केली. हार्दिक या स्पर्धेत बडोद्याचे नेतृत्व करत असून त्याने त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात २३ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. 

पांड्याच्या झंझावाती फलंदाजीत पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता, डावखुरा फिरकी गोलंदाज पी सुलतानने एका षटकात सर्वाधिक २८ धावा केल्या. या षटकात पांड्याने ६, ०, ६, ६, ४, ६ धावा केल्या. म्हणजे षटकात पांड्याच्या बॅटमधून ४ षटकार आणि १ चौकार आला. पांड्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे बडोद्याने त्रिपुराचे ११० धावांचे लक्ष्य अवघ्या ११.२ षटकांत पूर्ण केले.

यापूर्वी हार्दिक पांड्याने तमिळनाडूविरुद्ध अशीच पॉवर हिटिंग केली होती, जिथे त्याने ३० चेंडूत ६९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या गुर्जपनीत सिंगने एका षटकात २९ धावा दिल्या होत्या. पांड्याने त्या षटकात सलग ४ षटकार मारले होते, यावरून पंड्याचा घातक फॉर्म दिसून येतो. या स्पर्धेमध्ये पांड्याने उत्तराखंडविरुद्ध २१ चेंडूत ४१ आणि गुजरातविरुद्ध ३५ चेंडूत ७४ धावा अशा दोन नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळल्या होत्या. त्याचे सातत्यपूर्ण पॉवर हिटिंग हे या वर्षीच्या एसएमएटीचे प्रमुख आकर्षण आहे. पांड्याच्या या पॉवरपॅक कामगिरीच्या जोरावर बडोदा यंदा सय्यद मुश्ताक अली टी२० चषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. 

लोककलेतील भिष्मचार्य मधुकर नेराळे कालवश!

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील तमाशासह लोककलेचा आधारवड ठरलेले आणि लोककलेत आपली भिष्मचार्य‌ म्हणून प्रतिमा उमटवून असणारे मधुकर नेराळे (८१) यांचे मुंबईत सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ह्रदय विकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण तमाशा, लोककलाभूमी शोकाकुल झाली. लालबाग चिवडा गल्लीतील न्यू हनुमान थिएटर एकाएकी पोरके झाल्याची भावना सर्वत्र पसरलेली दिसते.

नेराळे यांनी आयुष्यभर लोककलेच्या अस्तित्वासाठी स्वतःला वाहून घेतले. वडिलोपार्जित गिरणगावातील न्यू हनुमान थिएटरमध्ये १९६० पर्यंत पारंपरिक तमाशा कलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. रोशन सातारकर, यमुनाबाई वाईकर, लिला गांधी ते अगदी मधु कांबीरकर पर्यंतच्या असंख्य कलावंताना ‘न्यू हनुमान थिएटर’ हे आधारवड ठरले. त्यामुळेच या कलावंतांचे भाग्य उदयाला आले. तमाशा हा खरा लोककलेचा चेहरा, परंतु कलेच्या अत्याधुनिक काळात तो हरवत चालला होता. परंतु मधूकर नेराळे यांनी तमाशा कलेवर‌ राज्यभर परिषदा, शिबीरे,संमेलने घेऊन त्या कलेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांनी अनेक कलावंत घडविले आणि लोककलेच्या संस्था स्थापनेला प्रोत्साहन दिले. १९६९ च्या सुमारास स्वतःची यशराज लोक नाट्य संस्था स्थापन करून वगसम्राट, गाढवाचे लग्न, आतुन कीर्तन बाहेरून तमाशा, राजकारण गेले चूलीत, उदं ग अंबे उदं, पुनवेची रात्र काजळी अशी एकापेक्षा एक संगीत लोकनाट्य कला रसिकांपुढे आणून कलावंतांमध्ये‌ नवा आत्मविश्वास रुजविला. तमाशा कलावंतांचा लोकाश्रय संपला तेव्हा त्यांना न्यू हनुमान थिएटरमध्ये आश्रय तर‌ दिलाच, पण सरकारी अनुदान मिळवून देण्यासही पुढाकार घेतला. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर पुरस्कार ते अगदी २०२३ पर्यंत जपान येथील राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कारांपर्यंतचे शेकडो सन्मान म्हणजे त्यांच्या लोककलेतील समर्पित जीवनाची साक्ष ठरतात. त्यांच्या निधनाने असंख्य कलावंतामध्ये लोककलेतील वटवृक्ष उन्मळून पडल्याची भावना कलाविश्वात विखुरलेली दिसते. त्यांच्या अंत्ययात्रेला कलाक्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!